Author: Saimat

साईमत, जळगाव ः प्रतिनिधी येथील आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थाध्यक्ष आबासाहेब शिवाजीराव पाटील, सचिव डॉ. चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापक उमाकांत बुंदेले, दीपक पाटील यांच्या हस्ते दीप्रज्वलन तसेच देवी सरस्वती आणि आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना “स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व वीर बिरसा मुंडा यांचे जीवनचरित्र” यावर मार्गदर्शन केले. इ. २ री ते १२ वीच्या मीरा पावरा, वैष्णवी चौरे, गायत्री राऊत, गंगा बागुल, मनीषा ठाकरे, अजय पावरा, रोशन पावरा, प्रगती पावरा, भाग्यश्री, विनायक चौधरी, नाजिया, रेशली इत्यादी अनेक विद्यार्थ्यानी वीर बिरसा मुंडा यांना…

Read More

साईमत, जळगाव ः प्रतिनिधी जागतिक आदिवासी दिनानिमित्त कांचन नगर वार्ड क्र. २ (अ)आदिवासी वार्डच्या नगरसेविका कांचनताई सोनवणे यांनी नारळ फोडून,पूजा करुन,पेढे वाटप करून उत्साहमय वातावरणात त्यांच्या हस्ते वार्डातील विविध विकास कामांचा प्रारंभ केला.या परिसरात कॉक्रिटीकरण, गटारी, कॉक्रिटीकरण रोडांचे पेव्हर ब्लॉक बसविण्याचे तसेच वार्डातील १० ते १२ ठिकाणी पाणी गाड्या इत्यादी विकास कामांची प्रत्यक्ष सुरुवात झाली. सदरची कामे शिव शंकरनगर व हरिओम, कांचन नगर, घरकुल परिसर,आसोदा रोड,प्रशांत चौक, उज्ज्वल चौक, बिंदुबाई हॉल या परिसरात करण्यात येत आहे. सदरहू कामे जिल्हा नियोजन,मनपा निधी,ठक्कर बाप्पा आदिवासी योजना निधी, ना. देवेंद्र फडणीस नगर परिसरात नागरी निधी अंतर्गत करण्यात येत आहेत. या कामांसाठी पाच कोटी…

Read More

साईमत, जळगाव ः प्रतिनिधी ९ ऑगस्ट क्रांती दिन तसेच जागतिक आदिवासी दिनाचे स्मरण म्हणून जळगाव शहर व ग्रामीण कॉंग्रेसकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रथम कॉंग्रेस भवन येथे राष्टपिता महात्मा गांधीजीच्या प्रतिमेला शहरजिल्हाध्यक्ष श्याम तायडे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.नंतर भाऊंचे उद्यान येथे भारतीय स्वतंत्रतासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच आदिवासी बाधवाना भेटून त्यांच्याशी हितगुज साधून त्यांचा सन्मान करण्यात आला. सदर प्रसंगी ग्रामीणचे सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, शहर सरचिटणीस प्रदीप सोनवणे,जगदीश गाढे,श्रीधर बापू चौधरी, जाकीर बागवान, मीराताई सोनवणे, देवाभाऊ ठाकरे, सेल अध्यक्ष सखाराम मोरे,बबलू शेख, राजु पाटील,प्रवीण पाटील सर आदी उपस्थित होते.

Read More

साईमत, नाशिक ः प्रतिनिधी अजित पवार गटाने शिंदे फडणवीस सरकारमध्ये एंट्री केल्यानंतर पुन्हा एकदा नाशिकच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री म्हणून नाशिकची जबाबदारी दादा भुसे यांच्याकडे असताना स्वातंत्र्य दिनाच्या पाश्वर्भूमीवर ना भुस,े ना भुजबळ थेट मंत्री गिरीश महाजन यांना ध्वजारोहनाचा मान मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चेला उधाण आले आहे. देशाचा स्वातंत्र्य दिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या कार्यक्रमासाठी राज्य सरकारकडून कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार, त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पुन्हा एकदा गत वर्षीप्रमाणेच यंदा देखील नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना तर नाशिकचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे…

Read More

साईमत, नवीदिल्ली ः वृत्तसंस्था मणिपूर हिंसाचारावरून विरोधी पक्षाने सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवर कोणतंही ठोस भाष्य न करता हसत हसत मणिपूरची चेष्टा केली. मणिपूरमध्ये लोक मरताहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत आणि आपले पंतप्रधान संसदेत हसून भाषण करतात, भारताच्या पंतप्रधानांना हे वागणं शोभत नाही. खरंतर पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या पदाचं गांभीर्यच राहिलेलं नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी यांच्या लोकसभेतील भाषणाचा चांगलाच समाचार घेतला. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने आणलेल्या ‘अविश्वास प्रस्तावा’ला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २ तास १३ मिनिटांचं लांबलचक भाषण केलं. ज्या मुद्द्यांवरून विरोधकांनी अविश्वास ठराव आणला, त्या…

Read More

साईमत, नाशिक ः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात १५ लाख रुपयांची लाच घेताना नाशिक तहसीलदार नरेशकुमार बहिरम यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. या नंतर जिल्हाभरात खळबळ उडाली. अनेक नागरिकांनी रोष व्यक्त करत या प्रकरणाची गंभीर दाखल घेण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी देखील गंभीर दखल घेत चौकशीसाठी पाच अधिकाऱ्याचे पथक नेमले होते. शिवाय निलंबनाचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवण्यात आला होता. दरम्यान, गुरूवारी रात्री उशिरा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बहिरम यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

Read More

साईमत, नवीदिल्ली ः वृत्तसंस्था प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरमधील समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने ६ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या थिएटरमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या याचिकेप्रकरणी जया प्रदा यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच जयाप्रदा यांना ५,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. चेन्नईमध्ये रायपेटा याठिकाणी जया प्रदा यांच्या मालकीचे चित्रपटगृह आहे. या चित्रपटगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ईएसआयची रक्कम भरलेली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

Read More

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असणारे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री नबाव मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. सक्तवसुली संचलनालयाने सर्वोच्च न्यायालयात जामिनीला विरोध केला नसल्याने मलिक यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे नवाब मलिक तब्बल १ वर्ष ५ महिन्यानंतर जेलबाहेर येणार आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव पुढील २ महिन्यांसाठी मलिकांना जामीन मिळाला आहे. नवाब मलिक मूत्रिंपडाच्या उपचारांसाठी कुर्ला येथील खासगी रुग्णालयात दाखल आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिल्यानंतर मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठाने मलिक यांच्या याचिकेवर निर्णय देताना त्यांना…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. *संस्थाध्यक्ष आबासाहेब शिवाजीराव पाटील, सचिव डॉ. चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापक उमाकांत बुंदेले, दीपक पाटील यांच्या हस्ते दीप्रज्वलन तसेच देवी सरस्वती आणि आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना “स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व वीर बिरसा मुंडा यांचे जीवनचरित्र” यावर मार्गदर्शन केले. इ. 2 री ते 12 वीच्या मीरा पावरा, वैष्णवी चौरे, गायत्री राऊत, गंगा बागुल, मनीषा ठाकरे, अजय पावरा, रोशन पावरा, प्रगती पावरा, भाग्यश्री, विनायक चौधरी, नाजिया, रेशली इत्यादी अनेक विद्यार्थ्यानी वीर बिरसा मुंडा यांना आपल्या…

Read More

साईमत सावदा ता.रावेर प्रतिनिधी आजादी का अमृत महोत्सव ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियाना अंतर्गत सावदा शहरातील विविध ८ भागांमध्ये सावदा नगरपरिषद व गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांच्या सहकार्याने शुक्रवारी वृक्षारोपण करण्यात आले. दिवसभरातील या उपक्रमात एकूण ७५ झाडांची लागवड करण्यात आली. मेरी मिट्टी मेरा देश या अभियांनातर्गत वृक्षारोपण या कार्यक्रमास बुधवार दिनांक ९ ऑगस्टपासून प्रारंभ झाला असून विविध ठिकाणी शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रथमच आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियाना अंतर्गत गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. ९ ऑगस्टपासून सुरु झालेल्या ह्या…

Read More