नवी दिल्ली : वृत्तसंस्था ३० ऑगस्टपासून एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेचा १४वा हंगाम सुरू होणार आहे.या स्पर्धेत टीम इंडिया २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध मोहिमेला सुरुवात करेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीबद्दल सर्वजण बोलत आहेत पण आता एकदिवसीय आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांविषयी जाणून घेऊ या. यावेळी असे बहुतेक गोलंदाज टीम इंडियाच्या लाइनअपमध्ये प्रवेश करतील, ज्यांनी जास्त आशिया कप खेळला नाही. शमी आणि बुमराह हे अनुभवी आहेत पण दोघांनी या स्पर्धेत केवळ ४-४ सामने खेळले आहेत परंतु एक नाव असे आहे, जे केवळ अनुभवीच नाही तर आगामी स्पर्धेत इतिहासही रचू शकते. तो म्हणजे भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा. एकदिवसीय आशिया…
Author: Kishor Koli
सातारा : वृत्तसंस्था पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत मुंबईहून जयसिंगपूरला जाणाऱ्या गाडीचा टायर फुटून उभ्या असणाऱ्या दुसऱ्या गाडीवर जाऊन आदळून झालेल्या अपघातात तीनजण जागीच ठार, तर चारजण जखमी झाले. जखमींना तातडीने सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा जोरदार होता की, यामध्ये तीनजण जागीच ठार झाले, तर इतर चारजण गंभीर जखमी झाले. एक महिला अत्यवस्थ आहे. निखिल शशिकांत चौखंडे, प्रियांका निखिल चौखंडे, शशिकांत यदुनाथ चौखंडे अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अत्यवस्थ महिला व जखमींची नावे उपलब्ध झाली नाहीत. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन…
नागपूर : वृत्तसंस्था अजित पवार आमचे नेते आहेत,असे मी बोललो नव्हतो तसेच अजित पवारांना पुन्हा संधी नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. यावर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. अजित पवार यांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने शरद पवार यांनी पाऊल उचलले आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद पवार काय म्हणाले? “अजित पवार आमचे नेते आहेत, असे मी बोललोच नव्हतो. अजित पवार यांना पुन्हा संधी नाही. एक दिवशी दोन व्यक्तींचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यात आमचे एक सहकारी सहभागी होते. त्यावेळी आम्ही एक निर्णय घेतला होता. पण,…
चिंचवड : प्रतिनिधी विधानसभा आणि लोकसभा निवडणुक महायुतीतर्फे लढणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे, असे वक्तव्य देखील त्यांनी केले. चिंवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच पिंपरी- चिंचवड शहरात आले होते. त्यांचं मोठ्या उत्साहात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, विलास लांडे, संजोग वाघेरे यांच्यासह इतर पदाधिकारी होते. अजित पवार म्हणाले, विधानसभा आणि लोकसभा आपण महायुतीतर्फे लढणार आहोत. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे. महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काय? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण येईल. या पूर्वी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था चांद्रयान यशस्वी झाल्यानंतर इस्रोकडून गगनयान मोहीमेची तयारीही सुरू आहे. भारताच्या मानवी अंतराळ मोहीमेला ‘गगनयान’ असं नाव देण्यात आलं आहे. गगनयान मोहिम इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहिम असेल. या मोहिमेमध्ये अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे. गगनयान हे भारतीय अंतराळ संस्थेची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहीमे अंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलातील वैमानिक अंतराळवीर म्हणून अंतराळात जातील. यासाठी त्यांचं प्रशिक्षणही सुरू आहे. येत्या काही महिन्यांत भारताचे सर्वात मोठे मिशन लाँच केलं जाऊ शकते. या मानवी अंतराळ मोहिमेकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. गगनयान अंतराळ मोहिमेसाठी पहिले रोबोट तयार केले जात आहेत. आधी रोबोटिक…
जळगाव : प्रतिनिधी येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडिअम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कलश भय्याची टोरंटो विद्यापीठाने पिअरसन आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड केली आहे. भारतातून फक्त तीन विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. पिअरसन शिष्यवृत्ती अत्यंत प्रतिष्ठित समजली जाते. बारावी विज्ञाननंतर कलश आता कॅनडा येथे चार वर्षे संगणक अभियांत्रिकीचे उच्चशिक्षण घेऊन संशोधन करणार आहे. शिष्यवृत्ती अंतर्गत कलशला टोरंटो विद्यापीठातर्फे चार वर्षे निवास, भोजन, शैक्षणिक शुल्क, पाठ्यपुस्तके यांसह इतर सर्व सोयी-सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. भारतीय चलनात चार वर्षांचा हा खर्च सुमारे अडीच कोटी रुपये इतका असेल, अशी माहिती तिचे वडील वास्तुविशारद पंकज भय्या यांनी दिली.
मुंबई : प्रतिनिधी पुणे येथील भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने खडसेंचा अंतरिम दिलासा कायम ठेवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात २९ ऑगस्टपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहे. एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबीयांनी पुणे पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांनी ॲड. मोहन टेकावडे यांच्यामार्फत याचिका केली आहे. त्या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. एसीबीने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यापूर्वी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मंजुरी घेतलेली नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. याआधीही दिली आहे क्लीन चीट शकथित गैरव्यवहार प्रकरणात एसीबीने सुरुवातीला २०१६ मध्ये खडसे…
चोपडा : प्रतिनिधी गांजाची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल न करणे आणि दुचाकी सोडविण्याच्या मोबदल्यात १५ हजारांची लाच घेतांना चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. बुधवारी २३ ऑगस्ट रोजी तक्रारदाराचा भाऊ आणि त्याचा मित्र असे दोघे दुचाकीवरून रात्री ९वाजता चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लासूर गावाजवळून जात असतांना चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार शिवाजी ढगू बाविस्कर (वय ५२) यांनी अडविले. तुमच्याजवळ गांजा आहे. गांजाची केस आणि दुचाकी सोडवायची असेल तर प्रत्येक ७५ हजार असे एकुण दीड लाख रूपयांची मागणी केली. तडजोडीअंत पहाटे ४ वाजता तक्रारदारच्या नातेवाईकांकडून सुरूवातीला ३० हजार रूपये घेतले. त्यानंतर दुचाकी…
सातारा : वृत्तसंस्था अजित पवार हे आमचेच नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही, असं वक्तव्य करुन राजकीय वर्तुळात गदारोळ उडवून देणाऱ्या शरद पवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत अखेर स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार यांनी आपल्या आधीच्या वक्तव्यावरुन घुमजाव करत, मी तसं बोललोच नव्हतो, असे सांगितले. त्यासोबतच यापुढील काळात अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचे संकेतही शरद पवार यांनी दिले. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुन्हा संधी मागायची नसते आणि मागितली तरी ती द्यायची नसते श शरद पवार यांनी शुक्रवारी सकाळी बारामतीमध्ये केलेल्या त्यांच्या वक्तव्याविषयी विचारण्यात आले. त्यावेळी शरद पवार यांच्याकडून ‘अजित पवार आमचे नेते आहेत’…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये सुरु असलेल्या उत्पादन तुटवड्यामुळे येत्या काही दिवसात टोमॅटोचे प्रति किलो दर हे २०० रुपयांवर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घाऊक बाजारात सोमवारी २५ किलो टोमॅटोच्या खरेदीसाठी तब्बल ४१०० रुपयांची बोली लावण्यात आली होती. याशिवाय भाजी मंडईतील अधिकाऱ्यांना द्यावे लागणारे कमिशन, वाहतूक खर्च आणि त्यात नफा जोडल्याने २५ किलो टोमॅटोची रिटेल बाजारात किंमत ५००० पर्यंत पोहोचत आहे. प्राप्त माहितीनुसार,केशोपूर मंडईतील घाऊक विक्रेते सरदार टोनी सिंग यांनी उत्तराखंडच्या डेहराडून जिल्ह्यातील विकास नगर येथे पार पडलेल्या लिलावात ४१०० रुपयात २५ किलो टोमॅटोचा क्रेट विकत घेतला आहे. सिंग सांगतात की, “या वर्षीच्या किमतीने मागील सर्व विक्रम मोडले…