इंडियन इलेक्ट्रॉनिक ब्रँड Ptron ने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टवॉच Ptron FORCE X11 ला लाँच केले आहे. ही एक ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच असून, याची किंमत २,८०० रुपयांपेक्षा कमी आहे. ही वॉच Boat, Fire-Boltt आणि CROSSBEATS च्या वॉचला टक्कर देईल. या वॉचमध्ये १.७ इंच डिस्प्ले, बिल्ट-इन माइक आणि ब्लूटूथ कॉलिंग सारखे फीचर्स मिळतील. Ptron FORCE X11 ची किंमत वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपी६८ रेटिंगसह येणारी ही वॉच ओनिक्स ब्लॅक आणि स्वेड पिंक रंगात येते. वॉचला अॅमेझॉन इंडियावरून २,७९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर एक वर्षाची वॉरंटी देखील मिळते. स्मार्टवॉचचे फीचर्स या वॉचमध्ये ब्लूटूथ वी५.१ चिपसेट आणि बिल्ट-इन मायक्रोफोनद्वारे वायरलेस कॉलिंगची सुविधा मिळते. म्हणजे तुम्ही स्मार्टफोनशिवाय मित्रांशी बोलू…
Author: saimat team
वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारणारी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका मुंबई: कोविड विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना प्राणवायू पुरवठा करताना झालेली दमछाक पाहून बृहन्मुंबई महानगरपालिकेने थेट स्वतःचेच वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर पुनर्भरण प्रकल्प उभारले. प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जाण्याची मानसिकता असणाऱ्या ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ ची यातून पुन्हा प्रचिती आली आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी काढले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या सहकार्याने, एम पश्चिम विभागातील माहूल रस्त्यावर स्थित महानगरपालिका मैदानावर वैद्यकीय वायुरुप प्राणवायू जंबो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प (मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बॉटलिंग प्लांट) उभारण्यात आला आहे. तसेच महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील रॉयल…
सोयगाव -प्रतिनिधी बचत गटाची रक्कम भरणा करण्यासाठी पाचोराकडे जाणाऱ्या सोयगावचं दोघांना पाचोरयाकडून येणाऱ्या भरधाव वाहनाने उडवून झालेल्या समोर समोर अपघातात सोयगावचे दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना वरखेडी-अंबेवडगाव रस्त्यावर सायंकाळी घडली. सोयगाव शहरातील नारळीबाग येथील रहिवासी आशा सेविका सौ. सविता काकडे(वय ४०) व विष्णु राजनकर(वय २९) हे दोघे बचतगटाचे पैसे भरण्यासाठी सोयगाव येथून एम.एच.२०/फ,झेड ५९३७ या क्रमांकाच्या दुचाकीवरून पाचोरा जात असतांना वरखेडी ते अंबे वडगाव दरम्यान वरखेडी येथून जवळच असलेल्या ऑईल मिल जवळ पाचोऱ्याकडून भरधाव येणाऱ्या इको गाडी क्र-एम-एच-०२ सी.झेड-८३९९ जोरदार धडक दिल्याने या अपघातात सौ.सविताबाई काकडे व विष्णू राजनकर हे जबर जखमी झाले. अपघात घडताच जोरदार आवाज आल्यामुळे याच…
जळगाव, प्रतिनिधी । युवक काँग्रेसच्या वतीने आज डिजिटल मेंबरशिप साठी युवक मेळाव्याचे आयोजन शहरातील काँग्रेस भवन येथे करण्यात आले आगामी काळामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे युवकांचे संघटन मजबूत व्हावे या उद्देशाने काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदिप पवार, प्रमुख उपस्थिती मध्ये आमदार शिरीषदादा चौधरी व प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील उपस्थित होते. आगामी काळात डिजिटल मेंबरशिप च्या माध्यमातून प्रत्येक घरा घरात युवक काँग्रेस पोहचणार. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून डिजिटल मेंबरशिप काँग्रेसची प्रत्येक गावात खेड्यांमध्ये तालुक्यांमध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये करायची असून याच्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा…
मुंबई, प्रतिनिधी । आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्याने ‘सुसाईड नोट’मध्ये नैराश्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत २६ वर्षीय विद्यार्थी हा मास्टरच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने कॅम्पस इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर त्याला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. पवई पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृत विद्यार्थ्यावर नैराश्यावरील उपचार सुरू होते. “आम्हाला सांगण्यात आले आहे की तो काही काळ नैराश्यात होता आणि उपचार घेत होता. त्याने त्याच्या खोलीत एक संदेश देखील सोडला आहे की त्याच्या मृत्यूसाठी…
अबुधाबी, वृत्तसंस्था । येमेनच्या हुथी बंडखोरांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) पुन्हा एकदा मोठा हल्ला केला आहे. अबुधाबी पोलिसांनी माहिती दिली आहे की बंडखोरांनी मुसाफा भागात ड्रोन हल्ला केला. परिसरातील तीन ऑईल टँकरवर ड्रोन टाकण्यात आले. यानंतर तेलाच्या टँकरमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटाची आग अबुधाबी विमानतळापर्यंत पोहोचली. या हल्ल्यात दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सकाळी घडल्याचे सांगण्यात येत आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या हवाल्याने अबू धाबी पोलिसांनी सांगितले की, तेल टँकरवर ड्रोनचा स्फोट इतका जोरदार होता की अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी आग लागली. मात्र, विमानतळावर…
जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा महानगर तर्फे आजपासुन दररोज सकाळी ११ ते १ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे . सदर जनता दरबारात नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडाव्यात असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आलेले होते . त्याअनुषंगाने आज रोजी सोमवार दिनांक 17 जानेवारी 2022 पासुन नागरिकांनि राष्ट्रवादी कार्यालयात येऊन आपल्या समस्या तोंडी व लेखी स्वरूपात मांडल्यात यात प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोविड रुग्णांना सुविधा मिळत नसलेबाबत व इतरही विषयी समस्या मांडण्यात आल्यात त्यानुसार तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना निवेदन देण्यात आले…
कोल्हापूर, प्रतिनिधी । शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी.पाटील यांचे आज वयाच्या ९३ वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ व्यक्तीमत्त्व हरपले आहे. प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील (Kolhapur) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. एन. डी पाटील यांचा जन्म 15 जुलै 1929 रोजी ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला होता.…
मुंबई, वृत्तसंस्था । भिवंडी; एका बंद कपड्याच्या कंपनीत आग लागल्याने धक्कादायक प्रकार . या आगीत कंपनीतील करोडो रुपयाचा ऐवज जळून खाक झाला. भिवंडीत अग्नी तांडव सुरूच असून आज पहाटेच्या सुमारास भिवंडी शहरातील काजी कंपाऊंड परिसरामध्ये असलेल्या एका यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागुन कारखान्यातील कपड्यांचा मोठा साठा जळून खाक झाला आहे.या कारखान्याच्या आजूबाजूला सुमारे ४० ते ५० रहिवाशी घरे आहेत. मात्र दुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही भिवंडी परिसरात वेळोवील आगी या लागतंच असतात, प्रामुख्याने या आगी जानेवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान जास्त लागत असल्याच्या आतापर्यंतच्या पाहणीवरू दिसून आले आहे. त्या मुळे या आगी लागतात का लावल्या जातात हाच प्रश्न सद्या उपस्थित…