Author: saimat team

फैजपूर:प्रतिनिधी  माजी चेअरमन पांडुरंग दगडू सराफ यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्या रिक्त जागेवर वि का सोसायटीच्या संचालकांच्या बैठकीमध्ये मंगळवारी साामाजि कार्यात आवड असलेले राजेश विलास महाजन यांची चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संचालक चंद्रशेखर चौधरी, मिलिंद वाघूळदे, अप्पा चौधरी, केतन किरंगे, नितीन नेमाडे, मेघश्याम कोल्हे, संतोष मेढे, लतीका भंगाळे यांची उपस्थिती होती.

Read More

यावल (सुरेश पाटील) : यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात जिल्हा परिषद जळगाव व यावल पंचायत समिती मार्फत विविध विकास कामे जे होत आहे त्यापैकी 95 टक्के विविध बांधकामे ही राजकीय प्रभावामुळे आणि काही ठेकेदारांकडून टक्केवारी वाटप केली जात असल्याने तसेच अनेक ठिकाणी झेरॉक्स ठेकेदाराना,काम करण्याची माहिती नसलेले, आवश्यक यंत्रसामग्री नसलेले काही ठेकेदार अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करीत असल्याने तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावल तालुक्यात यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात विविध रस्त्यांची बांधकामे, फुलाची बांधकामे,पुलावरील  गटावर ढापे,घरकुले,नाला बांध, पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत विविध कामे अत्यंत निकृष्ट प्रतीची होत असल्याने नायगाव,किनगाव,पाडळसे येथील मनुदेवी रस्त्यावर भालोद, बामणोद परिसरात किनगाव डांभुर्णी,डोंगर कठोरा,सातोद…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे. एकुण १७ जागासाठी मतदान झाले आहे. यापैकी तीन जागांचे निकाल लागले असून यात राष्ट्रवादीचा दोन, तर शिवसेनेनं एका जागेवर विजय मिळविला आहे. बोदवड हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघातील नगरपंचायत आहे. या नगरपंचायतीवर खडसे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर प्रथमच या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या निवडणूकीत सर्वच्या सर्व १७ जागा लढविल्या आहेत. खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेसला बोदवड नगरपंचायतीत बहुमत मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. एकनाथ खडसे यांनीही या निवडणूकीसाठी…

Read More

उत्तरप्रदेश, वृत्तसंस्था । उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असताना दुसरीकडे समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांची सून अपर्णा यादव भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा एका वरिष्ठ नेत्याने केला आहे. भाजपा नेत्याच्या दाव्यामुळे काही आठवड्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीआधी समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसू शकतो. पक्षातील तीन मंत्री आणि काही आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अखिलेश यादव यांच्यासोबत हातमिळवणी केल्यानंतर भाजपाकडूनही जशास तसं उत्तर दिलं जात असल्याचं बोललं जात आहे. हरियाणाचे भाजपा प्रभारी अरुण यादव यांनी मंगळवारी रात्री ट्विट करत सांगितलं की, “मुलायम सिंग यादव यांचा लहान मुलगा प्रतिक याची पत्नी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाविरोधात भारतीय जनता पक्षाकडून ठरवून विरोध होत आहे. सोमवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्यांनी लज्जास्पद असा गनीमी कावा करीत रांगोळी टाकून विरोध केला व घोषणाबाजी केली. निषेध व्यक्त करण्याची ही कोणती पद्धत? लोकशाहीला काळीमा फासणारी तसेच राज्यातील शांततेचे भंग करणारे सदर कृत्य दिसून येते. रात्री बेरात्री अयोग्य वेळी कुणाच्या निजी निवासस्थानी जाऊन असे करणे समाजातील शांतता भंग करण्यासाठीचा ठरवून केल्याचा प्रकार दिसून येतो. एका राष्ट्रीय पक्षाच्या युवा मोर्चाला या…

Read More

सोयगाव, प्रतिनिधी । सतरा जागांसाठी झालेल्या दोन टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची मोजणी बुधवारी सकाळी दहा वाजता सुरु हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी तब्बल तीन टेबल साठी ३५ कर्मचारी तैनात करण्यात आली असून मतमोजणीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली आहे.५२ उमेदवारांचा बुधवारी फैसला होणार असून तीन टेबल साठी मतमोजणीची सहा फेऱ्यांमध्ये व्यवस्था करण्यात आलेली असून दुपारी बारा वाजेपुर्वी निकाल बाहेर येणे अपेक्षित आहे.

Read More

सावदा,. प्रतिनिधी । वाढता कोरोना संसर्ग व संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता 15 ते 18 वयोगटातील युवकांच्या लसीकरणाला शहरात सुरूवात करण्यात आली. सावदा शहरात (sawada city) हे लसीकरण (coronavirus vaccine) सुरू करण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी (suraj pardesi) यांनी केली होती व या मागणीला यश आल्याने समाधान व्यक्त होत आहे. सावद्यात लसीकरणामुळे समाधान सावदा हे तालुक्यातील मोठे शहर असल्याने 15 ते 18 वयोगटातील युवकांचे लसीकरण येथे देखील होणे आवश्यक असल्याने ते त्वरीत सुरू करावे, अशी मागणी शिवसेना सावदा शहरप्रमुख सुरज परदेशी यांनी आमदार चंद्रकांत पाटील व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली होती. सावदा ग्रामीण रुग्णालयात 15 ते 18…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एकुलती येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष अरुण पाटील यांनी आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या राजगड निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांनी शिवबंधन धागा बांधून भगवा रुमाल टाकून शिवसेनेत सत्कार केला याप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील मुकेश जाधव अभिषेक पाटील शुभम वारके आदी मान्यवर उपस्थित होते संतोष पाटील यांचे शिवसेनेत प्रवेश केला म्हणून विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील शिवसेना प्रवक्ता गणेशराव पांढरे संजय तायडे उपतालुकाप्रमुख अशोक जाधव सुकलाल बारी जामनेर शहर प्रमुख अतुल सोनवणे शेंदुर्णी शहर प्रमुख भैय्या गुजर आदींनी अभिनंदन केले आहे

Read More

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण ४०९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर १८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन एस चव्हाण यांनी दिली आहे. जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात दिवसभरात ४०९ रूग्ण आढळून आले आहे. तर १८० रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. यात जळगाव शहर-१५९, जळगाव ग्रामीण-१८, भुसावळ १०६, अमळनेर-५, चोपडा-४३, पाचोरा-९, भडगाव-१३, धरणगाव-६, यावल-१, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-४, पारोळा-९, चाळीसगाव-७, मुक्ताईनगर-२० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४०९ बाधित रूग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४५ हजार ७८५ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ७२६ रूग्ण…

Read More