Author: saimat team

जामनेर(प्रतिनिधी): – मसाप जामनेर शाखेची स्थापना झाली असुन परिषदेचे जिल्हा प्रतिनीधी प्राचार्य तानसेन जगतप यांनी मान्यता पत्र रविवारी शाखा अध्यक्ष डॉ.अशोक कोळी यांना दिले.  कला, वाणिज्य व विज्ञान महविद्यालयात मसाप शाखेची सर्व साधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक नाना लामखेडे होते. चाळीसगांवचे कार्यवाह प्रा. मनोहर आंधळे, गणेश आढाव, प्रा. सुधीर साठे, डॉ निळकंठ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.  कार्यकारिणी अशी : अध्यक्ष डॉ.अशोक कोळी, उपाध्यक्ष सुहास चौधरी, सुधाकर चौधरी, कार्याध्यक्ष डॉ. संदीप माळी, प्रमुख कार्यवाह डॉ.विजयेंद्र पाटील, कोषाध्यक्ष किशोर काळे, कार्यवाह डॉ. आशिष महाजन, रत्नकांत सुतार, सदस्य प्रा.पुरुषोत्तम महाजन, गणेश राऊत, संदीप गायकवाड, आकोश कोळी, मोहन सारस्वत, डॉ स्वाती विसपुते,…

Read More

नवी दिल्ली : गेल्या सुमारे आठ वर्षांपासून देशात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारविरोधात मागच्या काही दिवसांपासून नाराजी वाढली आहे, असा विरोधी पक्षांचा प्रचार आहे. यासाठी शेतकरी आंदोलन, वाढती महागाई आणि बेरोजगारी, तसेच कोरोनाचे संकट सांगितले जातात. मात्र एका जनमत चाचणीत पंतप्रधान म्हणून मोदींना अजूनही ५३ टक्के लोकांचा पाठिंबा आहे आणि आज लोकसभेची निवडणूक झाली तर रालोआला २९६ जागा मिळतील, असा कौल मिळाला. इंडिया टुडे आणि सी वोटरने ही जनमत चाचणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज देशात निवडणूक झाल्यास देशात मोदींची सत्ता कायम राहण्याची शक्यता आहे. ४०.७ टक्के मते मोदी आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळतीत. तर २६.७ टक्के मते काँग्रेसच्या नेतृत्वाखालील…

Read More

जळगाव, विशेष प्रतिनिधी चौकांच्या नामकरणासाठी रस्त्यावर येता , घरपट्टी भरमसाठ वाढविल्याबद्दल गप्प का ? (एकट्या ललित कोल्हे यांनीच आवाज उठविला ) सध्या जळगाव शहरात महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या सर्कल चे नामांतर करण्याची चढाओढ चालली आहे. राजकीय पदाधिकारी,नेते मंडळी ,स्थनिक नगरसेवक त्यासाठी चक्क रस्त्यावर उतरले आहेत.आणि दुसरीकडे महापालिकेने शहरातील मालमत्तांचे फेरमूल्यांकन करून मालमत्ता धारकांना कित्येक पटींनी घरपट्टी वाढीच्या नोटिसा पाठविल्या आहेत.त्यास सर्वच  मालमत्ता धारकांचा प्रचंड विरोध आहे.मात्र याप्रश्नी कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्या किंवा पदाधिकाऱ्यांनी आवाज उठविलेला नाही.एकटे ललित कोल्हे सोडले तर नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर कोणत्याच सत्ताधारी व विरोधी नगरसेवकाने तोंड उघडलेले नाही त्यामुळे स्थनिक लोकप्रतिनिधी बद्दल जळगावकर नागरिक तीव्र संताप…

Read More

यावल, प्रतिनिधी । न.प. आगामी निवडणूक लक्षात घेता भावी नगरसेवकांना मतदान होणेसाठी,पोषक वातावरण निर्मितीसाठी यावल नगरपरिषद हद्दीत विकसित भागात फक्त व्यासनगर मध्ये मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला त्या प्रमाणे दलित वस्तीत सुद्धा मोफत पाणी पुरवठा सुरू करून मागील तीन महिन्याची पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी यावल तालुका भीम आर्मी तालुकाध्यक्ष प्रवीण बाळू डांबरे यांनी व सदस्यांनी केली आहे. यावल नगरपरिषद मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, जिल्हाधिकार जळगाव,प्रभारी अधिकारी तथा फैजपुर भागाचे  उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नगरपरिषद हद्दीतील फैजपुर रोडला लागून असलेल्या व्यासनगर या विकसित कॉलनीत गेल्या तीन महिन्यापासून यावल नगरपरिषदेमार्फत मोफत पाणीपुरवठा सुरू आहे. त्याचप्रमाणे आमच्यावर दलित वस्तीत प्रभाग…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देणारा आणि विरुद्ध रिझर्व बँक ऑफ इंडिया वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. भारतीय चलन पद्धतीनुसार रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) वेगवेगळ्या प्रसंगी १४ प्रकारची १० रुपयांची नाणी चलनात आणली आहेत. आजपर्यंत रिझर्व बँकेने वर्ष २००९ मध्ये आणि २०१० मध्ये प्रत्येकी २ वेळा, वर्ष २०११, २०१२, २०१३, २०१४ मध्ये प्रत्येकी १ वेळा, तसेच वर्ष २०१५, २०१६ आणि २०१७ मध्ये प्रत्येकी २ वेळा १० रुपयांची नाणी चलनात आणली आहेत. एकूणच आत्तापर्यंत १४ वेळा चलनात आणलेली ही सर्व १० रुपयांची नाणी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना काळात घरातील व्यक्ती गमावलेल्या व्यक्तींना ५० हजार रुपये देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले असताना जळगाव जिल्ह्यात मात्र लाभ देण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरु असल्याबाबत निवेदन लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले आहे. कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांना व परिवारातील स्री अथवा पुरुष गमावलेल्या व्यक्तींना ५० हजार रुपये देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले असताना जळगाव जिल्ह्यात मात्र लाभ देण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे, त्याबाबत तसेच महाराष्ट्र सरकारने कोरोना एकल महिलांना अनेक योजनांचा लाभ देण्याचा उदा. निराधार पेशनं, बालक पालक योजना, हक्काचे रेशन, उद्योग सुरू करायला अर्थार्जन, मनरेगा अंतर्गत ग्रामीण भागात…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले असून शाळा ,कॉलेजही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आता शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील. . मंत्री आदित्य ठाकरेंनी कोविड टास्क फोर्सशी चर्चा करुन शाळा सुरू करण्याबाबत अनुकुलता दर्शवली आहे. त्यामुळे सोमवारपासून शाळा पुन्हा सुरु केल्या जाण्याची शक्यता आहे. आता शाळाबरोबरच राज्यातील महाविद्यालयेही सुरु होणार का, याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली आहे शाळा पुन्हा सुरू…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील खर्चना गावी शेतीशाळा व शेतकरी दिन साजरा करण्यात आला. जामनेर तालुका कृषी विभागातर्फे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा अंतर्गत शेती शाळा व शेतकरी दिन निमित्त महिला शेतकरी तसेच परिसरातील सर्व शेतकऱ्यांची शेतीशाळा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा सदस्य राजधर पांढरे प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार गणेश पांढरे ग्रामपंचायत सदस्य योगेश भडांगे प्रकाश पाटील किरण खैरनार पोलीस पाटील सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जामनेर तालुका कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक महाजन आत्मा समन्वयक राकेश पाटील कृषी सहाय्यक गायकवाड किशोर पाटील पी पी पवार सचिन सानप रुपेश बिराडे आदी कृषी अधिकाऱ्यांनी येथील शेतकऱ्यांना कपाशी मका केळी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । १९ वर्षीय तरुणीचे लग्न मोडण्यासाठी फोटो सोशल मीडियावर बदनामी केल्याची घटना घडली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एका गावातील तरुणीचे लग्न मोडण्यासाठी तरुणीच्या मित्रासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकून तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एका गावात १९ तरुणी वास्तव्यास आहे. ती शिक्षण घेत असून तिचे लग्न जुळले आहे. तरुणीचे लग्न तुटावे या कारणाने इन्टाग्रामवर विशूनेमाने हे खाते असलेल्या व्यक्तीने तरुणीचे तिच्या मित्रासोबत फोटो इन्स्टाग्रामवरुन टाकले. तसेच तरुणीचे लग्न जुळलेल्या तिच्या भावी पतीलाही संबंधित फोटो पाठवून तिची बदनामी केली, अशी तक्रार तरुणीने जळगाव सायबर…

Read More

जळगाव प्रतिनिधी । बॅटरी चोरी करणारा संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याजवळ असलेली बॅटरी पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून ट्रॅक्टरची बॅटरीची चोरी करणाऱ्या संशयित आरोपी आतीष नरेश भाट रा. नवल कॉलनी जळगाव याला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातील बॅटरी जप्त करण्यात आली आहे. दिलीप शिवप्रकाश चांगरे (वय- ६०) हे नवल कॉलनी शिंधी कॉलनी शेजारी, जळगाव इथे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. चांगरे हे शेती काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे शेतीसाठी ट्रॅक्टर आहे. दरम्यान १९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर त्यांनी घरासमोर ट्रक्टर पार्किंग करून…

Read More