जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुरुवातीला सकाळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी ध्वजारोहण करीत ध्वजाला सलामी दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ. रामानंद यांनी, उपस्थित वैद्यकीय यंत्रणेशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोरोना काळात डॉक्टर्सपासून सफाई कामगारांपर्यंत सर्वच घटकांनी सर्वोत्तम कामगिरी केली. प्रतिकूल परिस्थितीत देखील खंबीरपणे उभे राहत केलेली रुग्णसेवा हि प्रशंसनीय आहे, असेही डॉ. रामानंद म्हणाले. यावेळी दोन्ही उप…
Author: saimat team
जळगाव : येथील अंजूमन खिदमते खल्क संचलित के.के.उर्दु गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये ७३ वा गण तंत्र दिवसा निमित्त संस्था सदस्य जाहीद भाई शाह यांच्या हस्ते संपन्न झाला.या वेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की भारतीय संविधान ने जनतेला दिलेले अधिकार जागतिक पातळीवर उल्लेखनीय आहे. तर मुख्याध्यापक अकिल खान यांनी या दिनाचा परिचय करून सुभेच्छा व्यक्त केली. सुत्रसंचालन मझहरुदिन शेख व झाकीर शाह यांनी केली. या वेळी गाईड विभागा तर्फे गाईड ध्वजारोहण ही करण्यात आले. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासकीय नियमानुसार सामाजिक आंतर ठेउन कार्यक्रम पार पडले.
जळगाव : येथील ईकरा शिक्षणं संस्था संचलित एच जे थीम कॉलेज कॅम्पसमध्ये 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इकरा शिक्षण संस्थे चे उपाध्यक्ष तसेच एच.जे थीम कॉलेज चे चेअमन डॉ. इकबाल शाह,यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी ईकरा संस्थेचे डायरेक्टर डॉ.जबिअल्ला शाह , कॉलेज चे प्रभारी प्राचार्य, इब्राहिम पिंजारी , उप प्राचार्य , युसुफ पटेल, ईकरा हजी गुलाम नबी आय. टी.आय चे प्राचार्य जुबैर मलिक, प्राध्यापक,बंधू भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. ईकरा शिक्षण संस्थेचे ऊपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह, यांनी ध्वजारोहणानंतर उपास्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्रजासत्ताक दिना चे महत्व …
सोयगाव प्रतिनिधी (विजय चौधरी) तालुक्यातील जरंडी येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जरंडी ग्रामपंचायत सरपंच वंदनाताई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपसरपंच संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील,स्वाती पाटील, नीलिमा पाटील,अमृत राठोड, कल्पना भास्कर, ग्रामसेवक सुनील मंगरुळे, लिपिक संतोष पाटील यांच्या सह इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप पाटील, प्रकाश पवार,यांच्या सह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती
चोपडा – प्रतिनिधी ( संदिप ओली) येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात २५ जानेवारी – राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विविध मतदार जागृतीपर कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी व संविधानाने दिलेल्या हक्काचा जबाबदारीने वापर करण्याची जाणीव निर्माण करण्यासाठी कार्यक्रमातून मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी चहार्डी केंद्राचे केंद्रप्रमुख तथा निवडणूक विषयक कार्यक्रमांचे मार्गदर्शक नरेंद्र सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले, भारत स्वतंत्र झाल्यानंतर २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोग या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून निष्पक्ष वातावरणात निवडणुका घेऊन लोकशाही सुदृढ करण्याचे काम केले जात आहे.…
सोयगाव : प्रतिनिधी (विजय चौधरी ) १२ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तालुका निवडणूक विभागाकडून ६४० नव मतदारांना ओळखपत्राची अनोखी भेट दिली आहे.सोयगाव तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून हि कार्यवाही करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून मंगळवारी सोयगाव तालुक्यात मतदान केंद्रांवर बारावा मतदार दिन साजरा करण्यात आला यामध्ये नव्याने नोंदणी झालेल्या नव मतदारांना ओळखपत्र भेट घरपोच देण्यात आली.यामध्ये सोयगाव तालुक्यात ९६ मतदान केंद्रांवर हा उपक्रम राबविण्यात आला आहे.तहसीलदार रमेश जसवंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार हेमंत तायडे,अव्वल कारकून सुधीर जहागीरदार,सचिन ओहोळ आदींनी हा उपक्रम राबविला.
चाळीसगाव : प्रतिनिधी (मुराद पटेल ): राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त बी. पी. आर्टस् , एस. एम. ए. सायन्स व के.के.सी.कॉमर्स महाविद्यालय, एन.एस.एस.विभाग, मतदार साक्षरता मंडळ आणि राज्यशास्त्र विभाग संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात विविध कार्यक्रम २५ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी ऑनलाइन वेबिणार आयोजित करण्यात आला प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी लोकशाहीच्या सक्षमिकारानाशी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे असून प्रत्येकाणे मतदान जागृती करावी, प्रा. डी. एल. वसईकर यांनी . लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूक राहण्यासाठी सर्वाना मतदार दिनाची शपथ दिली, मा. श्री अमोल मोरे तहसीलदार यांनी सर्व मतदार यांनी सतर्क,सुरक्षित आणि जागरूक राहून सर्वाना मतदार नोदणी करण्याचे आव्हान केले व…
कोळगाव ता-भडगाव(वार्ताहर)- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव, संचलीत, गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात कोरोना नियमांचे पालन करीत मान्यवर व शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमात ध्वजारोहण स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्रीयुत संभाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवराज पाटील,संजय पाटील,प्रवीण पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. आजच्या ह्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.ए.वाघ व आबासाहेब कोळगावकरांनी केले. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू इंग्लिश मेडियम स्कुल,माध्यमिक विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय तसेच कला व विज्ञान महाविद्यालयाच्या शिक्षक-शिक्षिका,प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी…
जळगाव : प्रतिनिधी जी. एच. रायसोनी व्यवस्थापन महाविद्यालय, रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालय, रायसोनी पॉलिटेक्निक महाविध्यालय व रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या भव्य प्रांगणात सोशल डिस्टन्सिंग चे पालन करत ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ललित पाटील या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम क्रमाकांनी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थीच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले की, विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिकांना संविधानाने समान हक्क दिले आहेत. आपल्या लाभलेले हक्क व कर्तव्यांचा वापर देशहितासाठी करून शांतता, समता व बंधुता ही मूल्ये जोपासावी व आपल्या हक्कांचा वापर करत असतांना देशाप्रती असलेल्या आपल्या…
मुंबई : महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, दुर्दैवाने घडल्याच तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा उभी राहावी यासाठी मुंबई पोलीस दलाने आज निर्भया पथक व इतर उपक्रमांच्या माध्यमातून महिला सुरक्षिततेसाठी एक अतिशय महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे व यामुळे महिला सुरक्षेच्या कामाला अधिक बळकटी प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज निर्भया पथकाचे तर मान्यवरांच्या उपस्थितीत इतर विविध निर्भया उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर,…