दिल्ली ः वृत्तसंस्था राजधानीत एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने ७० हजार रुपयांत स्वत:साठी पत्नी खरेदी केली पण, नंतर पत्नी न सांगता सासरी जात असल्याने व्यक्ती संतापला. याच रागातून व्यक्तीने महिलेचा खून करत मृतदेह जंगलात फेकून दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. डीसीपी चंदन चौधरी यांनी सांगितले की, दिल्लीतील फतेहपूर बेरी परिसरामधील जंगलात एका महिलेचा मृतदेह असल्याचा फोन शनिवारी आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आहे. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी परिसरात आलेल्या गाड्यांची माहिती घेतली. दिल्लीतील छतरपूरमधील गदईपूर बांध रोड परिसरात राहणाऱ्या अरुण याची ही रिक्षा असल्याचे समोर आलं.…
Author: Kishor Koli
मुंबई ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. मलिक यांना दोन महिन्यांसाठी हा जामीन देण्यात आला आहे.दरम्यान, नवाब मलिक तुरुंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. ते तुरुंगात जाण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्ष एकसंघ होता पंरतु, आता या पक्षात अजित पवारांचा एक आणि शरद पवारांचा एक असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता तुरुंगातून बाहेर आल्यावर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नवाब मलिक काही वेळाने रुग्णालयातून बाहेर पडणार आहेत. तत्पूर्वी रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, नवाब मलिक यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार…
अमरावती ः प्रतिनिधी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष संभाजी भिडे हे स्वातंत्र्य दिनी राज्यात भगवा रॅली काढणार आहे.या रॅलीला आता जोरदार विरोध होत आहे. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भिडेंना अटक करा, अशी मागणी केली आहे. पत्रकारांशी रविवारी बोलताना यशोमती ठाकूर यांनी सांगितले की, तिरंगा हा देशाचा अभिमान आहे. तिरंग्याचा अपमान कोणीही सहन करणार नाही.स्वातंत्र्यदिनी भगवा रॅली काढणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करणे गरजेचे आहे. भिडेंवर टीकेची झोड महात्मा गांधींचे वडील करमचंद नसून एक मुस्लीम जमीनदार आहेत, असे वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केले होते. त्यामुळे काँग्रेस भिडेंविरोधात आक्रमक झाला आहे. संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी काँग्रेसने केली आहे. महात्मा गांधींंचे पणतू तुषार…
चेन्नई : वृत्तसंस्था भारतीय संघाने आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे.अंतिम सामन्यात भारताने एका टप्प्यावर दोन गोलने पिछाडीवर असताना मलेशियाचा ४-२ असा पराभव केला. उत्तरार्धापर्यंत मलेशियाचा संघ ३-१ असा आघाडीवर होता. भारताने चौथ्यांदा आशियाई हॉकी चॅम्पियनशीपचे विजेतेपद पटकावले आहे. भारत ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारा देश बनला आहे. पाकिस्तानच्या नावावर ३ किताब आहेत. भारताकडून जुगलराज सिंह (१९ व्या मिनिटाला),हरमनप्रित सिंह (४५ व्या मिनिटाला),गुरजंत सिंह(४५व्या मिनिटाला)आणि आकाशदीप सिंह(५६ व्या मिनिटाला)यांनी गोल डागले तर तिकडे मिलेशियासाठी अजराई अबू कमाल, रजी रहीम आणि एम. अमीनुद्दीन यांनी गोल केले. या अंतिम मुकाबल्यात गोलची सुरुवात भारताकडून झाली. खेळाच्या ९ व्या मिनिटाला जुगलराज…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताने उत्तरेकडील क्षेत्रातील फॉरवर्ड एअरबेसवर प्रगत हेरॉन मार्क- ड्रोन तैनात केले आहेत. हे ड्रोन लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसह शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहेत.याशिवाय एकाच फ्लाइटमध्ये चीन-पाकिस्तान या दोन्ही सीमांवरही नजर ठेवली जाऊ शकते. हेरॉन मार्कड्रोन इस्त्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने बनवले आहेत. हे ड्रोन ३५ हजार फूट उंचीपर्यंत १५० नॉट्सच्या वेगाने उडू शकतात. याशिवाय ते एकावेळी ३६ तास उड्डाण करण्यास सक्षम आहेत. एक दिवस आधी, भारतीय वायुसेनेने श्रीनगर एअरबेसवर प्रगत मिग-२९ लढाऊ विमानांचा एक स्क्वॉड्रन तैनात केला आहे.उत्तर सेक्टरमध्ये मिग-२९ आणि हेरॉन मार्क-२ ड्रोन तैनात केल्यामुळे लष्कराची ताकद वाढणार आहे. या ड्रोनमध्ये हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, हवेतून जमिनीवर…
पुणे ः प्रतिनिधी अजितदादा आणि शरद पवार यांची पुण्यात शनिवारी गुप्त बैठक झाली असली तरी राज्यभरात सध्या तिची चर्चा सुरू आहे. दोघांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याचा तपशील आता समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यासोबत उरलेल्या आमदार, खासदारांनी आमच्यासोबत यावे.आमच्या निर्णयाला शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत, अशी गळ अजित पवारांनी यावेळी शरद पवारांना घातली, अशी माहिती आहे. दिल्लीलाही होती माहिती विशेष म्हणजे या गुप्त बैठकीची पूर्वकल्पना दिल्लीलाही होती. सगळ्या परिस्थितीवर दिल्लीचे वरिष्ठ नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारीक लक्ष ठेवून होते. पूर्वनियोजित आखणीनुसार हे चालू होते, असेही सांगितले जात आहे. अन्य खासदारांना पाठवा प्राप्त माहितीनुसार,आधी पुण्यातील एका…
पुणे : येथील चांदणी चौकातील पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थिती होती. चांदणी चौकातील या भव्यदिव्य पुलासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी म्हणाले, “पुण्यासाठी ४० हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पुण्यात आता डबल इंजिन लागले आहे. एक दादा होते, आता दोन दादा झाले आहेत. त्यामुळे दोघांनी मनात आणलं तर त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा विकास होणारच आहे. पुण्याला पाणी, हवा आणि ध्वनी प्रदूषणातून मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी ः वृत्तसंस्था उदय सामंत फाऊंडेशन व रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय आमंत्रितांची रत्नागिरी कॅरम लीग सिझन ६ आज रविवार दि. १३ रोजी सायंकाळी ५ वाजता येथील देसाई बोँट हॉल, येथे प्रारंभ होत आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत व्हिक्टोरियन्स, कॅरम मास्टर्स, सत्यशोधक स्ट्रायकर्स, शिवगर्जना लायन्स, कॅरम लव्हर्स, जैन सुप्रिमोस, मुंबई मास्ट्रोस आणि यंगस्टर्स असे एकंदर ८ संघ खेळणार असून यात महाराष्ट्रातील तब्बल ४० नामांकित खेळाडूंचा समावेश असेल.भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑइल, इन्फिगो आय केअर, ओएनजीसी व पितांबरी यांचा पुरस्कार लाभलेल्या या लीगमध्ये विश्व्विजेते संदीप दिवे, प्रशांत मोरे, योगेश परदेशी तसेच आंतरराष्ट्रीय कॅरमपटू महम्मद घुफ्रान, संदीप देवरुखकर,…
मुंबई ः प्रतिनिधी सनी देओल आणि अमिषा पटेलचा बहुचर्चित चित्रपट गदर-२ शुक्रवारी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला आहे. २००१ मध्ये आलेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. प्राप्त माहितीनुसार गदर २ ने प्रदर्शनाच्या पहिल्यात दिवशी ४० ते ४५ करोड रुपयांची कमाई केली आहे.या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता. तब्बल २० लाख तिकिट ॲडव्हान्स बुकिंगमध्ये विकली गेली होती.पठाणनंतर हा वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड’ चित्रपट चांगलाच गाजला होता. शुक्रवारी…
मुंबई ः प्रतिनिधी सनी देओल आणि अमिषा पटेलचा बहुचर्चित चित्रपट गदर-२ शुक्रवारी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला आहे. २००१ मध्ये आलेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. प्राप्त माहितीनुसार गदर २ ने प्रदर्शनाच्या पहिल्यात दिवशी ४० ते ४५ करोड रुपयांची कमाई केली आहे.या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता. तब्बल २० लाख तिकिट ॲडव्हान्स बुकिंगमध्ये विकली गेली होती.पठाणनंतर हा वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड’ चित्रपट चांगलाच गाजला होता. शुक्रवारी…