जळगावच्या कलश भय्याला टोरंटो विद्यापीठाची शिष्यवृत्ती

0
3

जळगाव : प्रतिनिधी

येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडिअम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कलश भय्याची टोरंटो विद्यापीठाने पिअरसन आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड केली आहे. भारतातून फक्त तीन विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती जाहीर झाली
आहे.
पिअरसन शिष्यवृत्ती अत्यंत प्रतिष्ठित समजली जाते. बारावी विज्ञाननंतर कलश आता कॅनडा येथे चार वर्षे संगणक अभियांत्रिकीचे उच्चशिक्षण घेऊन संशोधन करणार आहे. शिष्यवृत्ती अंतर्गत कलशला टोरंटो विद्यापीठातर्फे चार वर्षे निवास, भोजन, शैक्षणिक शुल्क, पाठ्यपुस्तके यांसह इतर सर्व सोयी-सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. भारतीय चलनात चार वर्षांचा हा खर्च सुमारे अडीच कोटी रुपये इतका असेल, अशी माहिती तिचे वडील वास्तुविशारद पंकज भय्या यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here