उमरखेडमध्ये अज्ञात तरुणांनी एसटी बस जाळली

0
8

यवतमाळ : वृत्तसंस्था

राज्यात मराठा आंदोलन पेटले असताना मराठाबहुल उमरखेड तालुक्यात अज्ञात तरुणांनी राज्य परिवहन विभागाची बस पेट्रोल ओतून जाळल्याने खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील गोजेगाव नजीकच्या पैनगंगा पुलावर घडली. बसमधील ७३ प्रवासी सुखरूप आहे.
नांदेड आगाराची नांदेड-नागपूर बस रात्री ११ वाजता पैनगंगा पुलाजवळ पोहोचताच मागाहून आलेल्या एका मोटारसायकलस्वाराने ही बस थांबवली. त्याच्यामागून परत पाच ते सहा लोक आले. त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर या अज्ञात लोकांनी पेट्रोल टाकून बस पेटवून दिली.
या घटनेत बसचे (क्र. एमएच २०- जीसी ३१८९) ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. बस जाळणारे कोण होते, त्यांनी हा प्रकार का केला, याचा शोध उमरखेड पोलीस घेत आहेत.
या बसवर चालक बी.डी. नाईकवाडे तर वाहक एस.एन. वाघमारे हे होते.घटनास्थळी यवतमाळ आणि नांदेड एसटी विभाग नियंत्रकांसह पोलिसांनी भेट दिली. याप्रकरणी अद्याप कोणत्याही आरोपीची ओळख पटली नाही. हा प्रकार मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने घडला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत
आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here