सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर – पुणे महामार्गावर मोहोळजवळ महिला भाविकांच्या चार चाकी मोटारकारची मालमोटारीला धडक बसून घडलेल्या अपघातात कारचालकासह तीन महिलांचा मृत्यू झाला तर अन्य सहाजण जखमी झाले. सर्व मृत व जखमी अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगाव (ता. पारनेर) येथील राहणारे आहेत.
बुधवारी पहाटे सुमारास घडलेल्या या अपघातातील मृतांची नावे अशी-कारचालक आदमअली मुनवरआली शेख (वय ३७), हिराबाई रामदास पवार (वय ७५), कमलबाई मारूती वेताळ (वय ६०) आणि द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय ४०). जखमींमध्ये बाळी बाबू पवार (वय २७), छकुली भुमा पवार (वय २७), साई योगीराज पवार (वय ७), सुरेखा भारत मोरे (वय ४५) आणि बायजाबाई रामदास पवार (वय ६०) यांचा समावेश आहे.