पुणे : खास प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पालकमंत्री श्री.पाटील यांनी स्वतः उपक्रमाचा शुभारंभ कोथरुडमधील आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वज उभारुन केला आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सांगता ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमाने होत असून त्याचाच एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम गतवर्षीप्रमाणे राबविण्यात येत आहे. गतवर्षी या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रत्येक देशवासीयांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन आपला…
Author: saimat
रायपूर : वृत्तसंस्था प्रेमी युगुलात वाद होताच प्रेयसी हायटेन्शन टॉवरवर चढल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. प्रेयसी टॉवरवर चढताच तिची समजूत काढण्यासाठी प्रियकरही तिच्या पाठोपाठ टॉवरवर चढला. छत्तीसगडच्या गौरेला-पेण्ड्रा-मरवाही जिल्ह्यातील या घटनेची सर्वत्र चर्चा झाली. आता या घटनेमागची गोष्ट उघडकीस आली आहे. जिल्ह्याच्या नेवरी गावात राहणाऱ्या अनिताचा विवाह ६ वर्षांपूर्वी झाला. लग्नानंतर ४ वर्ष सगळे व्यवस्थित सुरू होते. अनिताला एक मूल झाले मात्र त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाले. त्यानंतर अनिता मुलाला पतीजवळ ठेवून गौरेलातील तिच्या माहेरी परतली. अनिता एका दुकानात काम करू लागली. तिथे तिची ओळख एका तरुणाशी झाली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांना लग्न करायचे होते. अनिताच्या…
नवीदिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेचे सदस्यत्व परत मिळाल्यानंतर संसदेत केलेल्या पहिल्याच भाषणात मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केल्याचा हल्लाबोल केला मात्र, या भाषणापेक्षा त्यांनी लोकसभेतून जाताना केलेल्या एका कृतीची सध्या जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. लोकसभेतून बाहेर पडताना राहुल गांधींनी सत्ताधारी बाकांकडे बघून ‘फ्लाइंग किस’ दिल्याचा दावा मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. त्यानंतर भाजपाच्या २२ महिला खासदारांनी याविरोधात लोकसभा अध्यक्षांना पत्रही लिहिले आहे मात्र, राहुल गाधींच्या त्या कृतीचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. नेमके काय घडले लोकसभेत? लोकसभेत राहुल गांधींनी मणिपूरच्या मुद्द्यावर मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर भाषण झाल्यानंतर सत्ताधारी…
मुंबई ः प्रतिनिधी नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यापाठोपाठ आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील घडामोडींच्या निमित्तानेही राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयएए लीडरशिप अवॉर्ड्सच्या निमित्ताने बुधवारी संध्याकाळी मुंबईत जाहीर मुलाखत झाली.या मुलाखतीमध्ये इतर मुद्द्यांबरोबरच आपल्या राजकीय भूमिकांवरही देवेंद्र फडणवीसांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांना ‘ब्रँड पॉलिटिशियन’बाबत विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. “जो बिकता है,उसीपर ज्यादा चर्चा होती है.राजकारण तसेच आहे. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर देशात झालेल्या चित्रपटांमध्ये सावकार खलनायक असायचे. शोलेच्या काळात डाकू खलनायक असायचे. त्यानंतर तस्कर खलनायक असायचे.…
नवीदिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील देश आर्थिक संकटातून जात आहे परंतु अशा काळातही भारताची अर्थव्यवस्था मजबुतीने उभी आहे, असा दावा करीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशातली वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेवरील प्रश्नावर लोकसभेत उत्तर दिले.सीतारमण म्हणाल्या, “जगभरातली वाढती महागाई आणि घसरलेला विकास दर हा चिंतेचा विषय आहे.२०२२ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था केवळ ३ टक्क्यांच्या वर गेली आहे. जागतिक बँकेच्या मते २०२३ मध्ये जागतिक विकास दर २.१ टक्क्यांपर्यंत खाली जाईल. ब्रिटनमधली परिस्थिती सर्वात बिकट आहे. दरम्यान, यावेळी विरोधकांवर हल्लाबोल करत अर्थमंत्री म्हणाल्या, तुम्ही आश्वासने देण्यात दंग राहिलात आणि आम्ही काम करण्यात व्यस्त राहिलो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे चित्र बदलले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण…
अलिबाग : वृत्तसंस्था मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सकाळी अकरा वाजता महामार्गावर वाकण फाटा येथे हे आंदोलन करण्यात आले. स्थानिक लोप्रतिनिधींनी विरोधात बोंबाबोंब करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. अनेक प्रयत्न करूनही महामार्गाच्या कामाला गती मिळू शकलेली नाही. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे, प्रवाशांचे आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत. वडखळ ते इंदापूर या मार्गाची सध्या चाळण झालेली आहे. महामार्गाच्या या दुरावस्थेकडे कोकणातील लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आणि ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख, मिलिंद आष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे…
संभाजीनगर : प्रतिनिधी औरंंगाबाद खंडपीठाने फटकारल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मागील काही काळात शहरातील सिडको भागातील अतिक्रमणाविरोधात कारवाई केली होती मात्र, मागील काही दिवसांत तुरळक कारवाई होताना पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने शहरातील लक्ष्मण चावडी चौक ते कैलास नगर समशान भूमी डीपी रस्त्यावरील १५ अतिक्रमण काढले आहेत. यावेळी पोलिसांचा देखील बंदोबस्त पाहायला मिळाला. विशेष म्हणजे अतिक्रमणधारकांना यापूर्वी मोबदला देऊन अतिक्रमण काढण्यात आले होते. पण, त्यांनी पुन्हा अतिक्रमण केले असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत लक्ष्मण चावडी ते पुढील चौकापर्यंत ८० फूट आणि नंतर ६० फूट या डीपी रस्त्यावरील एकूण १५…
सिंधुदुर्ग : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील एका गावाने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील किंजवाडे ग्रामपंचायतीने एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. गावातील नवविवाहित दाम्पत्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक गोष्ट करावी लागणार आहे. नवविवाहित जोडप्यांना दोन झाडे लावावी लागणार आहेत. त्यांचबरोबर लोकांना त्या झाडासोबत दोन फोटोही जमा करावे लागणार आहेत. त्यानंतरच ग्रामपंचायत मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जारी करणार आहे. हा नियम ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. किंजवाडे गावाचे सरपंच संतोष किंजवाडेकर आणि ग्रामसेवक शिवराज राठोड हे आहेत. दोघांनीही गावा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि स्मार्ट गाव बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्यस्तरावर गाव आणण्यासाठी गावात नवीन…
नागपूर : वृत्तसंस्था सिंचन घोटाळा प्रकरणात भाजपने अजित पवार यांची सर्वाधिक बदनामी केल्यावरही बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत फलकावर अजित पवार यांच्या बरोबरीतच देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्राला स्थान देऊन दोन्ही नेते साथसाथ असल्याचा संदेश दिला आहे. नागपुरातील छत्रपती चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने भलामोठा स्वागत फलक लावला आहे. तो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वाशीम जिल्हा परिषद अध्यक्षाने लावलेल्या या फलकावर उपमुख्यमंत्रीद्वय अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचे सारखे छायाचित्र आहे. सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची सर्वाधिक बदनामी भाजपनेच केली. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दरवर्षी नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान या प्रकरणात एक गुन्हा दाखल केला जायचा. त्यावरून तेव्हा विरोधी…
मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत रविवारी रंगशारदा सभागृहात शिवसेना(ठाकरे गट) आणि संभाजी ब्रिगेडचा संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस आता ‘मस्टर मंत्री’च राहणार की काय? ते फक्त कोण आला, याची नोंद ठेवणार? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावे लागले, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.“ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत…