वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू तिरंग्याखाली खेळू शकणार नाहीत

0
3

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जागतिक कुस्ती संघटनेने मुदतीत निवडणूक न घेतल्याने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. याचा मोठा फटका भारतीय कुस्तीपटूंना बसला आहे. आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू तिरंग्याखाली खेळू शकणार नाहीत. १६ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय कुस्तीपटू तटस्थ खेळाडू म्हणून सहभागी होणार आहे. ही स्पर्धा आणखी एका कारणासाठी महत्त्वाची ठरणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय करण्यासाठीही महत्त्वाची असणार आहे.
भूपेंद्र सिह बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीला ४५ दिवसात निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पण या आदेशाचे पालन करण्यास समिती अयशस्वी ठरली. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कुस्तीचे कामकाज पाहण्यासाठी २७ एप्रिलला एका समितीची स्थापना केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २८ एप्रिलला जागतिक कुस्ती संघटनेने मुदत वेळेत न घेतल्यास कारवाईचा इशारा दिला होता. पण या नंतरही भारतीय कुस्ती महासंघाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी जागतिक कुस्ती संघटनेने भारतीय कुस्ती महासंघाची सदस्तयता रद्द केली आहे.
जागतिक कुस्ती संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार भारतीय कुस्ती महासंघाला ४५ दिवसांत म्हणजे १५ जुलैपर्यंत निवडणूक घ्यायची होती. सात मे रोजी निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले होतं. पण क्रीडा मंत्रालयाने या प्रक्रियेला मान्यता दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here