नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संंघ २०२३ च्या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.ऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेसाठी भारतीय दौऱ्यावर येणार आहे. ही एकदिवसीय मालिका २२ सप्टेंंबर ते २७ सप्टेंंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. ही एकदिवसीय मालिका विश्वचषकापूर्वी टीम इंंडियासाठी शेवटच्या तयारीसाठी मालिका असेल.तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका भारतात खेळवली जाणार आहे
आशिया कप खेळल्यानंतर अवघ्या ५ दिवसांनी भारतीय संघ या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे तर ऑस्ट्रेलियन संंघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर भारताविरुद्धची ही वनडे मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. १७ सप्टेंबर रोजी झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करून विजेतेपदासह ही मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे. त्याच दिवशी ऑस्ट्रेलियन संघाला शेवटच्या एकदिवसीय सामन्यात १२२ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्याचसोबत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका २-३ ने गमावली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेत ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळवले जातील, त्यापैकी ३ एकदिवसीय सामने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी खेळले जातील. विश्वचषकानंतर २३ नोव्हेंबरपासून पाच टी-२० सामन्यांंची मालिका सुरू होईल आणि ही टी-२० मालिका ५ डिसेंबरपर्यंत खेळवली जाईल.२०२४ च्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ही टी-२० मालिका महत्त्वाची ठरणार आहे.
आशिया चषकानंतर अवघ्या ४ दिवसांनी सुरू होणाऱ्या या मालिकेतून भारतीय संघाला विश्वचषकापूर्वी आपला सर्वोत्तम संघ शोधण्याची संधी असेल तर ऑस्ट्रेलियन संघात पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि स्टीव्ह स्मिथचे पुनरागमन होणार आहे. हे तिघेही दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळले नव्हते.या मालिकेसाठी ग्लेन मॅक्सवेलही उपलब्ध असेल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
वनडे मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिला एकदिवसीय : २२ सप्टेंबर २०२३ (शुक्रवार)- मोहाली, दुपारी १:३० वाजता
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरी वनडे : २४ सप्टेंबर २०२३ (रविवार)- इंदूर,दुपारी १:३०
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरा एकदिवसीय : २७ सप्टेंबर २०२३ (बुधवार)- राजकोट, दुपारी १:३० वाजता
भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी दोन्ही संघ
भारताचा पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी भारताचा संघ
केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव,तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी,मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
तिसऱ्या आणि अंतिम वनडेसाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस,कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा