मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासिकांच्या वर्गांचे ऑनलाईन उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. कौशल्य, रोजगार विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रकाश सुर्वे, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांच्यासह ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य व विद्यार्थी ऑनलाईन…
Author: Kishor Koli
जळगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज १२ सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे मंगळवारी दुपारी बारा वाजता शासकीय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळावर येतील आणि हेलिकॉप्टरने ते पाचोरा तालुक्यातील हडसन शिवारातील हेलिपॅडवर दुपारी १२.१५ वाजता उतरतील. तेथून मोटारीने पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थित राहतील.दुपारी अडीचला मोटारीने निघून नांद्रा (ता. पाचोरा) येथे दुपारी २.५० वाजता नर्मदा ग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट कंपनीचे उद् घाटन, नगरदेवळा रेल्वेस्थानकानजीक निंभोरा (ता. भडगाव) येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंंडळाचे भूमिपूजन आणि पाचोरा येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन…
जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत तरूणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ११ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास कानळदा रोडवरील कचरा फॅक्टरीजवळ घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे पवन राजेंद्र बाविस्कर (वय २२) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याने पदवीपर्यंचे शिक्षण घेतले होते. सोमवारी ११ सप्टेंबर रोजी दुपारी त्याने घरच्यांना मी जळगाव येथे बँकेच्या कामानिमित्त जात असल्याचे सांगून तो घरातून निघाला होता. त्यानंतर तो कानळदा रोडवरील कचरा फॅक्टरीजवळ येवून त्याने जळगाव ते पाळधी दरम्यान अपलाईनवर खांबा क्रमांक ३०१/ ७ ते ९ दरम्यान, रेल्वेखाली…
नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ मध्ये भाजपला गाफील ठेवून ऐनवेळी आमचा घात केल्याचा दावा राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी कोल्हापुरातील सभेत शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवतांना.उद्धव ठाकरे यांचे सरकार संकटात सापडले तेव्हा राष्ट्रवादीच्या ५२ आमदारांनी स्वतःच्या सहीनिशी सत्तेत सहभागी होण्याचे पत्र दिले होते, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा दाखला देत गिरीश महाजन यांनी उपरोक्त दावा केला. गिरीश महाजन म्हणाले की, २०१९ मध्ये शरद पवार यांनी दिल्लीत भाजपसोबत जवळपास ४ बैठका घेतल्या पण त्यांनी आम्हाला गाफील ठेवून ऐनवेळी आमचा घात केला. शरद पवारांनी…
चाळीसगाव ः प्रतिनिधी आपल्या विविध समाजोपयोगी उप्रक्रमांसाठी नेहमी चर्चेत असणारे जिल्हा दुध संघाचे चेअरमन, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्व.रामराव जिभाऊ पाटील विद्यार्थी सन्मान शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आलेली आहे. त्याअंतर्गत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील १२०० अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरण समारंभ येथे आज दि.१२ सप्टेंंबर रोजी दुपारी ४ वा.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानात आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीशभाऊ महाजन यांंच्याहस्ते या विद्यार्थ्यांना सायकल भेट दिली जाणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन हे भूषवणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकितजिल्हा…
कोलंबो : वृत्तसंस्था लोकेश राहुलचे धडाकेबाज कमबॅक आणि विराट कोहलीची दणकेबाज फटकेबाजी पाहण्याचा योग पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आला.राहुलने यावेळी दणक्यात कमबॅक केले आणि टीकाकारांना चोख उत्तर दिले. दुसरीकडे विराटही धमाकेदार फटकेबाजी करत होता. या दोघांच्या दमदार शतकांच्या जोरावर भारताने काल ३५६ धावांचा डोंंगर पाकिस्तानला विजयासाठी ३५७ धावांचे मोठे आव्हान देत विजयाचा मार्ग सुकर केला आहे. राहुल आणि विराट या दोघांनीही यावेळी आपली शतके पूर्ण करत भारताच्या धावसंख्येला चांगला आकार दिला.या दोघांनी यावेळी २३३ धावांची द्विशतकी नाबाद भागीदारीही रचली. भारताने यावेळी ३५६ धावांचा डोंगर रचला.कोहलीने १२२, तर राहुलने १११ धावांची नाबाद खेळी साकारली. पावसामुळे आजच्या राखीव दिवशी खेळाला सुरुवात झाली तेव्हा पाकिस्तानचे…
पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर विरोधी पक्षनेते ना.अंबादास दानवे हे जळगाव दौऱ्यावर आले होते. रविवारी, १० सप्टेंबर रोजी त्यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाले होते म्हणून त्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या सोबत उपमहापौर कुलभूषण पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनीही भेट घेऊन सांत्वन केले.
जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या १२ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्णत्वाकडे आहे. ते दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शासकिय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळावरे आगमन व हॅलिकॉप्टरने मौजे हडसन शिवार हेलीपॅड, ता. पाचोराकडे प्रयाण. दुपारी १२.१५ वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व मोटारीने एम.एम.कॉलेज मैदान पाचोराकडे प्रयाण. दुपारी १२.३० वा. शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ एम.एम.कॉलेज मैदान पाचोरा) दुपारी २.३० वा. मोटारीने मौजे नांद्रा ता. पाचोराकडे प्रयाण. दुपारी २.५० वा. नर्मदा ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट या कंपनीचे उद्घाटन व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी)…
जळगाव ः प्रतिनिधी विरोधकांनी एकत्र येत ‘इंडिया’ नाव धारण करताच केंद्रातील मोदी सरकार डगमगायला लागले आहे.केंद्र सरकार हालायला लागले आहे. मला माझ्या जळगावच्या महापौर आणि उपमहापौरांसह इतर सहकाऱ्याचा अभिमान आहे.पोलादी पुरुष केवळ नावाचे नाही तर कामाचे हवेत,असे म्हणत माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा उंच पुतळा उभारलात हे ठीक आहे, पण कामाची उंची गाठा ना,पुतळ्याची उंंची ठीक आहे,कामाची उंची कधी गाठणार? असा खोचक प्रश्न विचारुन, वल्लभभाईंनी जशी मराठवाड्यात कारवाई केली तशी मणिपूरमध्ये कारवाई करण्याची हिंमत होत नाहीय.मणिपूरसारख्या ज्वलंत प्रश्नावर चुप्पी साधणारे हे कसले पोलादी पुरूष, हे तर…
मुंबई ः प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपूर्वी आपण हे पाहिले की,अनेक सेलिब्रिटी हे त्यांच्या धर्मासाठी चित्रपटसृष्टी सोडताना दिसत आहेत.धर्मासाठी ग्लॅमरचे क्षेत्र सोडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये बरखा मदान, झायरा वसीम, सोफिया वसीम, सना खान यांची नावे आहेत. हे कलाकार अभिनय क्षेत्र सोडून धर्माच्या मार्गावर पुढे आले आहेत. त्यात आता एका मराठमोळी अभिनेत्रीने धर्मासाठी अभिनय क्षेत्र सोडले आहे.ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेत काम करणारी अनघा भोसले आहे. अनघाने वयाच्या २३ व्या वर्षी कृष्णभक्त होत अभिनय क्षेत्राला रामराम केला आहे. अनघाने गेल्यावर्षी २४ मार्च २०२२ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने अभिनय क्षेत्र सोडत कृष्णभक्ती करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ‘हरे कृष्ण..…