नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये जबरदस्त खेळी केली आहे. नीरज चोप्राने मेन्स जॅव्हलिन थ्रो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. नीरजने आपल्या पहिल्या प्रयत्नात ८८.७७ मीटर लांब भाला फेकत अंतिम सामन्यात आपली जागा नक्की केली आहे. २७ ऑगस्टला अंतिम सामना खेळला जाणार आहे. नीरज चोप्रा ग्रुप-ए मधून खेळत होता. या गटात अँडरसन पीटर्स आणि ज्युलिअन पीटर्सही होते. ग्रुप-बी मध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम आणि जॅकब वाडलेच यांच्यासारखे स्टार खेळाडू होते. जॅव्हलिन थ्रो स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी ८३ मीटर दूर भाला फेकण्याची अट आहे. नीरज चोप्राने अत्यंत सहजपणे हे अंतर…
Author: Kishor Koli
कोलंबो ः वृत्तसंस्था येत्या ३० ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सरुवात होणार असून १७ सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यंदा पाकिस्तान या स्पर्धेंचे आयोजन करत आहे. हायब्रीड मॉडेलवर ही स्पर्धा होत असून काही सामने पाकिस्तानात तर काही सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.स्पर्धेतला पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळदरम्यान मुलतानमध्ये खेळवला जाणार आहे पण स्पर्धा सुरु होण्याआधीच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. एशिया कप स्पर्धेवर कोरोनाचे सावट पसरले आहे. स्पर्धेवर कोरोनाचे सावट एशिया कप स्पर्धेला काही दिवसांचा अवधी बाकी असतानाच श्रीलंकेतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीलंका क्रिकेट संघाचे दोन खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.सलामीचा फलंदाज…
पुणे ः प्रतिनिधी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे काँग्रेस पक्षातून निलंबित झालेले आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून घरवापसीचे संकेत देण्यात आले आहेत. सत्यजीत तांबे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस पक्षात पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात पक्षाचा आदेश झुगारून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढवली होती. याच कारणामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. यावर आता पुन्हा एकदा सत्यजित तांबे यांनी आपली नाराजी व्यक्त करत मला काँग्रेसमधून टार्गेट करून बाहेर काढल्याचा आरोप केला आहे. मात्र, आजही माझ्या रक्तात काँग्रेस असल्याचे सांगत तांबेंनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. पुण्यातील एसेम जोशी सभागृह…
पुणे : प्रतिनिधी पती आणि पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. लग्नावेळी सात फेरे घेताना पती पत्२नीचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण पुण्यातील एका नराधम पतीने चक्क आपल्या पत्नीचा उपयोग वेश्या व्यवसायासाठी केल्याचे उघड झाले आहे. पुण्यातील हडपसर येथून ही घटना समोर आल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण आहे. पीडित महिला ही तिच्या पती सोबत उंड्री येथे राहायला आहे. तिच्या नवऱ्याला पैसे कमावण्याची लालसा होती. या लालसेपोटी त्याने आपल्या पत्नीला दोन मित्रांच्या मदतीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. अक्षय आवटे असे आरोपी पतीचे नाव असून तो २५ वर्षांचा आहे. यासंदर्भात पीडित पत्नीने आपल्या पती…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जागतिक कुस्ती संघटनेने मुदतीत निवडणूक न घेतल्याने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. याचा मोठा फटका भारतीय कुस्तीपटूंना बसला आहे. आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू तिरंग्याखाली खेळू शकणार नाहीत. १६ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय कुस्तीपटू तटस्थ खेळाडू म्हणून सहभागी होणार आहे. ही स्पर्धा आणखी एका कारणासाठी महत्त्वाची ठरणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय करण्यासाठीही महत्त्वाची असणार आहे. भूपेंद्र सिह बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीला ४५ दिवसात निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पण या आदेशाचे पालन करण्यास समिती अयशस्वी ठरली. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कुस्तीचे कामकाज पाहण्यासाठी २७…
मुंबई : प्रतिनिधी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. आता लवकरच प्राजक्ताचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. ‘तीन अडकून सीताराम’ असे प्राजक्ताच्या अगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात प्राजक्ताबरोबर वैभव तत्तवादी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील दोघांचे लूक समोर आले आहेत. २९ सप्टेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे “कोणाला नाही ऐकत, कोणाला नाही जुमानत..…
सातारा ः वृत्तसंस्था २०२४ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्ष लागले आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस आणि पवार यांचे सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याचा सत्ताधारी पक्षाकडून दावा करण्यात येत आहे. अशातच प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. २०२४ साली प्रहार संघटनेचे १० ते ११ आमदार निवडून येतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बच्चू कडू म्हणाले, साताऱ्यातील माण-खटावमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. उमेदवाराचे नाव अद्याप ठरले नाही. २०२४ साली प्रहारचे १० ते ११ आमदार निवडून येतील. आम्ही बसलो, तर सरकार बसेल. आम्ही उठलो, तर सरकार…
मुंबई ः प्रतिनिधी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशभरात भाजपाविरोधकांवर होत असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राऊतांनी २०२४ मध्ये केंद्रात आणि महाराष्ट्रात आमचंच सरकार येणार असल्याचं म्हणत तपास यंत्रणांना जाहीर इशारा दिला. ते गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत म्हणाले, ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीच्या तयारीला वेग आला आहे. ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. या देशातील भाजपाविरोधी नाही, तर देशभक्त पक्ष एकत्र आले आहेत. देशात भाजपाविरोधी पक्षांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. काल आपण झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये अशा धाडी टाकण्यात आल्या. महाराष्ट्रातही तेच सुरू आहे.…
सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर – पुणे महामार्गावर मोहोळजवळ महिला भाविकांच्या चार चाकी मोटारकारची मालमोटारीला धडक बसून घडलेल्या अपघातात कारचालकासह तीन महिलांचा मृत्यू झाला तर अन्य सहाजण जखमी झाले. सर्व मृत व जखमी अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगाव (ता. पारनेर) येथील राहणारे आहेत. बुधवारी पहाटे सुमारास घडलेल्या या अपघातातील मृतांची नावे अशी-कारचालक आदमअली मुनवरआली शेख (वय ३७), हिराबाई रामदास पवार (वय ७५), कमलबाई मारूती वेताळ (वय ६०) आणि द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय ४०). जखमींमध्ये बाळी बाबू पवार (वय २७), छकुली भुमा पवार (वय २७), साई योगीराज पवार (वय ७), सुरेखा भारत मोरे (वय ४५) आणि बायजाबाई रामदास पवार (वय ६०) यांचा समावेश आहे.…
हरारे : वृत्तसंस्था झिम्बाब्वेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू हीथ स्ट्रीकच्या निधनाचे वृत्त खोटे असल्याचे समोर आले आहे.माजी गोलंदाज हेन्री ओलोंगा यांनीच सकाळी त्याच्या मृत्यूची माहिती दिली होती परंतु, आता त्यांनी पुन्हा ट्वीट करून हीथ स्ट्रीक जिवंत असल्याची माहिती दिली आहे. झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक याचे कर्करोगाशी लढताना निधन झाल्याचे वृत्त पसरले होते. माजी क्रिकेटपटू आणि हीथ स्ट्रीक यांचे मित्र हेन्री ओलोंगा यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. त्यांच्या ट्वीटनंतर अवघ्या क्रिकेट विश्वात शोककळा पसरली. जगभरातील प्रसिद्धी माध्यमांनी हीथच्या मृत्यूची बातमी दिल्यानंतर आता हीथ स्ट्रीक जिवंत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसह सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे. ओलोंगा यांनी एका चॅटचा स्क्रीनशॉट…