नवी दिल्ली : वृत्तसंस्था
३० ऑगस्टपासून एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेचा १४वा हंगाम सुरू होणार आहे.या स्पर्धेत टीम इंडिया २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध मोहिमेला सुरुवात करेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीबद्दल सर्वजण बोलत आहेत पण आता एकदिवसीय आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांविषयी जाणून घेऊ या.
यावेळी असे बहुतेक गोलंदाज टीम इंडियाच्या लाइनअपमध्ये प्रवेश करतील, ज्यांनी जास्त आशिया कप खेळला नाही. शमी आणि बुमराह हे अनुभवी आहेत पण दोघांनी या स्पर्धेत केवळ ४-४ सामने खेळले आहेत परंतु एक नाव असे आहे, जे केवळ अनुभवीच नाही तर आगामी स्पर्धेत इतिहासही रचू शकते. तो म्हणजे भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा.
एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत २४ सामन्यांत ३० बळी घेणारा श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू मुथय्या मुरलीधरन अव्वल स्थानावर आहे पण विशेष म्हणजे सर्व टॉप १० खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे.त्याचबरोबर भारताचा रवींद्र जडेजा आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन अनुक्रमे ९ व्या आणि १० व्या क्रमांकावर आहेत.दोघांच्या नावावर १९-१९ विकेट आहेत. म्हणजेच आगामी स्पर्धेत दोघांना आशिया चषकातील नंबर १ गोलंदाज बनण्याची संधी आहे.आशिया कप २०२३ मध्ये प्रत्येक संघ जास्तीत जास्त ६ सामने खेळू शकतो. दुसरीकडे, जर संघ सुपर ४ पर्यंत गेले आणि अंतिम फेरीत गेले नाहीत, तर ते किमान ५ सामने खेळतील.
एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत रवींद्र जडेजाचा विक्रम
एकदिवसीय आशिया कपच्या इतिहासात रवींद्र जडेजाने आतापर्यंत १४ सामन्यांच्या १४ डावांत १९ विकेट्स घेतल्या आहेत जर भारतीयांबद्दल बोलायचे तर त्याच्या आसपास कोणीही नाही. रविचंद्रन अश्विनच्या नावावर १४ विकेट्स आहेत मात्र तो सध्याच्या संघाचा भाग नाही.याशिवाय कुलदीप यादवने १०, जसप्रीत बुमराहने ९ आणि मोहम्मद शमीने ८ बळी घेतले आहेत.
एकदिवसीय आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
रवींद्र जडेजा – १९ विकेट्स
शकीब अल हसन – १९ विकेट्स
रविचंद्रन अश्विन – १४ बळी (संघाबाहेर)
राशिद खान – १० विकेट्स
कुलदीप यादव – १० विकेट्स
भारताकडून एकदिवसीय आशिया कपमध्ये इरफान पठाणने सर्वाधिक २२ विकेट घेतल्या आहेत पण तोही निवृत्त झाला आहे, त्यामुळे जडेजा या स्पर्धेत भारताचा नंबर १ गोलंदाज होण्याच्या जवळ आहे. दुसरीकडे, त्याने आगामी स्पर्धेत १२ विकेट घेतल्यास, तो एकदिवसीय आशिया चषकातील नंबर १ गोलंदाज देखील ठरेल.