Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी १२ व लातूर जिल्ह्यातील चाकुर नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी ६ जागा व यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव नगरपंचायत निवडणुकीत १ जागा जिंकत दमदार कामगिरी करणाऱ्या बच्चुभाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाच्या यशाचा जल्लोष पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जळगावात साजरा केला. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाने नेहमीच शेतकरी,कष्टकरी,कामगार, महिला व अपंग आदी शोषित वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला आहे. पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी १२ जागा जिंकत दमदार कामगिरी केली आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील चाकुर नगरपंचायत निवडणुकीत सुध्दा १७ पैकी ६ जागा जिंकून मराठवाड्याच्या राजकारणात एन्ट्री केली आहे.…

Read More

वावडदा, प्रतिनिधी । येथील सरपंच राजेश वाडेकर सर यांनी स्वखर्चाने गावातील ग्रामस्थांसाठी तसेच परिसरातील रुग्णासाठी वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर दहा लाख रुपये खर्च करून आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते विशाल देवकर यांचा हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मजूर फेडरेशन चे चेअरमन लीलाधर तायडे, पुरुषोत्तम चधरी, अजय सोनावणे, तालुका अध्यक्ष बापू परदेशी, कानळदा येथील सरपंच पुडलिक सपकाळे, भैय्या चव्हाण, पाथरीचे निलेश पाटील, संभाजी पाटील वडली, मधुकर पाटील म्हसावद, ईश्वर पाटील वाकडी, समाधान निकुंभ दापोरा, अरुण पवार सरपंच विटनेर, नितीन जैन, बाबू पिंजारी, समाधान सपकाळे, यांचेसह परिसरातील…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे युवक मंडळांना मोफत क्रीडा साहित्य वितरण करण्यात येणार आहे. नेहरू युवा केंद्राशी संलग्नित असलेल्या जिल्ह्यातील युवक मंडळांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे दरवर्षी जिल्ह्यातील युवक मंडळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात येत असते. यावर्षीचे क्रीडा साहित्य लवकरच वाटप करण्यात येणार असून नेहरू युवा केंद्राशी संलग्नित असलेल्या युवक मंडळांना नोंदणीसाठी आवाहन करण्यात येत आहे. ज्या संस्था, युवक मंडळांना क्रीडा साहित्य हवे आहे त्यांनी नेहरू युवा केंद्र कार्यालय, द्रौपदी नगर, मानराज पार्कजवळ, जळगाव या कार्यालयात किंवा 0257 2951754 या फोन क्रमांकावर दिनांक 5 फेब्रुवारीपर्यंत संपर्क…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबी पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत. त्याबाबतचे सर्व निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहेत. तसेच, राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समंती दिली असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

Read More

सातारा, वृत्तसंस्था । साताऱ्यात माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धदक्कादायक घटना घडली आहे. पळसवडे येथे ही घटना घडली असून मारहाण झालेली महिला कर्मचारी तीन महिन्यांची गर्भवती आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत होता. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आपल्या पत्नीसोबत महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे गस्त घालण्यासाठी आले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. व्हायरल झालेल्या व्हिडीओत दांपत्य सिंधू सानप यांना…

Read More

चाळीसगाव, प्रतिनिधी | चाळीसगाव येथील २७ वर्षीय विवाहितेला नवीन दवाखाना बांधण्यासाठी माहेरून २५ लाख रुपये घेऊन ये म्हणत तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ वर्षीय विवाहितेला नवीन दवाखाना बांधण्यासाठी माहेरून २५ लाख रुपये घेऊन ये सांगत तिच्यावर शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. सुरूवातीला पतीसह सासरच्या मंडळींकडून सदर विवाहितेला चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर दवाखाना बांधण्यासाठी तुझ्या आई-वडीलांकडून पैसे देऊन ये असे सांगून छळवणूक करण्यात आली. त्याचबरोबर पैसे देऊन ये अन्यथा दुसरा विवाह करून घेईल अशी धमकी पती निखील प्रमोद कोठावदे यांच्याकडून देण्यात आली.…

Read More

नवी दिल्ली, । “आज कोट्यवधी भारतीय स्वर्णिम भारताची पायाभरणी करत आहेत. राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपली प्रगती दडलेली आहे. राष्ट्र आपल्यापासून अस्तित्वात आहे आणि राष्ट्रापासूनच आपले अस्तित्व आहे. नवीन भारताच्या निर्मितीमध्ये ही जाणीव भारतीयांची सर्वात मोठी ताकद बनत आहे,” असे वक्तव्य ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आज पंतप्रधान मोदींनी नागरिकांना संबोधित करताना केले. “आज आपण अशी व्यवस्था निर्माण करत आहोत ज्यामध्ये भेदभावाला जागा नाही. समता आणि सामाजिक न्यायाच्या पायावर भक्कमपणे उभा असलेला समाज आम्ही निर्माण करत आहोत. ज्याचा विचार आणि दृष्टीकोन नाविन्यपूर्ण आहे आणि ज्याचे निर्णय प्रगतीशील आहेत, अशा भारताचा उदय होताना आपण पाहतोय,” असं मोदी म्हणाले. “राणी चेन्नम्मा, मातंगिनी हाजरा,…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । ‘अडचणीत असलेल्यांना आपल्या स्वतःलाच अडचणी सोडवाव्या लागतात, परंतु अशा व्यक्तींना आपल्यापरीने मदत करणे म्हणजे त्याचे दुःख कमी करणे होय, अशी मदत करणे भाग्याचे काम असते अशी शिकवण आई कांताई यांनी आम्हाला दिली. जैन इरिगेशनच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना ‘स्नेहाची शिदोरी’ नक्की उपयोगी ठरेल’. असे मत जैन इरिगेशनचे महाराष्ट्र विपणन प्रमुख अभय जैन यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते कांताबाई जैन यांच्या 84 व्या जन्म जयंती आणि कांताई नेत्रालयाच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या औचित्याने एसटी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात स्नेहाची शिदोरी वितरीत करण्यात आली. (ज्यात महिनाभर पुरेल इतक्या किराणा मालाचा समावेश आहे) यावेळी ते बोलत होते. छोटेखानी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ. अंतरिक्ष महातो,…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,१६० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,०९० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,१६० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,१६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर…

Read More