फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार?

0
1

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल, अशा आशयाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ भाजपकडून शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असणारे देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार का ? या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले. त्यामुळे भाजपच्या या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात दावे प्रतिदावे करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पण एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागली आणि सगळ्या चर्चांना पुर्णविराम लागला. पण आता पुन्हा एकदा जवळपास वर्षभरानंतर आणखी या चर्चा सुरु झाल्या आहेत.

हो, ते पुन्हा आलेत – उदय सामंत
या आधी देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की, मी पुन्हा येईल, ते पुन्हा आलेत. सोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील घेऊन आलेत. पण या व्हिडीओवर योग्य स्पष्टीकरण हे भाजपचं देईल. तथापि, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालीच निवडणुका होतील, असे उदय सामंतांनी म्हटले आहे.

भाजप एकनाथ शिंदेंच्या नृेत्वाखाली लोकसभेच्या
निवडणुका लढवणार नाही – पृथ्वीराज चव्हाण
काल पंतप्रधान मोदी यांचा महाराष्ट्र दौरा झाला, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दिल्लीवारी केली. त्यामुळे त्या बैठकीमध्ये कदाचित नेतृत्व बदलण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजप लोकसभेच्या निवडणुका लढवण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कदाचित या नेतृत्वाचा चेहरा बदलला जाऊ शकतो. त्यासाठी सुरुवात भाजपकडून करण्यात आलीये’. असे पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here