साईमत, प्रतिनिधी, जळगाव रुग्ण सेवेत रुग्णवाहिकेचे अनन्य साधारण महत्त्व असून, स्व. अमोल अण्णाभाऊ कोळी यांच्या स्मरणार्थ अण्णाभाऊ विठ्ठल कोळी यांनी दिलेल्या रुग्ण्वाहिकेमुळे गरजू रुग्णांना जलद उपचार मिळण्यास मदत होणार आहे. भोलाणे व परिसरातील नागरिकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले आहे. महर्षी वाल्मिक सभागृहासाठी व वाचनालयासाठी निधी मंजूर करणार असल्याचे सांगत भोलाणे व परिसर ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमापोटी कामातून उतराई होणार असल्याचे भावनोद्गार पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले. ते भोलाणे येथे रुग्णवाहिका लोकार्पण व विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील होते. या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन सुरुवातीला ढोल -ताश्ाांच्या गजरात पालकमंत्री गुलाबराव…
Author: Saimat
साईमत मलकापूर प्रतिनिधी क्रांती दिन.. याच दिवशी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात देशात झाली ह्याचे औचित्य साधून “मेरी मिट्टी मेरा देश””मिट्टी को नमन विरो को वंदन” ह्या कार्यक्रमा अंतर्गत आज दि.९ऑगस्ट बुधवार रोजी मलकापूर येथील शहीद स्मारक येथे आ प्रदेश उपाध्यक्ष चैनसूख संचेती ह्यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्ष मलकापूर तर्फे पुष्पचक्र अर्पण करुण अभिवादन करण्यात आले. मातृभूमीचे रक्षण करण्याकरता जवान संजयसिंग राजपूत शहीद झाले होते.त्यांच्या स्मारकला पण अभिवादन केल्यानंतर त्यांची वीरपत्नी सुषमा राजपूत सत्कार आपल्या पक्षाच्या महिला आघाडी च्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामूहिक राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते विजुकाका जाधव, शहर अध्यक्ष मिलिंदजी डवले, जिल्हा…
साईमत मलकापूर प्रतिनिधी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दि.9 ऑगस्ट शहीद संजयसिंह राजपुत यांच्या स्मारका वर उपस्थित राहून शहिद संजयसिंह राजपुत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व क्रांतिवीरांना श्रद्धांजली देऊन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला सोपान शेलकर , प्रमोद अवसरमोल , अँड. जावेद कुरेशी , राजू पाटील , बंडूभाऊ चौधरी , निवृत्ती तांबे , अनिल गांधी , तुषार पाटील , अनिल मुंधोकार , उस्मान मास्टर , अनिल भारंबे , गजानन भारंबे , सिद्धांत इंगळे , युसुफ खान , शेख सादिक , दिलीप गोळीवाले , ईश्वर भदाले , हर्षल दशरथे , भुषण सनिसे , विनय काळे , गोविंद राहाटे ,…
साईमत मलकापूर प्रतिनिधी मलकापूर (Malkapur) ते खामखेड रेल्वे अप रेल्वे ट्रॅकवर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. ही घटना दिनांक 8 ऑगस्ट रात्री उघडकीस आली. याप्रकरणी रेल्वे स्टेशन मास्टर मलकापूर तर्फे ट्रॅकमन किशोर बराटे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मयताचे वय अंदाजे पंचवीस वर्ष, रंग- गोरा, लांब केस, लांबट चेहरा, काळे डोळे, नाक सरळ दबके , शरीर बांधा सळपातळ, अंगामध्ये निळ्या कलरची जीन्स असे वर्णन आहे. सदर मृतदेह शवगृहात तीन दिवसांपर्यंत फ्रीज करून ठेवलेले आहे. या इसमाची ओळख पटल्यास मलकापूर शहर पोलीस स्टेशन 07267-222018 वर संपर्क साधावा. असे आव्हान मलकापूर शहर पोलीस स्टेशन तर्फे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन कुलकर्णी यांनी…
साईमत बोदवड प्रतिनिधी रेल्वे स्थानकावर कोरोना काळानंतर बंद झालेल्या व नविन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा यासाठी बोदवड येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात होता. रिक्षा स्टॉप जवळच प्रवेश मार्ग बंद करण्यात आले होते. रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या सर्व मार्गावर पोलीस तैनात होते. प्लॅटफॉर्म तिकिट काढल्यावरही आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी बाहेर रिक्षा स्टॉप जवळच रोखून धरले होते. यावेळी आमदार चंद्रकांत पाटिल आंदोलना स्थळी दाखल होताच रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. पोलीस प्रशासनाचा आंदोलनकर्त्यांवरील दबाव पाहता आमदार पाटील यांनी भुसावळ विभागाच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करीत , बंदोबस्त मोडून काढत आंदोलनकर्त्यांना सोबत घेत रेल्वे स्थानकावर दाखल झाले. आमदार चंद्रकांत…
साईमत फैजपूर प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन प्राविण्य मिळवावे व प्रशासकीय अधिकारी बनावे असे आवाहन फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी फैजपूर शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना आवाहन केले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांनी केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पतसंस्थेचे चेअरमन नरेन्द्र नारखेडे होते तर प्रमुख पाहुणे माजी आ. अरुण पाटील, मसाका माजी चेअरमन शरद महाजन, फैजपूरचे ए पी आय निलेश वाघ, वरिष्ठ वन अधिकारी मुकेश महाजन, होमगार्ड माजी जिल्हा समादेशक पंडितराव कोल्हे यांची उपस्थित होते. या मान्यवरांचे हस्ते गुणवन्त विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक…
साईमत भुसावळ प्रतिनिधी येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण विभाग व एन. एस .एस विभागातर्फे जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर पी फालक, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर बी ढाके, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.आर डी भोळे, प्रा. डॉ.अनिल सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा. डॉ.माधुरी पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रा. अनिल नेमाडे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा. डॉ.जयश्री सरोदे, प्रा. श्रेया चौधरी, प्रा. एस. एस. पाटील, प्रा.एस. डी. चौधरी, प्रा. जी.पी. वाघुळदे, प्रा. खिलचंद धांडे, विजय पाटील, प्रकाश सावळे, प्रसिद्धी प्रमुख डॉ. संजय चौधरी , प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व…
साईमत साकेगाव ता. भुसावळ वार्ताहर जळगाव जिल्हा कोतवाल संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी भुसावळ तालुक्यातील साकेगाव सजाचे कोतवाल जितेश चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जळगाव जिल्हा कोतवाल संघटनेची महत्त्वाची बैठक नुकतीच झाली. याबैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व प्रतिनिधी तसेच कोतवाल कर्मचारी उपस्थित होते. जळगाव जिल्हा कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या पदावर भुसावळ तालुक्यातील साकेगाव सजाचे कोतवाल जितेश चौधरी यांची सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रवीण चिखलकर, तालुका प्रतिनिधी अशोक पाटील, धनंजय महाजन, चंद्रकांत सरदार, सुनील खराटे, सुपडू कोळी, ईश्वर ठाकूर, शरद पवार आदिंची उपस्थिती होती.
साईमत भुसावळ प्रतिनिधी येथील रोटरी हॉलचे प्रांगण हिरवेगार सुशोभीकरण करण्याचा विडा क्लब ने उचलला आहे वृक्ष लावून उपस्थित महिलांनी प्रत्येक झाड तीन वर्षापर्यंत दत्तक घेऊन त्यांचं संगोपन करण्याचा निर्धार केला असल्याचे प्रेसिडेंट अलका भटकर तथा सेक्रेटरी सुनंदा भारुडे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी सांगितले. सदर प्रसंगी वृक्षांचे महत्त्व वृक्षांवर कविता आणि पर्यावरण पूरक जागरण करण्यात आले. सदर कार्यक्रमास फेकरीच्या सरपंच चेतना भिरुड यांनी मोलाचे सहकार्य केले. यशस्वितेसाठी शितल भराडे, रुचिका शर्मा, व्हॉइस प्रेसिडेंट प्राची राणे, ट्रेझरर संगीता चांडक, आयएसओ नूतन फलक, कमल सचदेव, मनीषा काबरा , मनीषा तायडे, आशा पाटील , स्वाती देव , वंदिता पारे, एक्झिक्युटिव्ह मेंबर राजश्री कात्यांयानी ,पद्मजा…
साईमत बोदवड प्रतिनिधी बोदवड न्यायालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासींचा आत्मसन्मान, अस्मीता जपणारा दिवस असल्याचे यावेळी ॲङ अर्जुन पाटील यांनी सांगात, आदीवासी समाजासाठी असलेल्या विविध शासकीय योजना तसेच विविध कायदे, घटनेतील विविध कलमे याबाबत अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष न्या.क्यु.ए.एन. सरवरी होते. प्रमुख उपस्थिती ॲङ अर्जुन पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ, ॲङ के.एस.इंगळे हे होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन शैलेश पडसे,मनोगत ॲड. धनराज सी. प्रजापती, ॲड. के.एस.इंगळे, ॲङ संतोषकुमार कलंत्री यांनी व्यक्त केले. तर कार्यक्रमास ॲड.विजय मंगळकर न्यायालयीन कर्मचारी वर्ग, पक्षकार वर्ग, पो.कॉ. आर.एस.महाजन हे उपस्थित होते. याप्रसंगी ॲड. अर्जुन पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,…