Author: Kishor Koli

नवीदिल्ली : वृत्तसंस्था महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन विधेयक) बुधवारी संसदेच्या विशेष अधिवेशनात लोकसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. ४५४ खासदारांनी विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केले. तर, केवळ दोघांनी विधेयकाविरोधात मतदान केले. आता उद्या गुरुवारी हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत सादर केले जाईल. राज्यसभेत हे विधेयक पास झाल्यास नंतर ते मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे जाईल. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. यापूर्वी विधेयकावर चर्चेला उत्तर देताना अमित शाह म्हणाले, महिला आरक्षण विधेयक हे युग बदलणारे विधेयक आहे. भारतीय संसदेच्या इतिहासात उद्याचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. काल गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन सभागृहात प्रथमच उदघाटन करण्यात आले. पहिल्यांदाच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले विधेयकही मंजूर करण्यात आले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस्‌‍‍ ॲकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धेत चौथ्या दिवशीही पश्चिम बंगाल संघ अव्वल स्थानावर कायम आहे तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र संघ पोहचला असून या संघाचा नेट रनरेटही चांगला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेच्या चौथ्या दिवसाच्या पहिला सामन्यात पश्चिम बंगालने त्रिपुरा संघावर मात केली.प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पश्चिम बंगाल संघाने निर्धारित २० षटकांत झुमिया खातून ३६ (३७ चेंडू) धावाच्या मदतीने ८ गडी गमावून १११ धावा केल्यात. त्रिपुरा तर्फे हिना हिने सर्वाधिक ३ गडी बाद केले. त्रिपुरा…

Read More

जळगावातील गणेशोत्सवाच्या पहिल्या टप्प्यात केवळ लहान गणेशमुर्तींची स्थापना केली जात असे.आरास किंवा देखाव्याचा थांगपत्ता नव्हता.त्यानंतर सत्तर-ऐंशीच्या दशकात धार्मिक आरासांना प्राधान्य देण्यात आले.नंतर धार्मिक देखाव्यांबरोबर सामाजिक व जनजागृतीपर देखाव्यांनाही भक्तांची पसंती मिळू लागली. काळाच्या ओघात आता गणेश मंडळांची सुत्रे नव्या पिढीकडे आली आहेत.त्यामुळे गणेशोत्सवात अत्याधुनिकीकरणाची जोड मिळाल्याचे दिसत आहे.जनजागृतीवर भर देण्यात येत असून विविध उपक्रम राबविले जात आहे.सामाजिक संस्थांचाही सहभाग वाढल्याचे दिसत आहे. देशभरात गणेशोत्सवाची धूम सुरु झाली आहे.विशेषतः महाराष्ट्रात या उत्सावाला उधाण येते.राज्यातील प्रमुख शहरांसह जळगाव शहरातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याची परंपरा सुरु आहे.गेल्या पन्नास वर्षापासूनचे गणेशोत्सव जवळून बघण्याचा योग मला आला.त्यामुळे या उत्सवाचे शहरातील बदलते स्वरुपही अनुभवास…

Read More

यावल साईमत प्रतिनिधी शहरातील प्रत्येक प्रभागात,वार्डात,गल्ली बोळात गणपती बाप्पाचे आगमन झाले. मात्र शहराच्या मुख्य मार्गासह अनेक प्रमुख रस्त्यांवर खड्डेच, खड्डे झाले आहेत. खोल खड्डे आणि उंचच उंच गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. दुरुस्ती न झाल्यामुळे बाप्पाचे स्वागत खाचखळग्यातुनच करावे लागले आहे. दरम्यान, यावल नगरपालिकेचे स्थापत्य अभियंता योगेश मदने आणि मुख्याधिकारी हेमंत निकम हे मात्र मुख्यालयाच्या बाहेर असल्यामुळे वेळेत दुरुस्तीचे कोणतेच काम झाले नाही. त्यामुळे यावल शहरातील गणेश भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी तथा यावल नगरपरिषद प्रशासक कैलास कडलग यांनी लक्ष केंद्रित करून कारवाई करावी, अशी अपेक्षा गणेश भक्तांनी व्यक्त केली आहे. यावल पोलीस स्टेशन आवारात…

Read More

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संंघ २०२३ च्या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.ऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेसाठी भारतीय दौऱ्यावर येणार आहे. ही एकदिवसीय मालिका २२ सप्टेंंबर ते २७ सप्टेंंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. ही एकदिवसीय मालिका विश्वचषकापूर्वी टीम इंंडियासाठी शेवटच्या तयारीसाठी मालिका असेल.तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका भारतात खेळवली जाणार आहे आशिया कप खेळल्यानंतर अवघ्या ५ दिवसांनी भारतीय संघ या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे तर ऑस्ट्रेलियन संंघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर भारताविरुद्धची ही वनडे मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. १७ सप्टेंबर रोजी झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा १० गडी…

Read More

चेन्नई : वृत्तसंस्था दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता, कंपोजर आणि निर्माता विजय एंटनी याची लेक मीराचे आज सकाळी निधन झाले आहे. मीरा ही १६ वर्षांची होती. मीराने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, मीराने चेन्नईत असलेल्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.मीराला त्या परिस्थितीत पाहिल्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजयची लेक मीरा ही डिप्रेेशनमध्ये होती आणि तिच्यावर उपचार देखील सुरु होते. एका वृत्तानुसार, विजय एंटनीची लेक मीरा सकाळी ३ वाजता चेन्नईत स्थित असलेल्या घरी मृतावस्थेत सापडली. ती १६ वर्षाची असून चेन्नईच्या एका मोठ्या शाळेत शिकत होती.मीरा डिप्रेशनमध्ये होती. त्यांच्या घरात काम करणाऱ्या…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा फलंंदाज चेतेश्वर पुजारावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने काउंटी चॅम्पियनशिपच्या एका सामन्याची बंदी घातली आहे. ससेक्स काऊंटी क्लबचा कर्णधार पुजारावर त्याचा सहकारी जॅक कार्सन आणि टॉम हेन्स यांच्या खेळाहीन वर्तनामुळे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय ससेक्स क्लबला १२ गुणांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. भारताचा चेतेश्वर पुजारा सध्या देशी क्रिकेट खेळत आहे आणि ससेक्सचा कर्णधार आहे. पण सहकाऱ्यांच्या कृतीमुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. पुजाराची गणना टीम इंडियाच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संघातून वगळण्यात आले होते. पुजारा बऱ्याच काळापासून काऊंटी क्रिकेट खेळत आहे आणि काही काळ ससेक्सचे कर्णधारपदही…

Read More

नवीदिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१९ सप्टेंबर) महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले आहे. ‘नारी शक्ती बंधन अधिनियम’ (महिला आरक्षण विधेयक) या नावाने हे विधेयक लोकसभेच्या पटलावर मांडले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात महिला आरक्षणाविषयी खूप चर्चा झाली, वादविवाद झाले. हे विधेयक पास करून कायदा बनवण्याचे अनेक प्रयत्न झाले.१९९६ मध्ये हे विधेयक पहिल्यांदा संसदेच्या पटलावर आले.अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात अनेकदा हे विधेयक सादर करण्यात आले परंतु ते पारित करून कायदा करण्यासाठी पुरेसे संख्याबळ त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे आपलं स्वप्न अपूर्ण राहिलं, अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. हे विधेयक संसदेच्या पटलावर आल्यानंतर आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.महिला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तापी नदीला आलेल्या पुरामुळे आणि पाणी फुगवट्यामुळे जिल्ह्यात बाधित पिकांची तत्काळ स्थळपाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनास केल्या आहेत. संततधार पाऊस आणि वादळामुळे शनिवारी रावेर तालुक्यात पिकांचे नुकसान झाले. मध्य प्रदेशातील पावसामुळे तापी नदीच्या जलपातळीत झालेल्या वाढीमुळे हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आल्याने, तसेच तापी नदीचा फुगवटा नदीकाठच्या गावांतील पिके व घरांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. या गावांतील ६७ कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे काम केले. तलाठी, महसूल सहायकांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानीचा पंचनामा करून अहवाल सादर करावा. लोकांना दिलासा देण्यासाठी…

Read More

नाशिक : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील क्लस्टर विकासाचे चार कोटी आणि अतिरिक्त सुरक्षेची अनामत रक्कम ३५ लाख रुपये देण्याच्या मोबदल्यात चार लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपविभागीय अभियंत्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (वय ५७, रा. अशोकनगर, धुळे) असे संशयित अभियंत्याचे नाव आहे. नाशिकमधील नातलगाकडे एका खासगी कार्यक्रमासाठी आल्यानंतर तक्रारदाराला फोन करून बोलावून घेत रात्री गडकरी चौकात लाच स्वीकारताना एसीबीने संशयिताला अटक केल्याचे समोर आले आहे. संशयित विसपुते हा बांधकाम विभागात कार्यरत आहे. त्याने सर्वाधिक सेवा धुळ्यात बजावली आहे. धुळ्यातील अशोकनगरमध्ये संशयित वास्तव्यास आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने विसपुतेच्या घराची झडती सुरू केली आहे. घरझडतीत…

Read More