अभिनेता विजय एंटनीच्या अल्पवयीन लेकीची आत्महत्या

0
3

चेन्नई : वृत्तसंस्था

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता, कंपोजर आणि निर्माता विजय एंटनी याची लेक मीराचे आज सकाळी निधन झाले आहे. मीरा ही १६ वर्षांची होती. मीराने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
रिपोर्ट्सनुसार, मीराने चेन्नईत असलेल्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.मीराला त्या परिस्थितीत पाहिल्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजयची लेक मीरा ही डिप्रेेशनमध्ये होती आणि तिच्यावर उपचार देखील सुरु होते.
एका वृत्तानुसार, विजय एंटनीची लेक मीरा सकाळी ३ वाजता चेन्नईत स्थित असलेल्या घरी मृतावस्थेत सापडली. ती १६ वर्षाची असून चेन्नईच्या एका मोठ्या शाळेत शिकत होती.मीरा डिप्रेशनमध्ये होती. त्यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीने तिला रुममध्ये गळफास घेतलेल्या परिस्थितीत पाहिले. त्यानंंतर तिला लगेच रुग्णालयात घेऊन जाण्यात आले तर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सध्या पोलिस अधिकारी या प्रकरणात तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here