७० हजार रुपयांत विकत घेतली पत्नी पण नंतर पतीने संतापात केली हत्त्या

0
3

दिल्ली ः वृत्तसंस्था

राजधानीत एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने ७० हजार रुपयांत स्वत:साठी पत्नी खरेदी केली पण, नंतर पत्नी न सांगता सासरी जात असल्याने व्यक्ती संतापला. याच रागातून व्यक्तीने महिलेचा खून करत मृतदेह जंगलात फेकून दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे.

डीसीपी चंदन चौधरी यांनी सांगितले की, दिल्लीतील फतेहपूर बेरी परिसरामधील जंगलात एका महिलेचा मृतदेह असल्याचा फोन शनिवारी आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आहे.

यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी परिसरात आलेल्या गाड्यांची माहिती घेतली. दिल्लीतील छतरपूरमधील गदईपूर बांध रोड परिसरात राहणाऱ्या अरुण याची ही रिक्षा असल्याचे समोर आलं. पोलिसांनी अरुणला ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा धक्कादायक खुलासे समोर आले.

अरुणने पोलीस तपासात सांगितले की, “मृत महिलेचे नाव स्विटी आणि पतीचे नाव धरमवीर आहे.धरमवीर, सत्यवान आणि मी स्विटीचा खून केला. दिल्ली-हरियाणा सीमेजवळ असलेल्या नांगलोई परिसरात स्विटीचा गळा दाबून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला.” जंगलाच्या परिसराची पहिल्यापासून माहिती असल्याने मृतदेह तिथे फेकल्याचे अरुणने म्हटलं.

खूनाचे कारण सांगत अरुण म्हणाला, “धरमवीर पत्नीच्या वर्तवणुकीवरून नाराज असायचा. स्विटी सतत न सांगता महिनो-महिने आपल्या सासरी जायची.धरमवीरने स्विटीला ७० हजार रुपयांत विकत घेतले होते.पोलिसांनी आरोपींविरोधात खूनासह पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here