मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईमधील ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. इमारतीच्या अठराव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरातील नाना चौकातील गांधी रूग्णालयाच्या समोरील कमला बिल्डिंगला ही आग लागली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार एकूण १५ जण जखमी झाले असून, यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहेत, तर अन्य जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. आगवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून, आग लागलेल्या ठिकाणी आणखी…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । पारोळा ते मुकटी धुळे रस्त्यावर जळगाव आगाराच्या दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली. दुपारी 12:40 च्या दरम्यान बस क्रमांक एम एच 20 BL 4097 ही जळगाव ते धुळे या मार्गावर विच खेडा या गावाजवळ धावत असताना मोटर सायकल क्रमांक 0785 वरील दोन व्यक्तींपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने सदर बसवर दगडफेक फेकून मारला. या दगडफेकीत बसचा समोरील काच फुटून चालक संजय गोविंद रंधे (चालक क्रमांक 2880) यांना दुखापत झालेली आहे. त्याचप्रमाणे काही वेळातच याच ठिकाणी जळगाव आगाराची दुसरी बस क्रमांक एम एच 20 3381 या धुळे येथून जळगाव जाणाऱ्या बसवर दुपारी 12:45 च्या सुमारास याच मोटर सायकल स्वार व्यक्तींनी दगडफेक…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । भारताला इंडोनेशियाकडून सर्वाधिक पाम तेलाचा पुरवठा होतो. मात्र, इंडोनेशियानेच पाम तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाम तेलाची आयात घटल्याने त्याचा थेट परिणाम बाजार आणि ग्राहकांवर होणार आहे. खाद्य तेल उद्योगांशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, इंडोनेशियाने कमी पुरवठा केल्यास मलेशियाकडून हा पुरवठा भरून काढण्यात येईल. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर मलेशियाकडून पाम तेल मिळणे अशक्य आहे. इंडोनेशियाने एका विधेयक आणले आहे, त्याद्वारे त्यांना तेथील किंमती खाली आणायच्या आहेत, यामुळे त्यांनी पाम तेलाची निर्यात घटविण्याचा निर्णय घेतला आहे. भारत इंडोनेशियामधून 60 टक्के पामतेल आयात करतो. त्यामुळेच इंडोनेशियातून कमी तेल आल्याचा थेट परिणाम भारतीय देशांतर्गत बाजार…
जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी 24 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पाच वर्षाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने दिली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्षाची कारावासाची आणि दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे. भडगाव तालुक्यातील एका गावात राहणारी २४ वर्षीय महिलेचा ६ मार्च २०१८ रोजी गावातील आरोपी आबा जगण पाटील याने महिला घरात एकटी असतांना घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात न्यायालयाने चार साक्षीदार तपासले यात पिडीत महिलेची साक्ष महत्वाची ठरली. न्याशधीर डी.एन. खडसे यांनी आरोपीला दोषी ठरवत…
मुंबई : गोव्यात शिवसेनेचा पराभव ठरला आहे. शिवसेनेचं तिथे डिपॉझिट जरी वाचलं तरी संजय राऊत सांगतील त्या ठिकाणी मी चहा आणि जेवण देईल, असे थेट आव्हान भाजप नेते अशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिले होते. त्यावर आज राऊतांनी प्रत्युत्तर दिले. शेलारांना मी नेहमीच चहा पाजत असतो, असं सांगतानाच डिपॉझिट जप्त झाले म्हणजे लढूच नये, असे होत नाही. तसेच मराठा साम्राज्याचा मूलमंत्रही शेलार यांना ऐकवला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पानिपतच्या युद्धात दत्ताजी शिंदे जखमी होऊन पडले. तरीही शेवटपर्यंत म्हणत होते बचेंगे तो और भी लढेंगे. आम्ही लढणारे लोक आहोत. तुमच्या…
नवी दिल्ली – भारतात नुकतीच जर्मन कार कंपनी बीएमडब्ल्यूने लक्झरी कारच्या X3 नवीन व्हर्जनला एका नव्या रूपात लॉन्च केले आहे. तसेच लवकरच ‘X3 चा डिझेल व्हेरिएंट लॉन्च करण्यात येणार असल्याचेही कंपनीने एका शोमध्ये सांगितले आहे. याबाबत माहिती देताना बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावह म्हणाले, की प्रिमियम एसयुव्ही सेगमेंटमधील मॉडेलच्या अद्भूत यशाला कायम ठेवण्यासाठी बीएमडब्ल्यू X3 ची तिसरी जनरेशन आणण्यात आली आहे. 59.90 लाखांपासून X3 xDrive30i SportX Plus या कारच्या ट्रिमची एक्स-शोरूम किंमत सुरू होते. तर, 65.90 लाख रुपये X3 xDrive30i M Sport ची एक्स-शोरूम किंमत आहे. नवीन लूकसोबतच बीएमडब्ल्यू X3 मध्ये अनेक मॉर्डन फीचर्स आणि अपडेटेड इन्फोटेनमेंट सिस्टम देखील…
विजय चौधरी:-सोयगाव प्रतिनिधी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यास उमेदवारच निवडून आलेला नाही त्यामुळे निवडणुकीत तीन वेळा झालेल्या प्रभाग आरक्षण प्रक्रियेत एकमेव अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक प्रभाग राखीव झाला होता त्यानंतर नव्याने झालेल्या आरक्षणात अनुसूचितजाती प्रवर्गासाठी वार्ड न सुटता अनुसूचितजाती सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राखीव वॉर्ड झालेला आहे परंतु नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकडे राखीव झाल्यास उमेदवारा अभावी गोंधळ उडू शकतो त्यामुळे सर्वसाधारण महिला गटाकडे नगराध्यक्ष पद राखीव झाल्यास येथील नगरअध्यक्षपदाचा पेच मिटेल सोयगाव नगरपंचायतीच्या सतरा प्रभागाच्या निवडणुकीनंतर आता नगराध्यक्षपदाच्या आरक्षणा कडे लक्ष लागून आहे सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यास चांगला…
नवी दिल्ली – ट्रेन प्रवास दरम्यान आपले सहप्रवासी अनेकदा जोरजोरात फोनवर बोलत असल्याचा किंवा स्पीकरवर गाणी लावून ऐकत असल्याचा त्रास आपल्यापैकी अनेकांनी अनुभवला असेलच. कर्णकर्कश आवाजातील ती गाणी आणि फोनवरच्या बोलण्यामुळे त्रास होत असतानाही भांडण टाळण्यासाठी आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. पण यापुढे अशा बेशिस्त प्रवाशांवर कारवाई होऊ शकते. कारण प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी या बेशिस्त प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यासंदर्भात नवी नियमावली रेल्वेने नुकतीच प्रसिद्ध केली असून यामध्ये प्रवाशांना होणाऱ्या त्रासासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे. अनेक प्रवासी लोक फोनवर मोठ्याने बोलतात आणि हेडफोनशिवाय गाणी ऐकत असल्याच्या तक्रारी रेल्वे मंत्रालयाकडे प्राप्त होत असताना या नवीन नियमांची अंमलबजावणी…
पुणे : संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री विदुषी कीर्ती शिलेदार यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर सकाळी त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथं उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. मागील ६० वर्षांत आपल्या चतुरस्र अभिनयानाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवला होता. जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिले. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. काही वेळात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.