मराठा आरक्षणासाठी खा. हेमंत पाटील यांचा राजीनामा

0
1

हिंगोली‍ : वृत्तसंस्था

शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर राजीनामा दिला आहे. गावागावात आंदोलन आणि उपोषण होत असताना आता मराठा आंदोलनासाठी राजीनामा सत्र सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे.मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे ते पहिलेच खासदार आहेत.लोकसभा अध्यक्षांच्या नावाने त्यांनी राजीनाम्याचे पत्र दिले आहे.हेमंत पाटील हे हिंगोलीचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत.
दरम्यान जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. आपण लवकरच यासंदर्भात मराठा संघटनांची चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे अतुल बेनकेंनी स्पष्ट केले आहे.
धाराशीवमध्ये तरूणांनी
स्वत:ला गाडून घेतलंय
धाराशीवमध्ये मराठा आरक्षणासाठी तरूणांनी स्वत:ला गाडून घेतले आहे.धाराशिव जिल्ह्यातील मेडसींगा गावात तरुण आक्रमक झाले असून उच्चशिक्षित मराठा तरुणांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत आंदोलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here