Author: Saimat

साईमत, जळगाव, प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा व नशिराबाद येथील दोघा सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अलीकडच्या काळात सराईत गुन्हेगारांना हद्दपार अथवा एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द करण्याला गती दिलेली आहे. अलीकडेच याबाबतच्या कार्यवाही मोठ्या स्वरूपात होतांना दिसून येत आहेत. यात आता नव्याने भर पडली असून यात जळगाव आणि नशिराबाद येथील दोन गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. शहरातील पिंप्राळा परिसरातला रहिवासी फैजल खान अस्लम खान पठाण ( वय 22) आणि नशिराबादच्या ख्वाजा नगरातील रहिवासी शेख शोएब शेख गुलाम नबी ( वय 27) या दोघांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. यात फैजल खानविरोधात जळगाव एमआयडीसी, धरणगाव आणि जळगाव…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव हंडामोर्चात सहभागी न झाल्याने एकाला त्याच्या वहिनी व भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाला गावातील तीन जणांनी लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. तसेच महिलेच्या हातावर कोयत्याने वार केल्याची घटना तालुक्यातील मन्यारखेडा येथे घडली होती. याप्रकरणी सोमवारी परस्परविरोधी फिर्यादीवरून एकूण सहा जणांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, मन्यारखेडा येथे हंडामोर्चा काढण्यात आला होता. त्यात संजय बळीराम बागले (वय 54, रा. मन्यारखेडा) हे सहभागी न झाल्याने गावातील बापू दगडू मोरे, सुनील बापू मोरे व अन्य एकाने लोखंडी पाईप बागले यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. हे भांडण सोडविण्यासाठी बागले यांच्या विहिनी मंगलाबाई…

Read More

साईमत, जळगाव , प्रतिनिधी, शहरातील अक्सानगरातून बांधकाम ठेकेदाराच्या मालकीच्या 41 नग लोखंडी प्लेटांची चोरी करणाऱ्या चोरट्यासह एका अल्पवयीन मुलाला एमआयडीसी पोलीसांनी अक्सा नगरातून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या लोखंडी प्लेटा हस्तगत केल्या आहेत. सोमवारी 7 ऑगस्ट रोजी दोघांना न्यायालयात हजर केले असता अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात रवानगी केली तर दुसऱ्या चोरट्यांला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अक्सा नगरात शेख अकील शेख कुर्बान हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बांधकाम ठेकेदारीचे काम करून आपला व्यवसाय चालवितात. बांधकामासाठी त्यांच्याकडे लोखंडी प्लेटा आहेत. 2 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरासमोर चोरट्याने 41 नग लोखंडी प्लेटा चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

Read More

साईमत, जळगाव, प्रतिनिधी, – खिडकीचे ग्रील बसविण्याचे काम करताना अचानक तोल गेल्याने चौथ्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. तोल जावून पडल्याने त्याला तातडीने गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी दुपारी 3 वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शाहू नगरातील शेख वाहिद शेख रफिक (वय34) असे मृत झालेल्या मजुराचे नाव आहे. शेख वाहिद शेख रफिक हा इमारतीच्या खिडक्या बसवणाऱ्या ठेकेदाराकडे पाच वर्षापासून कामाला होता. ठेकदाराचे सिंधी कॉलनीत एका बांधकाम केलेल्या इमारतीला खिडक्या बसविण्याचे काम घेतले होते. 3 ऑगस्ट रोजी या इमारतीला खिडकी बसविण्यासाठी शेख वाहिद हा देखील…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील रमेश भगवान पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या सहीचे पत्र आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रमेश भगवान पाटील यांना दिले. ग्रामीण भागातून आलेले रमेश भगवान पाटील यांनी अल्पावधीतच राजकीय आणि उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. शरद पवार यांचा आदर्श घेऊन समाजसेवा करत राजकीय क्षेत्रातही रमेश पाटील यांनी आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सन २००० पासून कार्यरत रमेश पाटील यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, नंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या…

Read More

साईमत यावल प्रतिनिधी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या यावल तालुका अध्यक्षपदी विरावली येथील माजी ग्राम पंचायत सदस्य पवन युवराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. येथील शेतकी संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत युवकचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पवन पाटील यांना निवड पत्र दिले. पवन पाटील हे आपल्या विद्यार्थी दशेपासून राष्ट्रवादी विचार सरणीचे जोडलेले व्यक्तिमत्त्व आहे. याआधी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, त्यानंतर राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षांमध्ये संघटनेची जबाबदारी पार पडली आहे. गेल्या पंधरा वर्षापासून शरद पवार यांच्या शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे.…

Read More

साईमत रावेर प्रतिनिधी महसूल प्रशासन मागील आठवडाभरा पासुन राबवत असलेला ‘महसूल सप्ताह’ मध्ये अनेक लाभार्थांना ई-पिक वेग-वेगळे शासकीय दाखले गरीब निराधार लोकांना दिलेल्या लाभ शेतकऱ्‍यांसाठी केलेल कामे, यासह अनेक जनहिताच्या योजना सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचवीणे हेच महसूल विभागाचे उद्दिष्ट असल्याचे मत प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी व्यक्त केली. आठवडाभरापासून सुरु असलेला महसूल सप्ताहचा समारोप रावेर शहरातील कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना हॉल करण्यात आला, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती आयएएस अधिकारी अर्पित चव्हाण होते. यावेळी प्रास्ताविक करतांना बंडू कापसे म्हणाले की, रावेर तालुक्यातील गरीब व शेतकरी कुटुंबाच्या हीताचे काम करणे महसूल विभागाच्या जास्तीत-जास्त योजना त्यांच्यापर्यंत पोहचवणे हीच महसूल विभागाचे…

Read More

साईमत साकेगाव ता. भुसावळ वार्ताहर येथून जळगाव औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीस तीन-चार दिवसांपूर्वी साकेगाव येथे मोठी गळती लागली होती ही गळती युद्ध पातळीवर काम करून बंद करण्यात आली होती. मात्र पुन्हा काल रात्री त्याच ठिकाणी पुन्हा मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे एमआयडीसीचा पाणीपुरवठा ठप्प झाल आहे. दरम्यान, या जलवाहिनीवर जळगाव एमआयडीसी सोबत साकेगाव व डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयाचा पाणीपुरवठाही अवलंबून आहे. याबाबत औद्योगिक वसाहतीच्या प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष घालून ही समस्या कायम स्वरूपी निकाली काढावी अशी मागणी होत आहे.

Read More

साईमत, पुणे : प्रतिनिधी जिल्ह्यातील जेजुरी इथे ‌‘शासन आपल्या दारी‌’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होतं. या कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री एकनाथ िंशदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंडोबाचे दर्शन घेतले. राज्यात सर्वदूर पाऊस पडू दे आणि माझा शेतकरी बांधव समाधानी होऊ दे. राज्यात सर्व जाती-धर्मामध्ये सलोखा नांदू दे. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटावा, उद्योगपतींनी राज्यात मोठी गुंतवणूक करावी. तसंच पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, अशी प्रार्थना खंडेरायाचरणी केली. खंडोबा चरणी तळी भरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी देवाचं दर्शन घेतले. अजित पवार यांनी खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर पारंपारिकरित्या डोक्यावर पगडी, अंगावर घोंगडी, हातात घुंगराची काठी घेत गड उतरला. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून…

Read More

साईमत, जळगाव: प्रतिनिधी त्या ऑडिओ क्लिपवरून आमदार किशोर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केलीच पाहिजे. पत्रकाराला अश्लील भाषेत शिवीगाळ ही दुर्देवी आणि चुकीची घटना असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. खडसे यांनी सोमवारी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील पीडित मुलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, घटनेचा निषेध व्यक्त करता आला असता िंकवा अन्य शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करता आली असती, मात्र पत्रकाराला अशा पद्धतीच्या शिव्या आणि धमक्या देणं हे आमदार पदाला शोभेस नाही. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आपण त्याची प्रतिष्ठा आणि जपणूक आपण केली पाहिजे. अश्लील शिवीगाळ…

Read More