जळगाव, प्रतिनिधी । ‘अडचणीत असलेल्यांना आपल्या स्वतःलाच अडचणी सोडवाव्या लागतात, परंतु अशा व्यक्तींना आपल्यापरीने मदत करणे म्हणजे त्याचे दुःख कमी करणे होय, अशी मदत करणे भाग्याचे काम असते अशी शिकवण आई कांताई यांनी आम्हाला दिली. जैन इरिगेशनच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना ‘स्नेहाची शिदोरी’ नक्की उपयोगी ठरेल’. असे मत जैन इरिगेशनचे महाराष्ट्र विपणन प्रमुख अभय जैन यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते कांताबाई जैन यांच्या 84 व्या जन्म जयंती आणि कांताई नेत्रालयाच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या औचित्याने एसटी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात स्नेहाची शिदोरी वितरीत करण्यात आली. (ज्यात महिनाभर पुरेल इतक्या किराणा मालाचा समावेश आहे) यावेळी ते बोलत होते. छोटेखानी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ. अंतरिक्ष महातो,…
Author: saimat team
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,१६० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,०९० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,१६० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,१६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर…
सोयगाव ( प्रतिनिधी ) : सोयगाव मध्ये महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाचा विजय झाला असून या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत 17 पैकी 11 जागेवर विजय मिळवीत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. भाजपला केवळ 6 जागेवर समाधान मानावे लागले. विजयाची घोषणा होताच सोयगाव येथील शिवसेना पक्ष कार्यालय सेना भवन येथे फटाक्यांची आतषबाजी , जय भवानी जय शिवाजींच्या जयघोषात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, किशोर अग्रवाल, शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे, तालुका संघटक दिलीप मचे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे,…
नागरिकांच्या सोयीसाठी UIDAI कडून PVC आधार कार्ड जारी करण्यात आले होते. परंतु आता युआयडीएआयने, यापुढे पीव्हीसी आधार कार्ड्सना बाजारात मान्यता नसेल, हे सांगणारे ट्विट केले आहे. यामुळे ज्या लोकांनी बाजारातून किंवा शेजारच्या दुकानातून पीव्हीसी आधार कार्ड तयार करून घेतले असेल अशांचे आधारकार्ड अवैध असतील. आजच्या काळात आधारकार्ड हे महत्वाचे दस्तऐवज बनवले आहे. जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. त्यामुळेच, जर तुमच्याकडे सुद्धा हे पीव्हीसी आधारकार्ड असतील तर लगेचच नवीन आधारकार्डसाठी अर्ज करा. ‘हे’ पीव्हीसी आधारकार्ड का झाले अवैध ? पीव्हीसी आधारकार्ड एटीएम कार्ड, ऑफिसचे ओळखपत्र किंवा इतर कार्ड्स प्रमाणे पाकिटात ठेवता येते. यामध्ये सुरक्षिततेसंबंधी अनेक फीचर्स असतात. जसं की,…
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी भंडारा जिल्ह्यात मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठय़ा राजकीय वादाला तोंड फोडले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोललो नसून गावातील गुंडाबाबत बोललो असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. पण राज्यामधील राजकारण पटोले यांच्या या वक्तव्यानंतर चांगलेच तापले आहे. मंगळवारी राज्यातील अनेक ठिकाणी भाजपने आंदोलने, निदर्शने करुन नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध केला. अनेक ठिकाणी नाना पटोलेंच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, नाना पटोलेंची जीभ कापणाऱ्याला एक लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा करत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य जालन्यातील भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी केले आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव सुजीत जोगस असे असून ते जालना भाजपा युवा…
नगर : सर्व राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) कर्जत नगरपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे . या निवडणुकीत 17 पैकी 12 जागा जिंकून राष्ट्रवादीने या नगरपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. तर भाजपच्या पदरात दोन जागा पडल्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाळेल्या दणदणीत विजयाने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. कर्जत नगरपंचायतीवर भाजपची (BJP) सत्ता येईल, असा विश्वास माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी व्यक्त केला आहे. मात्र शिंदे यांचा हा दावा फोल ठरला आहे. निवडणुकीपूर्वी शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर सडकून टीका केली. दबाव, दडपशाही,…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी जरंडी,निंबायती परिसरात तीन दिवसापासून भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली असतांना सोमवारी रात्री जरंडी गावालगतच्या शेतात वेचणी करून ठेवलेला कापूस आणि निंबायती भागात तीन वीजपंप चोरी झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.पोलिसांची रात्रीची गस्त वाढलेली असतांना देखील चोरटे मात्र पोलिसांच्या हातांवर तुरी देवून डल्ला मारत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. जरंडी आणि निंबायती परिसरात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे एकाच रात्री शेतकऱ्याचा वेचणी करून ठेवलेल्या कपाशी सह तीन वीजपंप चोरी झाले आहे जरंडी गावालगत असलेल्या शेतात शेतकरी दिलीप पाटील यांनी वेचणी करून ठेवलेला दोन क्विंटल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे कापसाची चोरी करतांना बाजूच्या शेतातील…
चाळीसगाव प्रतिनिधी – नागपूर जिल्हयातील कळमेश्वर तालुक्यातील पत्रकार योगेश नानाजी कोरडे यांना कर्करोगाने ग्रासले आहे.गत 6 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार चालू असून त्यांना डीफ्यूज लार्ज बी सेल लिंफोमा हा कर्करोग झाला आहे.आधी त्यांच्यावर नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या कॅन्सर रूग्णालयात उपचार सुरू होते.आता त्यांच्यावर जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टियूट येथे उपचार सुरू आहेत.उपचाराचा खर्च अधिक असल्यामुळे त्यांनी डिस्चार्च करून घेतला.त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. घरचा एकमेव कर्ता योगेश हा कोरोनाच्या काळात कर्करोगाशी झुंज देत आहे. त्यामुळे योगेशच्या मदतीसाठी समाजाने मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन पत्रकार संघटनेच्या वतीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात आले होते या आवाहनाला प्रतिसाद देत चाळीसगाव…
चोपडा – महाराष्ट्र नाभिक महामंडळ चोपडा शाखेमार्फत वीर जिवा महाले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सर्व पदाधिकारी व नाभिक समाजबांधवांनी वीर जिवा महाले यांच्या प्रतिमापूजन व माल्यार्पण करीत विनम्र अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जळगांव जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत निकम, चोपडा तालुकाध्यक्ष रविंद्र सैंदाणे, शहराध्यक्ष सोपान बाविस्कर, देविदास बाविस्कर, माजी शहराध्यक्ष मनोहर सोनगिरे, राजेंद्र येशी, शत्रुघ्न सोनवणे, बाला निकम, धनराज पगारे, गणेश खोंडे, लक्ष्मण बाविस्कर, अनिल पगारे, अनिल सैंदाणे, मानव सैंदाणे,भूषण जगताप, गोकुळ सोनवणे, निंबा वाघ, प्रमोद सोनगिरे, हिरालाल सोनवणे, राहुल निकम आदिंसह इतर समाजबांधवांची उपस्थिती होती.
मलकापूर : प्रतिनिधी येथे नाफेड जिल्हा पनण महासंघ. तसेच पृथाशक्ती फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड अहमदनगर यांच्या संयुक्त मका खरेदीची सुरुवात डाॅ.अरविंद कोलते मुख्यप्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर अँड. साहेबराव मोरे जेष्ठ नेते काँग्रेस कमीटी याच्या हस्ते शेतकरी बाळुभाऊ जाधव यांचा शाल व श्रीफळ देवुन खरेदी करण्यात आले. भरड धान्याचे दुसरे सेंटर सुरु झाल्याने मलकापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मका. ज्वारी. बाजरी .तुर .हरभरा (चना) उडीद .मुग .सोयाबीन हमीभावात विकने सोईचे झाले असे मत डाॅ.अरविंद कोलते यांनी मांडले. तालुक्यातील शेतकर्यांना शेतमाल विकणे सोईचे व्हावेत यासाठी आमदार राजेशजी एकडे यांच्या प्रयत्नांचे हे यश आहे असे काँग्रेस चे…