Author: saimat

चाळीसगावचे चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या ‘शब्दस्पंदन’ चित्र चारोळी संग्रहाचे मुंबईत प्रकाशन साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी। मुंबईत हॉटेल ताज येथे झालेल्या अमेझिंग भारत ९ व्या इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये चाळीसगावचे चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या आगळ्या वेगळ्या अशा ‘शब्दस्पंदन’ चित्र चारोळी संग्रहाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. पुस्तकामध्ये चित्रकार दिनेश चव्हाण यांनी स्वतः चित्र रेखाटली आहे. त्यावर आधारित समर्पक शब्दरचना त्यांची स्वतःची आहे. शिवाय मुखपृष्ठ त्यांनी स्वतः आपल्या कलेच्या माध्यमातून तयार केले आहे. पुस्तकाला धुळ्याचे साहित्यिक, व्याख्याते, प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी यांची प्रस्तावना आहे. पाठराखण जळगावचे साहित्यिक डॉ.मिलिंद बागुल यांची आहे. अनुभवाचे दोन शब्द चित्रकार चेतन कुऱ्हाडे यांचे व आकाशवाणी निवेदिका पूनम बेडसे यांचे आहेत. नाशिकच्या ज्ञानसिंधु प्रकाशनाने…

Read More

तालुका क्रीडा क्षेत्रासाठी पर्वणीच ठरणार साईमत।अमळनेर।प्रतिनिधी। तालुका क्रीडा संकुलासाठी आणखी ६.६६ कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. अमळनेर तालुका क्रीडा संकुलास १०.६६ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती. मात्र, त्यापैकी सुरुवातीला एक कोटी रुपये निधी आला होता. त्यातून हॉल आणि ट्रॅक, कम्पाउंड आदी कामे झाली. परंतु पुढील निधी प्राप्त न झाल्याने क्रीडा संकुल उपयोगात येत नव्हते आणि तेथील बांधकामाची तोडफोड झाली होती. लोखंडी जाळ्या चोरीस गेल्या होत्या. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी हॉलचे नूतनीकरण, रंगरंगोटी, दुरुस्ती, ट्रॅक दुरुस्ती तसेच व्हॉलीबॉल,बास्केट बॉल मैदाने, जॉगिंग ट्रॅक यासाठी जिल्हा क्रीडा…

Read More

आंदोलकांनी पोलीस निरीक्षकांना दिले मागण्यांचे निवेदन साईमत।चोपडा।प्रतिनिधी। तालुक्यातील सकल धनगर समाजाने त्यांच्या जमातीचा अनुसूचित जमातीमध्ये (एस टी) अंमलबजावणी करण्यासाठी सोमवारी, २३ सप्टेंबर रोजी ११:३० वाजता येथील तिरंगा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाज जमातीच्यावतीने, अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) अंमलबजावणी करण्यासाठी पंढरपूर येथे समाज बांधव १५ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. शासनाने अद्यापही त्यांची दखल घेतलेली दिसून येत नाही. म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी व तालुक्यातील धनगर समाजाच्यावतीने महात्मा गांधी उद्यानाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांमार्फत पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम म्हाळके, मोर्या क्रांतीचे आर.सी.भालेराव, चोसाकाचे व्हा.चेअरमन गोपाल धनगर, अरुण…

Read More

वैशालीताई सूर्यवंशी यांनी जिंकली भाविकांची मने साईमत।पाचोरा।प्रतिनिधी। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी उबाठा शिवसेनेच्या नेत्या आणि पाचोरा -भडगाव मतदारसंघांच्या उमेदवारीच्या शर्यतीतील प्रबळ दावेदार स्व.आर. ओ. तात्यापाटील यांच्या कन्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी गेल्या वर्षभरापासून मतदारसंघांत सर्वच स्तरावर संपर्क अभियानाला गती दिली आहे. त्या मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध सामाजिक, अध्यात्मिक, शेतकरी हितांचे कृषी मेळावे, सोबतच महिलांची मने आणि मते आपल्याकडे वळविण्यासाठी महिलांच्या संदर्भातील रांगोळी स्पर्धा, सौभाग्याचे लेणं असलेला हळदीकुंकू कार्यक्रम, रंगपंचमी, होळी, नवरात्री उत्सवाच्या दांडियारास, दीपावली हिंदू मुस्लिम व सर्वच सामाजिक सणांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करणे, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, मार्गदर्शन शिबिर, ज्येष्ठ पुरुष महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर, दहीहंडी, गणपती…

Read More

पाळधीला ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ मोहिमेला भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद साईमत।पाळधी, ता.धरणगाव ।प्रतिनिधी। येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयाबरोबरच गावातील बस स्थानक, PWD कार्यालयात परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र व श्रीराम मंदिर आणि बाजारपेठ परिसर आदी प्रमुख स्थळांची स्वच्छता करण्यात आली. त्याबरोबरच बसस्थानकातील उपस्थित नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विक्रमराव पाटील, प्रतापराव पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय व्ही.बाविस्कर, रासेयोचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोहिमेसाठी सहकार्य करुन अशा अभिनव मोहिमेचे भरभरून कौतुक केले.

Read More

एस.टी.चेआरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक साईमत।पहुर, ता.जामनेर।प्रतिनिधी। येथे सकल धनगर समाजाच्यावतीने पंढरपूर येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातून अंमलबजावणी करण्यासाठी समाजाचे नेते उपोषण करीत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी सकाळी पहूर बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी धनगर समाज जामनेर तालुक्याच्यावतीने साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली.साखळी उपोषणाची सुरुवात येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळ्याचे पूजन करून समाज बांधवांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर, उभी गल्ली, बाजार पट्टा मार्गे बस स्थानकावर येऊन ढोल ताशाच्या निनादात रॅली काढून या ठिकाणी साखळी उपोषणास सुरुवात केली. येथे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी किरण भास्कर पाटील, अमोल अजय पांढरे या धनगर बांधवांनी…

Read More

वक्तृत्व, निबंध, पोस्टर लेखन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद साईमत।पाचोरा।प्रतिनिधी। येथील एम.एम.महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर ‘हिंदी सप्ताह’ चे आयोजन केले होते. सप्ताह अंतर्गत वक्तृत्व, निबंध लेखन, पोस्टर लेखन आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. वक्तृत्व स्पर्धेत १५, निबंध लेखन स्पर्धेत ६० तर पोस्टर लेखन स्पर्धेत ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सप्ताह समापन व पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील लेखक, कवी डॉ. शशिकांत सोनवणे ‘सावन’ उपस्थित होते. पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले होते. मंचावर डॉ.शरद पाटील, नितीन पाटील, ऋषिकेश ठाकूर, डॉ. जे.डी.गोपाळ, डॉ. के.एस.इंगळे, डॉ.एस.बी.तडवी, डॉ. वाय.बी.पुरी, डॉ.…

Read More

महानगरपालिकेला कर भरुनही नागरी सुविधांचा अभाव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पिंप्राळा परिसरातील प्रल्हाद नगरातील गटारी, रस्ते, पथदिवे,ओपन स्पेसला सरंक्षक भिंत बांधून मिळावे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी पिंप्राळा परिसरातील वार्ड दहाच्या नगरसेविका शोभाबाई बारी यांना रविवारी नागरिकांनी साकडे घालून आम्ही महानगरपालिकेला कर भरुनही नागरी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे त्वरित सुविधा करुन द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. शोभाबाई बारी यांचे चिरंजीव अतुल बारी यांना प्रल्हाद नगरमधील नागरिकांनी विविध समस्यांबाबत निवेदन दिले. अतुल बारी यांनी आ.सुरेश भोळे यांच्या निधीतून रस्ते व गटारी करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतांना अपर्णा निकम, सविता पाटील, अंजली बडगुजर, मंगलाबाई पाटील, मीना पाटील, दीपाली चौधरी, संगीता जाधव,…

Read More

 राष्ट्रीय लहुजी ब्रिगेडतर्फे आमरण उपोषणाचा ईशारा साईमत / जळगाव / प्रतिनिधी येथील पिंप्राळा परिसरातील शिंदे नगर भागातील रहदारीच्या जागेवर एक ठेकेदार अनधिकृत बांधकाम करीत असून ते त्वरित थांबवावे अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा ईशारा राष्ट्रीय लहुजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेश चिटणीस कैलास अप्पा सोनवणे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.   या बाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पिंप्राळा परिसरातील शिंदे नगर भागातील गट नं 2/2 ब चा समोरील पूर्व दिशेला रहदारीच्या रस्त्यावर या परिसरातील कोणीतरी ठेकेदार हा सदर जागा बळकावण्याच्या उद्देशाने सार्वजनिक जागेवर अनधिकृत व बेकायदेशीर पणे बांधकाम करीत आहे.  त्या जागेवर बांधकाम झाल्यास परिसरातील नागरिकांना येण्या जाण्याचा वापर…

Read More

वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे बसणार चाप साईमत।मालेगाव।प्रतिनिधी। शहरात विनाहेल्मेट, विना लायसन्स, फोनवर बोलणे, विना सिटबेल्ट, अवजड वाहने, बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. १ जानेवारी २०२४ ते १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत वाहतूक शाखेने १३ हजार ५२७ वाहनांवर कारवाई केली होती. या कारवाईपैकी १६९ वाहनांकडून दंड वसूल केला आहे. वाहतूक शाखेला ६ लाख ४४ हजार ६०० रुपये दंड जमा झाला आहे. शहरात बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे मनमर्जीने वाहने चालविणाऱ्यांवर ई-मशिनद्वारे ऑनलाईन दंड दिला जातो. ५०० रुपयांपासून ते २ हजारापर्यंत दंड ठोठावला जातो. येथे दुचाकी, चारचाकी, तीनचाकी रिक्षा, अवजड वाहने, अवैध पार्किंग, विनाहेल्मेट, मोबाईलवर बोलणे, विरुद्ध बाजूने वाहन…

Read More