Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»Amalner : भरधाव दुचाकीची भीषण धडक विटनेर येथील ४८ वर्षीय प्रौढाचा मृत्यू
    अमळनेर

    Amalner : भरधाव दुचाकीची भीषण धडक विटनेर येथील ४८ वर्षीय प्रौढाचा मृत्यू

    saimatBy saimatMarch 9, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Amalner: A 48-year-old man from Witner died after being hit by a speeding bike.
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    टाकरखेडा–दहिवद रस्त्यावर अपघात पायी चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

    साईमत/अमळनेर/ प्रतिनिधी

    अमळनेर तालुक्यातील दहिवद गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत एका ४८ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

    पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील विटनेर गावातील रहिवासी पंढरीनाथ विठ्ठल पाटील (वय ४८) हे अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथून दहिवद गावाकडे पायी जात होते. दहिवद गावाजवळील रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकी (क्र. एमएच १९ डीझेड १६४०) ने त्यांना जोरदार धडक दिली.

    या भीषण अपघातात पंढरीनाथ पाटील यांच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र जखमा गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    या घटनेमुळे विटनेर व दहिवद परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शनिवारी (दि. ८) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी सुनील जाधव करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : बॅनरच्या वादातून थेट हल्ला मुकुंद सपकाळे जखमी

    April 11, 2026

    Shocking : प्रेमसंबंधात अडथळा ठरल्याने 6 वर्षीय चिमुकल्याची आईकडून प्रियकरासोबत निर्घृण हत्या

    April 10, 2026

    Crime News: कौटुंबिक वादाचा भयंकर परिणाम : रागाच्या भरात नवऱ्याने बायकोलाच संपवलं”

    April 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.