साईमत, पुणे : प्रतिनिधी नाशिक महामार्गालगत असलेल्या घाट परिसरात एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. तथापि, सदर तरूणाचा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. हा तरुण िंहजवडी आयटी पार्क येथे कंपनीत अभियंता म्हणून कामाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. खेड पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सौरभ नंदलाल पाटील (वय २३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. २८ जुलैपासून हा तरुण बेपत्ता होता. मात्र, रविवारी त्याचा मृतदेह खेड घाटात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेला व्ोगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत सौरभ याचे नातेवाईक संदीप सोनावणे…
Author: Saimat
साईमत यावल प्रतिनिधी यावल शहरातील व तालुक्यातील दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी आणि मालमत्ता करातून सूट मिळण्यासाठी यावल पंचायत समिती समोर मंगळवार दि. 15 ऑगस्ट रोजी शासनाचे व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करणार आहे. याबाबत प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल तालुक्याचे वतीने पंचायत समिती गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवंना सन २०१८ ते २०२३ या कालावधीतील ५ टक्के निधी मिळून मालमत्ता करातून ५० टक्के सूट मिळावी यासह इतर मागण्या शासन आदेशानुसार त्वरित मंजूर होऊन सुविधा मिळाव्यात व त्यांना पुनर्वसन व विकासाची संधी दयावी अशी निवेदने यावल…
साईमत फैजपूर प्रतिनिधी मानवी जीवन असंख्य आपत्तींनी ग्रासलेले आहे. त्यात काही आपत्ती मानवनिर्मित असून काही निसर्गनिर्मित आहेत. अशा जीवित हानी आणि वित्त हानी पोहचविणाऱ्या आपत्तीच्या वेळी स्वतःचा, परिवाराचा व समाजातील इतर लोकांचा जीव वाचवण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सने ज्ञान व कौशल्य प्राप्त करून समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वासाठी सज्ज झाले पाहिजे असे आवाहन डॉ प्रशांत वाघमारे आपत्ती व्यवस्थापन सल्लागार एन.डी.एम.ए. यांनी केले. १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावच्या वतीने आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. यावेळी कर्नल पवनकुमार प्रशासकीय अधिकारी तथा कॅम्प कमाडंट, अठरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव व नरवीरसिंग रावल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सुभेदार मेजर प्रेमसिंग, कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत,…
साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभेचं सदस्यत्व बहाल केल्यानंतर राहुल गांधी आज सोमवारी (7 ऑगस्टला) संसदेत पोहोचले. राहुल गांधी 137 दिवसांनंतर संसदेत पोहोचले आणि विरोधी पक्षांच्या आघाडीच्या खासदारांनी म्हणजेच इंडीयाच्या खासदारांनी त्यांचं स्वागत केलं. यामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचाही समाव्ोश होता. संसद परिसरात पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्याआधी राहुल गांधी यांनीही आपला ट्विटर बायो बदलला. यामध्ये त्यांनी खासदार असा उल्लेख केला आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाडचे खासदार आहेत. मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (4 ऑगस्ट) राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. यानंतर लोकसभा सचिवालयाकडून आज अधिसूचना जारी करुन राहुल…
साईमत, छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या दोन गटात जोरदार राडा पाहायला मिळाला. जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना निधी वाटपावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानव्ो हे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना भिडले. ठाकरे गटाचे आमदार उदयिंसग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याव्ोळी मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे आमदार राजपूत आणि अंबादास दानव्ो सत्तार-भुमरे जोडगोळीवर तुटून पडले. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पावसाळी…
साईमत, नांदेड : वृत्तसंस्था एकीकडे समाजात वडील-मुलांमध्ये वाद विकोपाला जात असल्याच्या घटना वरच्या वर येताना दिसतात. पिता-पुत्रामधील वादांच्या घटना खूनापर्यंत गेल्याचंही पाहायला मिळतं. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मुलीच आपल्या आई-वडिलांना साथ देतात, सांभाळ करतात, तर मुलं आई वडिलांची साथ सोडून आपल्याच संसारात व्यस्त होतात, अशी भावना अनेकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. मात्र या समजाला नांदेडच्या एका 25 वर्षीय डॉक्टर मुलाने फाटा दिला आहे. जन्मदात्याला स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करुन मुलाने जीवनदान दिले आहे. डॉ मयुरेश गव्हाणे असं या मुलाचं नाव आहे. त्याने समाजापुढे ठेवलेल्या या आदर्शाचे सर्वत्र कौतुक होतं आहे. नांदेड शहरातील रहिवासी असलेले डॉ मयुरेश गव्हाणे यांचे वडील…
साईमत फैजपूर प्रतिनिधी भारत देश जागतिक स्तरावर महासत्ता होण्यासाठी देशातील गुणवंत विद्यार्थी व युवकांनी राष्ट्र कार्यासाठी महत्व देऊन राष्ट्र कार्यात स्वतःला झोकून दयावे असे आवाहन सातपुडा सोसायटी चेअरमन तथा विद्यापीठ सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी केले. सातपुडा सहकारी सोसायटीने गुणवन्त विद्यार्थी गौरव कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. नरेंद्र नारखेडे यांनी पुढे बोलतांना विद्यार्थी व युवकच उद्याच्या भारताचे आधारस्तंभ आहे यामुळे युवकच देशाला महासत्ता बनऊ शकतात असा आत्मविश्वास व्यक्त केला. यावेळी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेत सभासदांना 10 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचा माजी नगराध्यक्ष…
साईमत बोदवड प्रतिनिधी येथील रांका विद्यालयात मुख्याध्यापक प्राध्यापक पी.एम .पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालक शिक्षक संघाची सहविचार सभा नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी उपप्राचार्य एम. टी. नेमाडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रामेश्वर कोळी, सहसचिव पारस जैन, विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा अध्यक्षीय सूचना प्राध्यापक जे. एन. राऊळ यांनी तर अनुमोदन श्री व्यवहारे यांनी दिले. पालक शिक्षक संघाचे विभाग प्रमुख प्राध्यापक जी. व्हि. चौधरी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. नेमाडे यांनी पालक शिक्षक सभेच्या उद्दिष्ट याबद्दल चर्चा केली. शिक्षकीय मनोगतात प्राध्यापक के. एस. उबाळे यांनी वर्षभरातील शैक्षणिक उपक्रमाविषयी माहिती दिली तसेच शाळेच्या…
साईमत बोदवड प्रतिनिधी राष्ट्रीय विकलांग पार्टी च्या रेल रोको आंदोलनास व्यापारी संघटनेने पाठींबा जाहीर केला.दिनांक ६ रोजी राष्ट्रीय विकलांग पार्टी ची अग्रसेन भवन बोदवड येथे बैठक झाली. यावेळी पार्टी तर्फे ९ ऑगस्ट रोजी सुरत अमरावती, दादर सेवाग्राम, अहमदाबाद हावडा या गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा या साठी रेल रोको करण्यात येणार आहे. या आंदोलनास बोदवड व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांनी उपस्थिती देऊन पाठींबा जाहीर केला. बैठकीला राष्ट्रीय विकलांग पार्टीचे पदाधिकारी व इतर दिव्यांग बांधव, व्यापारी संघटना पदाधिकारी तसेच नगरपंचायत बोदवड नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीच्या वेळी राष्ट्रीय विकलांग पार्टीच्या रेल रोको आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत शेवटपर्यंत सोबत राहू असे आश्वासन…
साईमत मलकापूर प्रतिनिधी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, रतन उर्फ गंगाराम जगन्नाथ दाभाळकर वय ४५ वर्ष व्यवसाय-पानपटी दुकान रा. एकता नगर यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला येवुन तक्रार दाखल केली की, माझा लहान भाऊ रमन दाभोळकर यांचे १२ वी नापास पर्यंत शिक्षण झाले असून माझी १९९४ पासून रेल्वे स्टेशन जवळ, पानपट्टीचे दुकान आहे. अजय प्रभाकर सावळे रा. आंबेडकरनगर, मलकापुर यास मी पूर्वी पासून ओळखतो. आशिष सुभाष हाताळकर व आम्ही एकतानगर मलकापूर येथे राहत असुन माझा लहान भाऊ रमन दाभाळकर व आशिष हाताळकर यांचे सोबत शिक्षण…