Author: saimat team

जामनेर (प्रतिनिधी): – जळगाव मार्गावरील नेरी येथील वाघूर नदीवरील नवीन पुल सुरू होण्याची प्रतीक्षा होत असताना या पुलाचे काम सहा महिन्यांपासून किरकोळ बाबींसाठी रखडले आहे सध्या वापरात असलेल्या जुन्या पुलाची अवस्था बिकट झाली असून त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते.तसेच नवीन पुलाच्या अपूर्ण कामामुळे ही नागरिकासह वाहनचालकांच्या त्रासात भर पडली आहे त्यामुळे रखडलेले काम लवकर पूर्ण करून नवीन पुल सुरू करावा अशी मागणी होत आहे नेरी येथील वाघूर नदीवरील नवीन पुलाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे.रस्त्यावर निर्माण होणाऱ्या धुळीमुळे पायी जाणाऱ्या व्यक्ती दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला असलेले व्यवसायिक दुकानदार ग्रामस्थ यांना रोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने…

Read More

“प्रत्येक ठिकाणी शासन व प्रशासनाद्वारे जनतेच्या मुलभूत सुविधा व गरजा भागवण्यासाठी वारेमाप पैसा खर्च करून नवीन विकासाच्या दृष्टिकोनातून शहर सुशोभीकरण,गटारी,रस्ते, पथदिवे,व्यापारी संकुलन,बगीचे, सार्वजनिक शौचालय, जलवाहिनी सह विविध योजनेअंतर्गत होणारे कामांच्या दर्जाबाबत सातत्याने जागृत जनतेतून होणारी ओरड व तक्रारींमध्ये तथ्य असले तरी   यात संबंधित अधिकाऱ्यांनी वारंवार घेतलेली धृतराष्ट्राची भूमिका बरेच काही सांगून जात आहे.हे मात्र खरे.” सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा न.पा.हद्दीत समाविष्ट सोमेश्वरनगरात लाखों रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या गटारींचे काम दर्जात्मक न होता.त्यात मातीमिश्रीत वाळूचा सर्रास वापर केला जात असून गटारिच्या भुतळात थेट कच्चे मुरुमचा वापरला जात आहे.यामुळे गटारींचे काम निकृष्ट होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.…

Read More

जामनेर(प्रतिनिधी):- जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभार्थ्यांना वाटपासाठी आलेले साहित्य ठेवण्यासाठी आम्हाला इमारतीची आवश्यकता भासत असल्यामुळे आमच्या मालकीची जागा खाली करावी अशा आशयाचे पत्र पंचायत समिती कार्यालयाने पोलीस स्टेशन प्रशासनाला दिलेले आहे. शहरातील मेन रोडवर असलेल्या इंग्रज राजवटीतील पोलीस स्टेशनची इमारत जीर्ण झाल्यामुळे त्याच जागेच्या बाजूला नविन बांधकाम सुरू असल्यामुळे मागील पाच वर्षांपासून वाकी रोड वरील पंचायत समितीच्या मालकीच्या शिवाजी हॉलमध्ये पोलीस स्टेशनचे भाडे तत्वावर तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून नवीन पोलीस स्टेशनची अद्ययावत इमारत स्वतःच्या जागेमध्ये बांधून तयार असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांच्या हस्ते सदर…

Read More

पाळधी तालुका धरणगाव.  येथुन जवळच असलेल्या पथराड येथिल माध्यमिक विद्यालयात १५वर्षावरील  विद्यार्थांना करिता लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. या वेळी साठ विद्यार्थी यांचे लसीकरण पुर्ण झाले. या साठी चांदसर आरोग्य केंद्राचे डॉ. रीतुल पाटील, पवार , शेख, गोहर, संगीता पाटील, शुभांगी दाभाडे,मुख्याध्यापक जे. के.पाटील आदि उपस्थित होते. यशस्वितेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Read More

पाचोरा (प्रतिनीधी): तालुक्यातिल शिंदाड गावात आठ वर्षांपुर्वी याञेनिमित्त गावात आलेल्या तमाशामध्ये गोंधळ घातला म्हणुन गावातिल 16 जणाविरुध्द गून्हा नोंदवण्यात आला होता.या प्रकरणी पाचोरा न्यायालयाने निकाल दिला असुन सर्व आरोपिंना निर्दोषमुक्त करण्यात आले आहे.न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे शिंदाड गावासह परिसरात स्वागत होत आहे. तालुक्यातिल शिंदाड येथे  2012 चे डिसेंबर महिन्यात गैबानशा बाबा यांच्या उरूस निमित्त याञेचे आयोजन गेल्या अनेक वर्षापासुन केले जात आहे.याञेनिमित्त करमणुकिसाठी  तमाशाचा  कार्यक्रम होत असतो.2012 असाच तमाशाचा कार्यक्रम सुरू असतांना काही नागरिकांनी गोंधळ घालून तमाशा कलावंत स्त्री पुरुषांना मारहाण केली म्हणून पिंपळगाव( हरेश्वर )पोलिस स्टेशनमध्ये  प्यारेलाल वाघ यांच्या तक्रारीवरून 16 जणांविरूध्द गुन्हा  नोंदविण्यात आला होता. 2015 पासून हे…

Read More

जळगाव:प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली येथे आज सकाळी एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिच्या माहेरच्या लोकांनी पैशासाठी तिचा खून सासरच्या लोकांनी केला असल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. प्राजक्ता अजय बारी (बुंधे) वय २२ रा. शिरसोली प्र.न. ता.जि. जळगाव असे या विवाहितेचे नाव आहे . तिच्या लग्नाला फक्त ११ महिने झाले लग्न शेदुर्णी तेथे झाले होते. शिरसोली येथील अजय अशोक बारी (बुंधे) वय ३० असे तीच्या पतीचे नाव आहे. तो तेलंगणा राज्यात मनचगुरु येथे अँब्युलस चालक म्हणून शासकीय नोकरी करतो. दोन दिवसांपुर्वी तो गावी शिरसोलीत आला होता. आज दि. १९ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शिरसोली येथे रहात्या घरात वरच्या मजल्यावर…

Read More

पाचोरा-प्रतिनिधी    पत्रकार, बातमीदार हा सर्वसामान्य जनतेची बाजू मांडणारा, भ्रष्ट राजकारणी आणि अधिकाऱ्यांची पोलखोल करणारा आणि समाजावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा असतो, अशी सामान्य नागरिकांची भावना असते; मात्र काही भानगडबाज मंडळींनी पत्रकारितेची नावाखाली आपल्या तुंबड्या भरण्याचा घाट घातला आहे. सध्या पाचोरा शहरात व ग्रामीण भागात खासगी वाहनांवर प्रेस टिव्ही प्रेस लिहिलेले आणि ऑनलाइन मीडियाच्या नावाखाली कसलीही नोंदणी नसलेले काही स्वयंघोषित बोगस पत्रकार नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये आपली छाप पाडण्यासाठी विविध उद्योग करीत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर प्रेस लिहून आम्ही ऑनलाइन मीडियाचे पत्रकार आहोत, असे प्रेस लिहिलेले ओळखपत्र घेऊन मोठ्या अविर्भावात फिरून नागरिकांसह शासकीय अधिकारी, राजकारणी…

Read More

फैजपूर:प्रतिनिधी  माजी चेअरमन पांडुरंग दगडू सराफ यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्या रिक्त जागेवर वि का सोसायटीच्या संचालकांच्या बैठकीमध्ये मंगळवारी साामाजि कार्यात आवड असलेले राजेश विलास महाजन यांची चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संचालक चंद्रशेखर चौधरी, मिलिंद वाघूळदे, अप्पा चौधरी, केतन किरंगे, नितीन नेमाडे, मेघश्याम कोल्हे, संतोष मेढे, लतीका भंगाळे यांची उपस्थिती होती.

Read More

यावल (सुरेश पाटील) : यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात जिल्हा परिषद जळगाव व यावल पंचायत समिती मार्फत विविध विकास कामे जे होत आहे त्यापैकी 95 टक्के विविध बांधकामे ही राजकीय प्रभावामुळे आणि काही ठेकेदारांकडून टक्केवारी वाटप केली जात असल्याने तसेच अनेक ठिकाणी झेरॉक्स ठेकेदाराना,काम करण्याची माहिती नसलेले, आवश्यक यंत्रसामग्री नसलेले काही ठेकेदार अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करीत असल्याने तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावल तालुक्यात यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात विविध रस्त्यांची बांधकामे, फुलाची बांधकामे,पुलावरील  गटावर ढापे,घरकुले,नाला बांध, पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत विविध कामे अत्यंत निकृष्ट प्रतीची होत असल्याने नायगाव,किनगाव,पाडळसे येथील मनुदेवी रस्त्यावर भालोद, बामणोद परिसरात किनगाव डांभुर्णी,डोंगर कठोरा,सातोद…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे. एकुण १७ जागासाठी मतदान झाले आहे. यापैकी तीन जागांचे निकाल लागले असून यात राष्ट्रवादीचा दोन, तर शिवसेनेनं एका जागेवर विजय मिळविला आहे. बोदवड हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघातील नगरपंचायत आहे. या नगरपंचायतीवर खडसे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर प्रथमच या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या निवडणूकीत सर्वच्या सर्व १७ जागा लढविल्या आहेत. खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेसला बोदवड नगरपंचायतीत बहुमत मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. एकनाथ खडसे यांनीही या निवडणूकीसाठी…

Read More