मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाचोऱ्यात

0
1

जळगाव : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज १२ सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे मंगळवारी दुपारी बारा वाजता शासकीय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळावर येतील आणि हेलिकॉप्टरने ते पाचोरा तालुक्यातील हडसन शिवारातील हेलिपॅडवर दुपारी १२.१५ वाजता उतरतील. तेथून मोटारीने पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थित राहतील.दुपारी अडीचला मोटारीने निघून नांद्रा (ता. पाचोरा) येथे दुपारी २.५० वाजता नर्मदा ग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट कंपनीचे उद्‌‍‍ घाटन, नगरदेवळा रेल्वेस्थानकानजीक निंभोरा (ता. भडगाव) येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंंडळाचे भूमिपूजन आणि पाचोरा येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन मुख्य इमारत बांधकामाचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here