Author: saimat team

‘कोरोना` पॉझिटिव्ह पण लक्षणे नाहीत, मग रुग्णसंख्या जास्त का म्हणावी? जळगाव ः विशेष प्रतिनिधी सद्यस्थितीत कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे मात्र पहिल्या व दुसऱ्या लाटेसारखा कहर यावेळी दिसून येत नाही हे विशेष. जिल्ह्याचा विचार करता येथील रुग्णसंख्या दैनिक स्वरूपात वाढती आहे परंतु यावेळी कोविड सेंटर गजबजलेले नाहीत आणि जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्यापपावेतो फक्त कोरोना रुग्णांसाठी सारे रुग्णालय आरक्षित नाही.उल्लेखनीय की,रोजची वाढलेली रुग्णसंख्या सांगतांना आता “लक्षणे नसलेले“असे रुग्ण सांगितले जात आहेत.म्हणजे नेमके कोरोनाग्रस्त किती?,लक्षणे नाहीत तर मग त्यांना कोरोनाग्रस्त कसे म्हणता येईल?असे प्रश्न येथे चर्चेत असून सारीच संभ्रमावस्था आहे. मार्च 2020 पासून साऱ्या देशात आणि दुनियेत कोरोनाचा कहर…

Read More

पुण्यातील एका खासगी कंपनीमध्ये मॅनेजमेंट प्रोफेश्नल असणाऱ्या उच्चशिक्षित महिलेला ६२ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय. या महिलेची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीची पीडितेशी एका वधु-वर सूचक संकेतस्थळावरून (मॅट्रिमोनिअल साईटवर) ओळख झाली होती. या व्यक्तीने स्वत:ची ओळख करुन देताना आपण ब्रिटनमध्ये सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करतो असं सांगितलं होतं. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार पीडित महिलेने वाकड पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मॅट्रिमोनिअल साईटवर संबंधित आरोपी या महिलेच्या पहिल्यांदा संपर्कात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. काही दिवसानंतर या दोघांनी फोनवरुन गप्पा मारण्यास सुरुवात केली. आपण भारतात परतण्याचा विचार करत असल्याचं या व्यक्तीने संबंधित महिलेला सांगितलं. भारतात परतल्यानंतर…

Read More

बोदवड:-( महेंद्र पाटील) बोदवड नगरपंचायत निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओ बी सी. जागेवरील निवडणुका सर्वासाधारण प्रवर्गातून होत आहेत. त्या नुसार बोदवड नगरपंचायत निवडणूकीतसुद्धा दुसऱ्या टप्प्यात चार जागांच्या साठी निवडणूक होत आहेत. या चार पैकी दोन जागा महीला राखीव आहेत. पहिल्या टप्यात झालेल्या तेरा जागांवर अत्यंत चुरशीने निवडणूका लढल्या गेल्या त्यामुळे चार जागेसाठी सुद्धा ती चुरस अजून कायम आहे. नगरपंचायतीवर सत्ता काबीज करण्यास एक एक जागा महत्वाची आहे याची जाणिव झाल्याने राजकीय पक्षाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. पहिल्या टप्यातील निवडणुकीसाठी वेळ कमी भेटला तर या वेळी जास्त वेळ भेटल्याने  प्रचाराचे व तडजोडीचे…

Read More

फैजपूर: प्रतिनिधी येथील धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव विभागाच्या  आंतर महाविद्यालयीन भारतोलन, शक्तितोलन आणि शरीर सौष्ठव  स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाने बाजी मारली.        भारतोलन, शक्तितोलन आणि शरीर सौष्ठव स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ अध्यक्षस्थानी जीमखाना समितीचे चेअरमन डॉ. सतिश चौधरी हे उपस्थित होते. उद्घाटन समारंभास प्रा. डॉ. प्रतीभा ढाके, विद्यापीठ क्रीडा मंडळ सदस्य जळगाव विभागाचे सचिव प्रा. डोंगरे, प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. किशोर वाघ एरंडोल, प्रा. डॉ. मुकेश पवार, प्रा. डॉ सचिन झोपे, प्रा. डॉ. बेलोरकर, प्रा. डॉ. आनंद उपाध्याय, प्रा. सुभाष वानखेडे, प्रा. डॉ. चाँद सर, प्रा. डॉ. महेश पाटील प्रा.…

Read More

 पाचोरा(वार्ताहर)   पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी वाचन संस्कृती वाढीसाठी पुढे सरसावत तसेच  विविध स्पर्धा  परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मतदारसंघातील २९  सार्वजनिक वाचनालयांना संक्रांत भेट म्हणून १३ लाख रुपयांची पुस्तके आपल्या स्थानिक विकास निधीतून भेट देत त्यांची संक्रांत गोड केली आहे.पाचोरा भडगाव तालुक्यातील वाचनालयांना पुस्तके वितरणाचा कार्यक्रम  ‘शिवालाय’ या संपर्क कार्यालयात शनिवारी दुपारी ११ वाजता संपन्न झाला.     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील हे होते व प्रमुख पाहुणे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले हे उपस्थित होते.  याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सर्व वाचनालयाच्या संचालकांना युवा वर्गाला अधिकाधिक वाचनालयाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावे व…

Read More

मुक्ताईनगर —  शहरातील जुन्या गावातील नथाबाई दौलत बोदडे (वय 85 वर्षे ) यांचे आज पहाटे पाच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती संतोषदादा बोदडे तसेच कॉन्ट्रॅक्टर दिलीप बोदडे यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात मुले , मुलगी , जावई , सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Read More

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र अडचणीत असताना केंद्र सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. तेव्हा केंद्राने मदत केली असती तर महाराष्ट्रातील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले नसते, असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)यांनी केले आहे. त्याचबरोबर आज सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालय ओबीसी समाजाला दिलासा देणारा निर्णय घेईल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यावर केंद्र सरकारने मदत केली नाही. मात्र आता मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह देशातील ओबीसी समाज एकवटताना दिसत आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून इम्पेरिकल डेटा गोळा…

Read More

मुंबई :  शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. कणकवली येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नितेश राणे  यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालायनेही नितेश राणे यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. दरम्यान कोर्टाने मनीष दळवीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिनावर निकालासाठी उच्च न्यायालयाने आजचा दिवस निश्चित केला होता. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती. मात्र…

Read More

वर्धा, वृत्तसंस्था । वर्धा (Wardha) शहरातील कदम रुग्णालयाच्या परीसरात मानवी कवट्या आणि काही अवशेष आढळल्यानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. प्रकरणात आता वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये (Arvi) असलेल्या कदम रुग्णालयाच्या डॉ.नीरज कदमला (Dr.Niraj Kadam) अटक करण्यात आली. शनिवारी रात्री पोलिसांनी नीरजला (Dr.Niraj Kadam) अटक केली असून अटकेतील संशयीतांची संख्या आता सहा झाली आहे. दरम्यान, कायद्याला वेशीवर टांगून गर्भपात करणार्‍या आर्वीतील डॉ. कदम हॉस्पिटलमध्ये (Warda Kadam Hospital) अवैध गर्भपाताची नोंदच टाळून सांकेतिक भाषेत गर्भपाताची चिठ्ठी तयार केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. घरातून मिळाली काळविटाची कातडी डॉ.निरज कदमच्या (Dr.Niraj Kadam) घरामधून तपासणीदरम्यान काळविटाची कातडी जप्त करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर वनविभागाच्या अधिकार्यांनी…

Read More

सावदा-प्रतिनिधी  “सदरील घन कचरा प्रकल्प व त्याच्याशी निगडित बाबींची वृत्तसंकलन साठी पालिकेत जाऊन दि.१० जानेवारी २०२२ रोजी पत्रकारांनी चौकशी केली असता मला याची काहीच माहिती नाही माझाकडे कोणत्याच प्रकारचे बिल वगैरेचा लेखाजोखा नसून अकाउंट विभागात तुम्ही जाऊन चौकशी करावी.किंवा अर्ज टाकून माहिती विचारावी असे बेजबाबदारीचे व उडवाउडवीचे उत्तर आरोग्य अधिकारी महेश चौधरी यांनी दिल्यामागील कारण काय?यात खरोखर काही गौडबंगाल तर नाही ना?किंवा त्यांचे सदरील ठेकेदारांशी अर्थपूर्ण संबंध तर नाही ना? अशी शंका आरोग्य अधिकारी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उपस्थित होत असून याआधी देखील या आरोग्य अधिकारीच्या कार्यकाळातील भोंगळ कारभार बाबत एका विद्यमान नगरसेविकेने तक्रार देऊन चौकशीची मागणी केली आहे.मात्र या दिशेने…

Read More