हार्दिक पंड्या क्रिकेट विश्वचषकातून बाहेर जलदगती गोलंदाज प्रसिध्द कृष्णाची निवड

0
1

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय क्रिकेट संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या 2023 च्या वनडे क्रिकेट विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत घोट्याला दुखापत झाल्यामुळे पंड्याचा प्रवास इथेच थांबत आहे. हार्दिक पंड्याला पुढील सर्व सामन्यांना मुकावे लागण्याची चर्चा असताना काही मीडिया रिपोर्ट्समध्ये मात्र हार्दिक नॉकऑफ सामन्यांच्या वेळेत तंदुरुस्त होऊन पुनरागमन करु शकतो, असा दावा केला जात होता. परंतु तोही आता फोल ठरताना दिसत आहे.
हार्दिक पंड्याच्या जागी प्रसिध्द कृष्णाची संघात निवड करण्यात आली आहे. या बदलाला शनिवारी विश्वचषकाच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने मान्यता दिली आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे.
जलदगती गोलंदाज प्रसिध्द कृष्णा आता हार्दिकची कमतरता भरुन काढणार का, याची उत्सुकता क्रिकेट रसिकांना आहे.लम्बर स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे प्रसिध्दला आयपीएल 2023 लाही मुकावे लागले होते. त्यानंतर वनडे विश्वचषकात आपला जलवा दाखवण्याची त्याची इच्छा होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here