आ.खडसेंंना हृदयविकाराचा झटका : मुंबईला हलवले

0
1

जळगाव : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून त्यांचेवर जळगाव येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर काल सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आल्याचे वृत्त आहे.
हृदयाच्या संबंधित त्यांना अगोदरच आजार आहेत. त्यात आज(रविवार) दुपारी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करुन हृदयाच्या संबंधित त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संध्याकाळी त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
जळगाव शहरातील गजानन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या.खडसेंंच्या प्रकृती बाबतची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली.खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणीताई खडसेदेखील रुग्णालयात दाखल झाल्या.रुग्णालयात आल्याबरोबर त्यांनी येथील डॉक्टरांशी चर्चा केली व त्यानंतर सायंकाळी त्यांना मुंबईला हलवण्यात आले.त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here