Author: Kishor Koli

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून त्यांचेवर जळगाव येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर काल सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आल्याचे वृत्त आहे. हृदयाच्या संबंधित त्यांना अगोदरच आजार आहेत. त्यात आज(रविवार) दुपारी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करुन हृदयाच्या संबंधित त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संध्याकाळी त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जळगाव शहरातील गजानन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या.खडसेंंच्या प्रकृती बाबतची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास…

Read More

बारामती : वृत्तसंस्था राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात २३५३ ग्रामपंचायतींमधील २० हजारांपेक्षा अधिक जागांसाठी आज मतदान होत आहे. आज (५ नोव्हेंबर) सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर अजित पवारांच्या मातोश्रींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. माझे वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या डोळ्यादेखत (हयातीत) माझ्या मुलाने (अजित पवार) मुख्यमंत्री व्हावे. बारामती आपलीच आहे, लोकांचेही दादांवर प्रेम आहे, अशी प्रतिक्रिया आशाताई पवार यांनी दिली आहे. अजित…

Read More

ओटावा : वृत्तसंस्था देशभरात सध्या क्रिकेट विश्वचषकाचा उत्साह पाहायला मिळत आहे. टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली असून फायनलमध्येही भारतीय संघानेच विजेतेपद पटकवावे अशी इच्छा प्रत्येक भारतीयाची आहे पण त्याचदिवशी घातपात करण्याची धमकी कॅनडातील खलिस्तान्यांचा म्होरक्या गुरपतवंतसिंग पन्नूने दिली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याने ही धमकी दिली आहे.१९ नोव्हेंबरला शीख समुदायाने दिल्ली विमानतळावरून विमान प्रवास करू नये, असा इशाराही त्याने दिला आहे. गुरपतवंतसिंग पन्नू हा खलिस्तानी दहशतवादी असून भारतीय सुरक्षा व्यवस्थेसाठी तो एक फरार गुन्हेगार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गुरपतवंतसिंग पन्नू व्हिडीओच्या माध्यमातून अशी गरळ ओकताना दिसत आहे. हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणामुळे भारत व कॅनडामधील संबंध ताणले गेले असताना त्यासंदर्भातही गुरपतवंतसिंग पन्नूने…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यभरात मराठा समाजातील कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी नोंद असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास पुढील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. यामुळेच मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा विषय तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, यासाठी उपोषण आंदोलन सुरू केले होते. ज्यांच्या पूर्वजांच्या कुणबी नोंदी आहेत,त्यांनी पुरावे सादर केल्यावर कुणबी दाखले देण्याचा सरकारचा निर्णय जुनाच आहे. मात्र मराठवाड्यात जुन्या नोंदी उपलब्ध नसल्याची तक्रार होती. त्यामुळे आणखी कोणते दस्तावेज पुराव्यादाखल वापरता येतील व त्याची कार्यपद्धती काय राहील, याबाबत राज्य सरकारला अहवाल…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून आतापर्यंत १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. ४८ मिनिटांत चार जोरदार भूकंपांनी नेपाळला पुन्हा एकदा विनाशाच्या मार्गावर नेलं. रस्त्यावर भेगा पडल्या आणि अनेक घरे जमीनदोस्त झाली. भूकंप झाला त्यावेळी बहुतांश लोक झोपले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. शुक्रवारी रात्री दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक शहरं भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले. २०१५ मध्ये नेपाळमध्ये झालेला भूकंप लोकांना आता पुन्हा एकदा आठवला. शुक्रवारी रात्री नेपाळमध्ये चार भूकंप झाले. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल वैद्यकीय पथकासह जजरकोट भागात जात आहेत. पंतप्रधानांचे प्रेस…

Read More

नाशिक : प्रतिनिधी लाचलुचपत विभागाच्या नाशिक येथील पथकाने अहमदनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. १ कोटींच्या लाचखोरी प्रकरणात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. रस्ते आणि इतर विकासकामांचे बिल काढण्यासाठी ही लाच मागितली होती. याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली. अहमदनगर एमआयडीसीतील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. यानंतर संबंधित प्रकरणात सहभागी असणारे धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ यांनाही अटक करण्यात आली. अहमदनगर परिसरात रस्त्यांसह विविध विकासकामांचं तीन ते साडेतीन कोटींचं बिल काढण्यासाठी एका ठेकेदाराकडे १ कोटींची लाच मागितली होती. अहमदनगर एमआयडीचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यांनी ही लाच मागितली होती.…

Read More

मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या 2023 च्या वनडे क्रिकेट विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत घोट्याला दुखापत झाल्यामुळे पंड्याचा प्रवास इथेच थांबत आहे. हार्दिक पंड्याला पुढील सर्व सामन्यांना मुकावे लागण्याची चर्चा असताना काही मीडिया रिपोर्ट्समध्ये मात्र हार्दिक नॉकऑफ सामन्यांच्या वेळेत तंदुरुस्त होऊन पुनरागमन करु शकतो, असा दावा केला जात होता. परंतु तोही आता फोल ठरताना दिसत आहे. हार्दिक पंड्याच्या जागी प्रसिध्द कृष्णाची संघात निवड करण्यात आली आहे. या बदलाला शनिवारी विश्वचषकाच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने मान्यता दिली आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे. जलदगती गोलंदाज प्रसिध्द कृष्णा आता हार्दिकची कमतरता भरुन काढणार…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने महावितरण, महानिर्मिती,महापारेषण या कंपन्यांना आंदोलनाची नोटीस दिली आहे.महावितरण, महानिर्मिती, महापारेषणमधील 86 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. त्यावर सरकारसोबत अनेक चर्चा व बैठकी झाल्या. परंतु बैठकांमधील निर्णयाचीही अंमलबजावणी होत नाही, असा आरोप करीत वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाची नोटीस तिन्ही वीज कंपन्यांसोबतच ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधान ऊर्जा सचिव कार्यालयांनाही दिल्याचे फेडरेशनचे राज्य सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात 14 डिसेंबरला राज्यातील सर्व वीज कार्यालयांपुढे तर दुसऱ्या टप्प्यात 22 डिसेंबरला राज्यातील सर्व झोन कार्यालयांपुढे द्वारसभा व निदर्शने केली जातील. तिसऱ्या टप्प्यात 28 डिसेंबरला प्रकाशगड/ प्रकाशगंगा कार्यालयापुढे धरणे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अब्जाधीश गौतम अदानींच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने बीक्यू क्विंटिलियन बिझनेस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील उर्वरित ५१ टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. राघव बहल यांच्या मालकीच्या असणाऱ्या डिजिटल व्यापारवृत्त मंच असलेल्या बीक्यू क्विंटिलियन बिझनेसची १०० टक्के मालकी मिळविली. अदानी एंटरप्रायझेसची उपकंपनी असलेल्या एएमजी मीडिया नेटवर्क्सच्या संचालक मंडळाने विद्यमान वर्षात क्विंटिलियन बिझनेस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील उर्वरित ५१ टक्के समभाग घेण्यासाठी सामंजस्य करार केला होता. याआधीची ४९ टक्के हिस्सेदारी ४७.८४ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली होती मात्र आता नव्याने खरेदी करण्यात आलेल्या ५१ टक्के हिस्सेदारी कराराची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. संपादन पूर्ण झाल्यानंतर क्विंटिलियन बिझनेस मीडिया ही अदानी समूहातील एएमजी…

Read More

अमरावती : वृत्तसंस्था यंदा मोसमी पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला. त्यामुळे कोरडवाहू कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यात दसऱ्यापासून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि राज्य पणन महासंघाने खरेदी केंद्र सुरू न केल्याने व्यापारी हमीभावापेक्षा कमी किमंतीमध्ये खरेदी करीत आहेत. दिवाळीनंतरच सीसीआयकडून शासकीय कापूस खरेदीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विदर्भातील बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. यंदा खरीप हंगामात केंद्र सरकारने ७ हजार २० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सध्या सर्वत्र कापूस वेचणीची कामे सुरू आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झाली…

Read More