रावेर, प्रतिनिधी । बीले पास करण्यासाठी १ लाख १५ हजार रूपयांची लाचेची मागणी करणाऱ्या वन परिक्षेत्रीय अधिकारी याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असून ते शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वनविभागकडून रावेर तालुक्यात ए.एन.आर. रोपवन अंतर्गत त्यांनी चेनसिंग फेनसिंग व गेटचे काम ऑनलाईन ई-टेन्डरींगच्या पध्दतीने घेतले होते. यापैकी त्यांनी दोन काम पुर्ण केले होते. कामाचा त्यांना अद्याप धनादेश मिळालेला नव्हता. धनादेशाच्या मोबदल्यान वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश हरी महाजन (वय-४५) रा. रावेर ता.जि.जळगाव यांनी ५ टक्के कमिशनप्रमाणे १ लाख ३० हजार रूपयांची मागणी केली.…
Author: saimat team
वर्धा, वृत्तसंस्था । पीडितेच्या आईमुळेच झाला अवैध गर्भपाताचा पर्दाफाश आर्वी येथील गर्भपात प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरा बसला आहे. या प्रकरणात धाडस करून तक्रार करणाऱ्या त्या मातेला सलाम करावा, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तिने संपूर्ण प्रकरण उघडकीस आणून पोलिसांना साद दिल्याने जलदगतीने तपास होऊन अवैध गर्भपाताचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे; अन्यथा आणखी किती कोवळे जीव बळी पडले असते कोणास ठाऊक. आरोपींवर कठोर कारवाई करून न्याय मिळण्याची मागणी पीडितेच्या आईने पोलिसांकडे केलेली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा अनेक घटना कधी उजेडातच येत नाहीत. मुलीचे कसे होणार, समाज काय म्हणेल, आपली बदनामी होईल, या भीतीने अनेक गुन्हे दडविले जातात आणि…
यावल, प्रतिनिधी । एक घटस्फोटित तरुण महिला हरवल्याची नोंद पोलीस स्टेशनला गेल्या चार महिन्यापूर्वी झालेली होती आणि आहे.या प्रकरणात खबर देणार तरुण महिलेच्या वडिलाना पोलिसांनी मदत न करता पळवून नेलेल्या मुलास मदत करून त्या मुलीस एका पोलिसाच्या घरी नेऊन मुलीच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात असल्याची लेखी तक्रार महिलेच्या वडिलांनी पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे केल्याने यावल तालुक्यात लव जिहाद प्रकरणाकडे जिल्ह्यातील काही महिला संघटनांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावल तालुक्यातून केला जात आहे. सोमवार दि.17 जानेवारी 2022 रोजी पोलीस अधीक्षक जळगाव जिल्हा यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारीत यावल तालुक्यातील एका घटस्फोटीत तरुण मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे की, गावातील एका…
रावेर प्रतिनिधी । मस्कावद येथील तरूणाचा दुचाकीचा रात्रीच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली, यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. तालुक्यातील मस्कावद येथील तरूणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना रात्री ११ वाजता घडली. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तुषार पांडूरंग इंगळे रा. मस्कावद ता. रावेर हा तरूण आई, पत्नी आणि मुलगासह वास्तव्याला आहे. फोटोग्राफीचे काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. तुषार इंगळे हा १७ जानेवारी रोजी सायंकाळी सावदा येथे मित्र विशाल वानखेडे यांच्यासोबत दुचाकीने आला होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास तुषार हा मित्र विशाल यांच्यासोबत दुचाकीने सावदा येथून…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,०९० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,०९० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६२,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,०९० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,०९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव नगरपंचायतीच्या चार जागांसाठी मंगळवारी मतदान होणार असून एक हजार ७०८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत निवडणूक निर्णय अधिकारी संजीव मोरे तहसीलदार रमेश जसवंत यांचे पथक मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत यासाठी २८ कर्मचारी मतदान प्रक्रिया साठी काम करतील नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यात १३ जागांसाठी झालेल्या मतदानानंतर मंगळवारी उर्वरित चार जागांसाठी मतदान करण्यात येत आहे यानंतर बुधवारी मतमोजणी करण्यात येणार आहे वर्षभरापासून तीन वेळा प्रशासकांच्या ताब्यात गेलेल्या नगरपंचायतीच्या नगरसेवकांना संधी देण्यासाठी प्रक्रिया हाती घेण्यात आलेली आहे त्यामुळे मंगळवारी चार जागांसाठीच्या बारा उमेदवारांचे आणि पहिल्या टप्प्यातील १३ जागांसाठी च्या ४० अशा ५२ उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे…
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बेताल वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी सोमवारी संध्याकाळी भंडारा पोलिस ठाण्यात पटोले यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून, अधिक तपास करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. पटोलेंचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपनेही त्यांच्यावर टीकेची राळ उठवली. भंडारा जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक आज, मंगळवारी होत आहे. त्यानिमित्ताने १६ जानेवारीला प्रचाराच्या अखेरच्या दिवशी लाखनी तालुक्यातील जेवनाळा या गावातील सभेत पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. पटोले यांच्या या वक्तव्याच्या विरोधात…
कुऱ्हाड प्रतिनिधी चेतन साळुंके कुर्हाड खुर्द येथे आज सकाळी १५ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण प्रतिबंधक शिबिर पार पडले. सध्या कोरणा चा वाढता प्रादुर्भाव व तिसरी लाट थोपविण्यासाठी शासनाने १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थी, मुले व मुलीसाठी लसीकरण मोहीम राबवण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या आदेशान्वये आज दि.१७ रोजी सकाळी १० वाजता कुऱ्हाड खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात लसीकरण शिबिर
सोयगाव-प्रतिनिधी जरंडी च्या कोविड केंद्रात उपचारासाठी असलेले कोरोना बाधित रुग्ण गंभीर लक्षणांची नाहीत या रुग्णांना खोकला सर्दी आणि ताप अशी लक्षणे नसून केवळ घशातील खवखव हाच प्रकार उपचारादरम्यान आढळून आला आहे त्यामुळे तिस-या लाटेची सोयगाव करांनी चिंता करू नये अशी माहिती कोविड वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियदर्शनी पवार यांनी दिली जरंडी च्या एकमेव तालुक्याच्या कोविड केंद्रात डॉ. प्रियदर्शनी पवार यांच्यासह आरोग्य कर्मचारी रुग्णावर उपचार करत असून या रुग्णांना पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले तालुक्याची रुग्ण संख्या १५ वर गेली असता त्यातील एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे उर्वरित १४ रुग्णांपैकी अकरा रुग्ण होमआयसोलेशन मध्ये असून कोविड वैद्यकीय अधिकारी डॉ.…
जामनेर (प्रतिनिधी):- अवास्तव अपेक्षा असणाऱ्या वर किंवा वधु पित्यानी आपल्या मुलाचे किंवा मुलीचे स्थळ शोधणे सुरू करण्या अगोदर फक्त एक वेळेस तुम्ही जिथे राहत असत त्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कोर्टात एक वेळेस फेर फटका मारून या आणि मग घरी येऊन विचार करा की नेमके कसे स्थळ तुम्हाला पाहिजे तुमच्या पेक्षा जास्त श्रीमंत स्थळ तुम्हाला हवे की सर्वसाधारण असले तरी चालेल परंतु चांगली माणसे हवीत, याचा विचार मुलामुली पालकांकडून आवश्य व्हावा. सध्या कोर्टात गुन्हेगारांपेक्षा जास्त घटस्फोट घेणाऱ्या मुला-मुलींची संख्या जास्त दिसायला लागली आहे, थोडं खोलात शिरण्याचा प्रयत्न केल्यावर घटस्फोट का हवा आहे तर खूप मजेशीर उत्तर मिळतात मुलगा व मुलीकडून, मागच्या…