Author: saimat

आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लागल्या रांगाच रांगा साईमत/रावेर/विशेष प्रतिनिधी बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर रावेरजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना होणाऱ्या त्रासामुळे आंदोलनाचे आयोजन केले होते. हे आंदोलन शासकीय विश्रामगृहाजवळ शेतकरी नेते सुरेश चिंधू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या कारणास्तव स्थानिक शेतकरी आणि वाहनधारकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. सुमारे २० मिनिटे वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनात जे.जे. पाटील, दिनेश सईमिरे, जितेंद्र कोळी, स्वप्निल चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, प्रमोद कोळी, सुपडू राजपूत, प्रशांत पाटील, घनशाम पाटील,…

Read More

मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसोबत यशाचा आनंद साजरा साईमत/मलकापूर/प्रतिनिधी थल सेना कॅम्पवरून परतलेल्या साक्षी वानखेडेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. एनसीसीत सहभागी असलेल्या प्रत्येक कॅडेटचे स्वप्न असते की, ते कर्तव्य पथावर (राजपथावर) मार्च करतील आणि यासाठी प्रजासत्ताक दिन कॅम्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याचसोबत थल सेना कॅम्प (टीएससी) खूप महत्त्वाचा आहे. ज्यामध्ये ऑफ स्टॅकल, फायरिंग, जजिंग डिस्टन्स अँड फील्ड सिग्नल, मॅप रीडिंग आणि हेल्थ अँड हायजिन असे पाच महत्त्वाचे इव्हेंट असतात. जनता कला, वाणिज्य महाविद्यालयातील ज्युनियर अंडर ऑफिसर साक्षी चंद्रकांत वानखेडे यांनी राष्ट्रीय स्तरावरील थल सेना कॅम्प (टीएससी) दिल्ली येथे फायरिंग स्पर्धेत सहभाग घेतला. साक्षीच्या यशाचा आनंद मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला.…

Read More

पत्रकार परिषदेत आ.चंद्रकांत पाटील माजी मंत्री खडसेंवर ‘कडाडले’ साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी येथे आ.चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी, १८ ऑक्टोंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत महायुती सरकारच्या विकास कामांचा आणि जनकल्याण योजनांचा सविस्तर आढावा घेतला. सरकारने सादर केलेल्या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून त्यांनी विविध योजनांचा उल्लेख केला. आ.एकनाथ खडसे यांच्या वृत्तीला आपला विरोध आहे. महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार आहे. तसेच मुंडोळदे ते सुलवाडी पूल करून दाखवा, असे आव्हान देणारे माझा सत्कार कधी करतील, त्याची मी वाट पाहत आहे. आमदार पाटील यांनी आमदार खडसेंचा चांगलाच समाचार घेऊन त्यांच्यावर कडाडल्याचे दिसून आले. महायुती सरकार हे एकमेव असे सरकार आहे, जे विकास आणि कल्याण या दोन्ही घटकांना प्राधान्य…

Read More

सोळा कुलस्वामिनी महामंडळाच्या तीन अशासकीय सदस्यात भावेश कोठावदे साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी राज्य सरकारने लाडशाखीय वाणी समाजासाठी मंजूर केलेल्या सोळा कुलस्वामिनी महामंडळाच्या तीन अशासकीय सदस्यांमध्ये येथील समाजाचे युवा कार्यकर्ते भावेश कोठावदे यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा आ.मंगेश चव्हाण यांनी केली. गेल्या गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समाजासाठी मंजूर केलेल्या सोळा कुलस्वामिनी महामंडळासाठी आमदार चव्हाण यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे समाजातर्फे त्यांचा सत्कार रविवारी वाणी मंगल कार्यालयात समाजाचे धुळे येथील समाजाला ओबीसीचा दर्जा मिळवून देणारे समाजाचे नेते सुनील नेरकर यांच्या उपस्थितीत आयोजित केला होता. त्याप्रसंगी त्यांनी जाहीर केले.कोठावदे हे टाकळी प्र. चा. (ता.चाळीसगाव) येथील ग्रामपंचायत सदस्य, भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव,…

Read More

मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्धार साईमत/अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या निवडणुकीत ‘महायुतीचाच’ झेंडा फडकविणार असल्याचा निर्धार मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महायुतीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष विजय राजपूत, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पवार, शहराध्यक्ष संजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणा लावण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. महायुतीच्या विजयासाठी व्यूहरचना काय असावी, याबाबत सर्वांची मते जाणून घेण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही…

Read More

चोपडा शहरातील गौतम नगरातील घटना साईमत/चोपडा/विशेष प्रतिनिधी शहरातील गजबजलेल्या गौतमनगर भागात बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पायी फिरणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत धूम स्टाइलने समोरून पल्सर मोटारसायकलने येत दोन तरुणांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. आशा प्रल्हाद बिऱ्हाडे (वय ५४) या बुधवारी, १६ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरातील गौतमनगर भागातील रस्त्यावरून फिरण्यास जात असताना समोरून अचानक वेगात विना नंबर प्लेटची दुचाकी आली.त्यावर तोंड बांधून बसलेल्या युवकांनी बिऱ्हाडे यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत तोडून धूम स्टाइलने पोबारा केला. दोघेही चोरटे तरुण हे २५ ते ३० वयोगटातील असावेत, असा अंदाज आहे.…

Read More

चांदसर गावात पसरली शोककळा साईमत/धरणगाव/विशेष प्रतिनिधी ट्रॅक्टरला रोटाव्हेटर जोडत असतांना अचानक रोटाव्हेटर सुरू झाल्याने ५९ वर्षीय शेतकऱ्याचा पाय अडकल्याने ते गंभीर जखमी झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी नातेवाईकांनी एकाच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. रमेश सुखा कोळी (वय ५९, रा. चांदसर, ता.धरणगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे रमेश कोळी हे आपल्या पत्नी, दोन मुले आणि सुना यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात.…

Read More

विचखेडा गावाच्या अलीकडे कारवरील चालकाचा ताबा सुटला साईमत/पारोळा/विशेष प्रतिनिधी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील विचखेडे गावाच्या अलीकडे धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला सुमारे पाचशे फूट फेकली जाऊन चार वेळा उलटली. त्यात कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राहुल भाऊसाहेब अहिरे (वय २८) आणि निलेश सुरेश पाटील (वय २३, रा. तरवाडे, जि. धुळे) असे मृतांची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सविस्तर असे की, पारोळाकडून धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कारमध्ये निलेश पाटील, गोविंद भास्कर राडोड (वय २४, रा. तरवाडे), राहुल अहिरे असे तिघे आणि महेश…

Read More

धानोऱ्यातील बैठकीत प.पू.जनार्दन हरीजी महाराज यांचे प्रतिपादन साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी येथे गेल्या रविवारी रात्री ९ वाजता दुर्गोत्सव मिरवणुकीत दोन गटात किरकोळ कारणावरून हाणामारीसह दगडफेक करण्यात आली होती.त्यात दोन्ही गटातील काही लोक जखमी झाले होते. याप्रकरणी परस्परांनी अडावद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरुन काहींना अटकही केली आहे. सर्व घटनेनंतर मंगळवारी, दुपारी १ वाजता धानोऱ्यातील संत देवा महाराज भक्त निवासात फैजपुरचे महामंडलेश्वर प. पू. जनार्दन हरीजी महाराज यांनी दोन्ही गटातील लोकांना एकत्रित बोलावून घडलेली घटना दुदैवी आहे. त्यामुळे गावात शांतता राखण्यासाठी सामाजिक एकोपा महत्त्वाचा आहे. तसेच समाजातील टवाळखोर मुलांना सुधारण्याची गरज आहे. अशा घटनांमुळे समाजाची हानी होते. आम्ही संत मंडळींनी हिंदू धर्मासाठी जीवन…

Read More

गणपूर शाळेत महावाचन प्रकल्पाअंतर्गत लेखक राजेंद्र पारे यांचे प्रतिपादन साईमत/चोपडा/प्रतिनिधी स्वतःला परिस्थितीशी झगडत यशस्वी शिखर गाठणाऱ्या बालकाची गोष्ट म्हणजेच ‘धावपट्टीवरचा अनोखा प्रवास’ ही कादंबरी होय. हरलेल्या परिस्थितीत तो बालक पुढे इतरांसाठी आदर्शवत ठरला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हार न मानता झगडत राहिले पाहिजे. त्यामुळे यश हमखास मिळते. वाचनाने माणसात प्रगल्भता वाढते. मन समृद्ध होते. त्याची विचार करण्याची क्षमता वाढते. वाचन संस्कृतीचा विकास झाला पाहिजे. म्हणून विद्यार्थी दशेतून अवांतर वाचनाची गोडी लावली पाहिजे, असे प्रतिपादन लेखक राजेंद्र पारे यांनी केले. चोपडा तालुक्यातील गणपूर येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळा येथे वाचन संस्कृतीचा विकास व्हावा, या उद्देशाने महावाचन प्रकल्पाअंतर्गत राजेंद्र पारे लिखित ‘धावपट्टीवरचा…

Read More