पुणे ः हौसिंग प्रोजेक्टवेळी बहुतांश नागरिकांना बिल्डरच्या त्रासाला सामोरे जावे लागते.वारंवार तक्रार करुन ही बिल्डरवर कारवाई होत नाही. त्यामुळे घर मालकांचे पैसे बुडाल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. दरम्यान पुण्यातील एका घटनेत ग्राहकांचे पैसे बुडवणाऱ्या बिल्डरना दणका देण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाकडून बिल्डरविरोधात ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेत बिल्डरकडून तीस कोटींची वसुली करण्यात आली आहे. रेरा कायद्यामुळे हौसिंग प्रकल्पातील घर मालकांना हा दिलासा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. अनेक बिल्डर घराचे खूप मोठमोठे स्वप्न दाखवतात. पण प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही.घरांचे प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने ग्राहक हवालदिल होतात. पुण्यातील एका घटनेत बिल्डरांकडे अडकलेले तीस कोटी रुपये जिल्हा…
Author: saimat
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘इंडिया’च्या तिसऱ्या बैठकीनंतर केंद्र सरकार विचलित झाले आहे. यामुळेच एक देश, एक निवडणूक हा प्रयोग राबवण्याचा विचार आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, “‘इंडिया’च्या तिसऱ्या बैठकीनंतर केंद्रातील सरकार विचलित झाले आहे. ‘एक देश, एक निवडणूक’साठी केंद्र सरकारला बहुमताचा आकडा गाठणे शक्य आहे का? सध्या १२ राज्यातील मुख्यमंत्री विरोधी पक्षांचे आहेत. अशा स्थितीत त्यांच्याशी चर्चा करणे आणि बहुमताचा आकडा गाठणे सरकारला शक्य आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखालील समितीला यावर…
पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरण्यात आला आहे मात्र उच्च शिक्षणात विद्यापीठांकडून विविध विद्याशाखांतील पाठ्यपुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्याबाबत काहीच हालचाली करण्यात आल्या नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे आता विद्यापीठांना सर्व पाठ्यपुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्यासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या संदर्भातील निर्देश परिपत्रकाद्वारे दिले.राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळण्यासाठी अनुषंगाने राज्यातील तंत्रनिकेतनांमध्ये मराठीतून अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच अभियांत्रिकी विद्याशाखेची पाठ्यपुस्तके मराठीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ स्तरावरील इंग्रजी भाषेत असलेली पाठ्यपुस्तके मराठीतून उपलब्ध करण्याबाबत झालेल्या…
मुंबई ः प्रतिनिधी दिड वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट वेगळा झाला आणि उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले. तेव्हापासून शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे व टोलेबाजीचे राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये सध्या इंडिया आघाडीची बैठक चालू आहे.या बैठकीवरून शिंदे गटाच मंत्री दीपक केसरकर यांनी खोचक शब्दांत टीका केल्यानंतर त्यावरून आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे तसेच त्यांनी अजित पवारांचाही उल्लेख केला आहे. काय म्हणाले होते केसरकर? इंडिया आघाडीच्या निमित्ताने शिवसेनेवर टीका करणाऱ्या काँग्रेससोबत सध्या ठाकरे गट बसल्याचा मुद्दा उपस्थित करत दीपक केसरकरांनी टीका केली होती. “बाळासाहेबांच्या मुंबईत चालू असलेली लाचारी…
यावल : प्रतिनिधी कोणतीही अधिकृत पदवी नसताना यावल तालुक्यात बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी यावल तालुक्यातील वैद्यकीय व्यावसायिकांनी यावल तहसीलदार आणि यावल गटविकास अधिकाऱ्यांना गुरुवारी, ३१ ऑगस्ट रोजी निवेदन दिले. गेल्यावर्षी २१ जून २०२२ रोजी तालुक्यात बनावट वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध अर्ज दाखल केला होता. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. कार्यवाही करण्यात आली असती तर कोरपावली येथील घटना घडली नसती. विशेष म्हणजे अद्याप गेल्या दोन दिवसात कोरपावली येथील घटनेचा गुन्हा नोंद झालेला नाही. कार्यालयाअंतर्गत गुन्हा नोंद व्हावी व इतर बनावट डॉक्टरांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे नमूद केले आहे. निवेदन देतेवेळी यावल व तालुक्यातील…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील बामणोद येथील महिला मंडळ अधिकारी तथा सर्कल यांची साकळी, शिरसाड परिसरात वाळूसाठा देखरेखसाठी पर्यवेक्षक म्हणून नेमणूक केली होती. त्याठिकाणी त्या जात असताना रस्त्यात एक वाळू तस्कर ट्रॅक्टरसह ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अवैध वाळू वाहतूक करीत असताना आढळून आला. त्यामुळे त्यांनी त्याला थांबवून विचारपूस केली. वाळू वाहतुकीचा परवाना आहे किंवा नाही, याबाबतची माहिती त्याच्याकडून घेत असताना वाळू तस्कराने मंडळ अधिकारी तथा सर्कल बबीता चौधरी यांना दमदाटी व शिवीगाळ करून ढकलून दिले. तसेच वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलायन केले. साकळी मंडळात वाळू तस्कराकडून मंडळ अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची ही तालुक्यातील दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी शासकीय कामे कसे करावे?…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ स्पोर्ट्स ॲड रनर्स असोसिएशनचे शेकडो पुरुष व महिला धावपटू दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी एकत्रित धावण्याचा सराव करीत असतात. या धावपटूंमध्ये एक कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. महिला व पुरुष धावपटू भाऊ बहिणींच्या पवित्र नात्याने संपूर्ण भुसावळ शहरास सुदृढ आरोग्याचा संदेश देतात. त्यामुळे यावर्षी सर्व पुरुष व महिला धावपटूंनी एकत्रित क्रीडांगणावर ‘रक्षाबंधन’ सण साजरा केला. सुरुवातीस सकाळी ५.३० ते ६.३० दरम्यान प्रत्येक धावपटूने ७ ते ८ कि.मी. धावून अंतर पूर्ण केले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर परतल्यावर सर्व महिला धावपटूंनी सर्व पुरुष धावपटूंना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या नात्यातील स्नेह व गोडवा वृद्धिंगत केला. यावेळी सर्व पुरुष धावपटूंनी कृतार्थ…
मलकापूर : प्रतिनिधी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्यावतीने साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, यासह मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी अनु.जातीमध्ये वर्गवारी व्हावी, बार्टीच्या धर्तीवर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना व्हावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोशल फोरमचे प्रदेश सरचिटणीस निवृत्ती तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि राजेंद्र वानखेडे तथा विजय पारेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी, ३१ ऑगष्ट रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मलकापूरला उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख यांना धरणे आंदोलनस्थळी लेखी निवेदन देण्यात आले. आंदोलनाला उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख तथा मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्यासह काँग्रेसचे…
मलकापूर : प्रतिनिधी तालुका क्रीडा संकुल मलकापूर, जि.बुलढाणा येथे सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन, बुलढाणा व स्पोर्टस झोन ऑफ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य स्पर्धेत प्राविण्य प्राप्त अशा २८ खेळाडूंचा सत्कार सोहळा नुकताच झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजेश्वर खंगार, चंद्रकांत साळुंखे तसेच सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे बुलढाणाचे सचिव विजय पळसकर, गणेश खर्चे, संदीप शिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. गतवर्षी झालेल्या राज्यस्तर शालेय व ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडू यांचा सत्कार पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विजय पळसकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. सत्कारार्थी खेळाडूंमध्ये स्पर्श तायडे, मयंक पळसकर, कार्तिक कुदळे, सार्थक जोगदंड, लोकेश चांडक, तनिष्क तायडे, ज्ञानेश…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव बु. ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच निवड अडीच वर्षासाठी राहील. त्यानंतर इतर सदस्यांना सरपंच, उपसरपंच पद देण्यात येईल, असा शब्द माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांनी इतर सदस्यांना दिला होता आणि आहे. त्यानुसार उपसरपंच लूकमान तडवी यांनी ठरल्याप्रमाणे १२ ऑगस्ट २०२३ रोजी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. परंतु ऑगस्ट २०२३ हा महिना संपत आल्यावरही किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत महिला सरपंच निर्मला संजय पाटील यांनी अद्यापही राजीनामा न दिल्याने किनगावात चर्चेला उधाण आले आहे. माजी आमदार रमेश चौधरी यांनी ग्रामपंचायत सदस्यांना दिलेला शब्द खरा ठरणार किंवा नाही..? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. किनगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक माजी आमदार…