मुंबई : प्रतिनिधी येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित आमदार अपात्र ठरतील आणि मुख्यमंत्रीपदावर इतर नेत्याची वर्णी लागेल, असा दावा विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात आहे. विरोधी पक्षांच्या या दाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उत्तर दिले.एकनाथ शिंदे अपात्र झाले तरीही तेच मुख्यमंत्री राहतील, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस म्हणाले, शिंदे अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेवर निवडून आणले जाईल आणि तेच पुढे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ही खूप गंभीर गोष्ट आहे. फडणवीसांना माहिती आहे की, शिंदे हे…
Author: Kishor Koli
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर एकाच वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ेोकर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर सुनावणी सुरू आहे.याआधीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलेही आहे.त्यामुळे सोमवारी (३० ऑक्टोबर) सर्वेोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर रविवारी (२९ ऑक्टोबर) दिल्ली दौऱ्यावर आले. दिल्लीत दाखल होताच त्यांनी या दौऱ्याचे कारण सांगितले. राहुल नार्वेकर म्हणाले की, “दिल्लीत माझ्या काही भेटीगाठी आहेत तसेच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याबरोबरही माझी बैठक होणार आहे.
हिंगोली : वृत्तसंस्था शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर राजीनामा दिला आहे. गावागावात आंदोलन आणि उपोषण होत असताना आता मराठा आंदोलनासाठी राजीनामा सत्र सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे.मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे ते पहिलेच खासदार आहेत.लोकसभा अध्यक्षांच्या नावाने त्यांनी राजीनाम्याचे पत्र दिले आहे.हेमंत पाटील हे हिंगोलीचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. दरम्यान जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. आपण लवकरच यासंदर्भात मराठा संघटनांची चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे अतुल बेनकेंनी स्पष्ट केले आहे. धाराशीवमध्ये तरूणांनी स्वत:ला गाडून घेतलंय धाराशीवमध्ये मराठा…
धरमशाला : वृत्तसंस्था हिमाचल प्रदेशातील धरमशाला इथल्या हिमालयाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या स्टेडियममध्ये झालेल्या रोमांचक लढतीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर अवघ्या पाच धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३८८ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने रचीन रवींद्रचे शतक आणि जेम्स नीशामचे अर्धशतक यांच्या वादळी खेळीच्या बळावर विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी १९ धावांची आवश्यकता होती. पाचव्या चेंडूवर नीशाम बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने विजय खेचून आणला.या सामन्यात ६५ चौकार आणि ३२ षटकारांचा वर्षाव झाला. प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडला डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग जोडीने ६१ धावांची सलामी दिली. जोश हेझलवूडने कॉनवेची खेळी संपुष्टात आणली. पाठोपाठ विल यंगलाही त्यानेच तंबूत…
यवतमाळ : वृत्तसंस्था राज्यात मराठा आंदोलन पेटले असताना मराठाबहुल उमरखेड तालुक्यात अज्ञात तरुणांनी राज्य परिवहन विभागाची बस पेट्रोल ओतून जाळल्याने खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील गोजेगाव नजीकच्या पैनगंगा पुलावर घडली. बसमधील ७३ प्रवासी सुखरूप आहे. नांदेड आगाराची नांदेड-नागपूर बस रात्री ११ वाजता पैनगंगा पुलाजवळ पोहोचताच मागाहून आलेल्या एका मोटारसायकलस्वाराने ही बस थांबवली. त्याच्यामागून परत पाच ते सहा लोक आले. त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर या अज्ञात लोकांनी पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. या घटनेत बसचे (क्र. एमएच २०- जीसी ३१८९) ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. बस जाळणारे कोण होते, त्यांनी हा प्रकार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था विद्यमान भारतीय दंड संहिता (आयपीसी), फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) आणि साक्षीपुरावा कायदा यांच्याऐवजी नवीन संहिता स्वीकारण्यासाठी मांडण्यात आलेल्या विधेयकाचा मसुदा अहवाल पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे शुक्रवारी स्वीकारण्यात आला नाही. या विधेयकाचा अभ्यास करण्यासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे पत्र किमान दोन सदस्यांनी लिहिले होते. ते विचारात घेऊन विधेयकांची छाननी करणाऱ्या संसदेच्या स्थायी समितीने बैठक पुढे ढकलली आहे. ‘आयपीसी’, ‘सीआरपीसी’ आणि ‘पुरावा कायदा’ बदलून त्यांच्याऐवजी ‘भारतीय न्याय संहिता’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ आणि ‘भारतीय साक्ष विधेयक’ आणण्याचा प्रस्ताव आहे. गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीसमोर संबंधित विधेयकांची छाननी केली जात असून त्यांचा मसुदा अहवाल २७ ऑक्टोबरला स्वीकारायचा असल्याचे समितीच्या सदस्यांना कळवण्यात आले…
मुंबई : प्रतिनिधी “कृषिमंत्री असताना महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर केवळ राजकारण केले. ते अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते परंतु, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले”, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत केला. याला शरद पवारांनी आज, शनिवारी प्रत्युत्तर दिले आहे.ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. शरद पवार म्हणाले, “पंतप्रधानांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर कृषिखात्यातील माझ्या सहभागाबद्दल काही मुद्दे मांडले पण पंतप्रधान हे एक संवैधानिकपद आहे. संवैधानिक पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे,हे मला समजतें त्यामुळे मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे.मोदींनी सांगितलेली माहिती वास्तवापासून दूर आहे. दहा वर्षातील कामाचा दिला लेखाजोखा…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे त्याच्या पायाच्या ठशांवरून दिसून आले आहे. तसेच, काही शेतकऱ्यांचे पशुधनाची हानी झाली असून बिबट्याने हल्ला केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यातील लमांजन शिवारात गिरणा धरणाजवळ शंकर महाराज जगताप यांच्या शेतात गुरुवारी रात्री जंगली प्राण्याने त्याच्या गायीच्या पिलावर हल्ला केला होता. शुक्रवारी बिबट्याच्या पायाचे ठसे शेतात आढळल्याने शुक्रवारी दुपारी तीन वाजता सुमारास वनपाल संदीप पाटील, वनरक्षक माया परदेशी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. घटनास्थळी मयत गोहा नव्हता पण रक्त पडलेले होते. यावेळी शेतकरी व लमांजन पोलिस पाटील भावलाल पाटील उपस्थित होते. यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे सांगितले…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल, अशा आशयाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ भाजपकडून शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असणारे देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार का ? या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले. त्यामुळे भाजपच्या या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पण एकनाथ शिंदे यांची…
मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारला दिलेला ४० दिवसांचा वेळ संंपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांंनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कांँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केले.“जे करणं शक्य नाही त्याचा शब्द कधी देऊ नये,”असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले तसेच सध्याच्या परिस्थितीला उपोषण करणाऱ्यांंना दोष देता येणार नाही,असेही नमूद केले. शरद पवार म्हणाले,“मनोज जरांगे पाटलांनी काही मागण्या केल्या आहेत.त्या मागण्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनोज जरांगेंशी सुसंवाद केला. त्यांच्यात प्रत्यक्ष काय बोलणं झालं हे मला माहिती नाही.वर्तमानपत्रावरून जरांगेंनी सरकारला ३० दिवसांचा वेळ दिला.त्यात आणखी काही वाढ झाली.”…