मुंबई : प्रतिनिधी
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. आता लवकरच प्राजक्ताचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.
‘तीन अडकून सीताराम’ असे प्राजक्ताच्या अगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात प्राजक्ताबरोबर वैभव तत्तवादी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील दोघांचे लूक समोर आले आहेत. २९ सप्टेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे “कोणाला नाही ऐकत, कोणाला नाही जुमानत.. दुनिया गेली तेल लावत .असे म्हणत २९ सप्टेंबरपासून धुमाकूळ घालायला येत आहेत, ‘तीन अडकून सीताराम’ !”प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, चित्रपट, नाटक, वेबसिरीजच्या माध्यमातून प्राजक्ताने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. जुळून येती रेशीमगाठी मालिकेतून प्राजक्ताला खरी ओळख मिळाली. अभिनयाबरोबर प्राजक्ताने सुत्रसंचालनही केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मराठी विनोदी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राजक्ता करत आहे.