• Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
Saimat Live
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
Saimat Live
No Result
View All Result

वर्ल्डकप फायनलच्या दिवशी घातपाताची खलिस्तान्यांची धमकी!

Kishor Koli by Kishor Koli
November 5, 2023
in Uncategorized
0

ओटावा : वृत्तसंस्था

देशभरात सध्या क्रिकेट विश्वचषकाचा उत्साह पाहायला मिळत आहे. टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली असून फायनलमध्येही भारतीय संघानेच विजेतेपद पटकवावे अशी इच्छा प्रत्येक भारतीयाची आहे पण त्याचदिवशी घातपात करण्याची धमकी कॅनडातील खलिस्तान्यांचा म्होरक्या गुरपतवंतसिंग पन्नूने दिली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याने ही धमकी दिली आहे.१९ नोव्हेंबरला शीख समुदायाने दिल्ली विमानतळावरून विमान प्रवास करू नये, असा इशाराही त्याने दिला आहे.
गुरपतवंतसिंग पन्नू हा खलिस्तानी दहशतवादी असून भारतीय सुरक्षा व्यवस्थेसाठी तो एक फरार गुन्हेगार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गुरपतवंतसिंग पन्नू व्हिडीओच्या माध्यमातून अशी गरळ ओकताना दिसत आहे. हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणामुळे भारत व कॅनडामधील संबंध ताणले गेले असताना त्यासंदर्भातही गुरपतवंतसिंग पन्नूने भावना भडकावणारी व भारतविरोधी विधाने केली होती. या पार्श्वभूमीवर आता पन्नूने वर्ल्डकप फायनलच्या दिवशी दिल्ली विमानतळाचे नाव बदलण्याची धमकी दिली आहे.
पन्नूचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे पन्नूने वर्ल्डकप फायनलचा उल्लेख केल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्या दृष्टीने अधिक चोख बंदोबस्त केला जाण्याची शक्यता आहे.
पन्नूच्या सिख्स फॉर जस्टिस अर्थात एसएफजे या संघटनेवर अमेरिकन सरकारने बंदी आणली आहे. अमृतसरमध्ये जन्मलेला पन्नू २०१९पासून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. याचवर्षी एनआयएने पन्नूच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल केला. दहशतवादी कारवायांचे नियोजन करणे, त्या अंमलात आणणे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. त्याच्याविरोधात ३ फेब्रुवारी २०२१ रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटही जारी केले आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?
पन्नूनं जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये १९ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करणार असल्याचा इशारा दिला आहे.“१९ नोव्हेंबरला जगभरात एअर इंडियाची विमाने जाऊ दिली जाणार नाहीत. १९ नोव्हेंबरला शिख समुदायाने एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करू नये. नाहीतर तुमच्या जिवाला धोका असू शकतो. १९ नोव्हेंबरला दिल्ली विमानतळ बंद राहील. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव शहीद बियंतसिंग, शहीद सतवंत सिंग खलिस्तान एअरपोर्ट असे केले जाईल. आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडून ठेवणार आहोत, अशी धमकी पन्नूने व्हिडीओमध्ये दिली आहे.

Previous Post

मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांचा विषय पेटणार

Next Post

माझ्या डोळ्यादेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावे

Next Post

माझ्या डोळ्यादेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव रुग्णालयात

December 8, 2023

गंभीरसोबतचे भांडण आणि लिजेंड्स लीग क्रिकेटच्या कमिश्नरकडून कायदेशीर नोटीस

December 8, 2023

दिशा पाटीलची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

December 8, 2023

नवाब मलिकनंंतर प्रफुल्ल पटेल विरोधकांच्या रडारवर!

December 8, 2023

देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना रोखठोक पत्र

December 7, 2023

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील

December 7, 2023
  • Home
  • About
  • Team
  • Buy now!

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143

No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143