Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । विचारांच्या गर्तेत अडकलेल्या… सिगारेट पित दूरवर एकटक बघत बसणार्‍या…स्वत:भोवती कपड्यांच्या ढिगारा करुन ठेवणार्‍या… मात्र कुणाला कधीही त्रास न देणार्‍या, कुणाशीही न बोलणार्‍या त्या व्यक्तीचे वाटसरुंना कुतूहुल वाटे… एका उच्च पदावरील व्यक्तीनेही त्याला अनेक दिवस न्याहळले आणि त्याला माणसात आणण्याचे आवाहन स्विकारत, त्याला रुग्णालयात दाखल करुन घेण्याचे आदेश दिले आणि आज त्या घरच्या गर्भश्रीमंत पण आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या मानसोपचार विभागाने उपचार सुरु केले आहे. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मळकट कपडे, डोक्यावर नेहमीच टोपी चढविलेल्या, स्व:मग्नतेत असणारा एक तरूण बर्‍याच महिन्यापासून वावरतांना माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या दृष्टीपथास पडला.…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. अकृषिक स्थावर मालमत्तेच्या व्यवहाराशी संबंधित टीडीएस नियमही अर्थसंकल्पात बदलण्यात आले. नवीन नियमानुसार, आता 50 लाख रुपयांपेक्षा जास्त अकृषिक मालमत्तेच्या व्यवहारावरील विक्री किंमत किंवा मुद्रांक शुल्क मूल्यापेक्षा जे जास्त असेल त्यावर, 1 टक्के टीडीएस भरवा लागणार आहे. म्हणजेच आता घर खरेदी करणाऱ्यांचे खिसे मोकळे होणार आहेत. 1 एप्रिल 2022 पासून लागू आता नव्या नियमानुसार यासाठी प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. हा बदल यावर्षी 1 एप्रिलपासून म्हणजेच नवीन आर्थिक वर्षापासून लागू होईल. कर चोरी थांबेल मालमत्ता व्यवहारातील…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील स्मशानभुमिजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागुन श्रीकृष्ण नगरातील तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक असे की, शहरातील श्रीकृष्ण नगरात सागर अरूण सरोदे वय 30, हा आपल्या आई वडील व मोठ्या भावासह वास्तव्यास आहे. दोन्ही भाऊ शहरातील महात्मा गांधी मार्केट परीसरात भाजीपाला विक्री करून आपल्या कु टुंबाचा उदरनिर्वाह करतात. सागर सरोदे हा आज पहाटेच्या सुमारास घरात काही न सांगता निघुन गेला होता. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शिवाजी नगरातील रेल्वे रूळाजवळ धावत्या रेल्वेचा जवळ धक्का लागुन तो गंभीर जखमी झाल्ाा…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. “या परीक्षांचा फॉरमॅट पाहिला तर संक्षिप्त, सविस्तर आणि दिर्घोत्तर प्रश्न अशी रचना आहे. त्यात दोन्ही परीक्षांचा विचार केला तर 31 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी असताना ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक सुविधा पुरवता येणार नाहीत,” असे गोसावी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. 4 ते 30 मार्च लेखी परीक्षा होणार असून 14 फेबु्रवारी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा विशेष ठसा उमटविणारे अभिनेते रमेश देव यांचे काल ह्दयविकाराने निधन झाल्याचे वृत्त येताच जळगाव शहरातही त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली.रमेश देव व त्यांच्या पत्नी,अभिनेत्री सीमा देव व अभिनेता अजिंक्य देव यांचे जळगावशी प्रेम व जिव्हाळाचं नातं निर्माण झाले होते.रमेश देव व सीमादेव यांनी जळगावला चार- पाच वेळा भेटी दिल्या होत्या.तो काळ 1980 ते 1990 चा होता.त्याच काळात शहरातील ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे यांनी रमेश देव यांची सिने जर्नालिस्ट म्हणून तीन-चार वेळा वृत्तपत्रासाठी विशेष मुलाखती घेतल्या होत्या व त्या जनशक्तीच्या चित्रपटविषयक चित्ररुप पुरवणीत प्रसिध्द झाल्या होत्या.त्या मुलाखतींचे रमेश देव व सीमा देव यांनी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल दिनांक ३ फेब्रुवारी रोजी हुतात्मा दिन साजरा करून स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यात आली. महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाष चंद्र बोस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे प्राचार्य गणेश पाटील, समन्वयिक स्वाती अहिरराव, सांस्कृतिक विभाग प्रमुख भारती अत्तरदे मुलांच्या हस्ते सरस्वती पूजन व क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. इयत्ता पाचवी पाचवी चे विद्यार्थी मोहक जैन, विनायक शिरोळे, रजत शर्मा, आदित्य चौधरी या विद्यार्थ्यांनी सुभाष चंद्र बोस, सुखदेव, राजगुरू व भगतसिंग यांचे पात्र साकारले व त्यांच्या पात्राचे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शाळेचे प्राचार्य गणेश पाटील…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । एका ७२ वर्षीय वृद्धाच्या खिशातून पंधरा हजार रुपये किमतीची मंगलपोत लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील आकाशवाणी चौक ते विद्यूत कॉलनी दरम्यान ७२ वर्षीय वयोवृध्दाच्या खिश्यातून १५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चार जणांनी जबरी हिसकावून लांबविल्याची घटना बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख जलील शेख इब्राहिम (वय ७२, रा. पंचशील नगर, तांबापूर जळगाव) हे कामाच्या निमित्ताने बुधवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात आले होते. त्यांचे काम आटोपून ते…

Read More

मुंबई, प्रतिनिधी । मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अशी माहिती त्यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक असलेल्या रमेश देव यांनी मराठी व हिंदी चित्रपटातील अभिनय करत आपली एक स्वतंत्र छाप सोडली. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे रमेश देव यांना जन्म ३० जानेवारी १९२९ रोजी जन्म झाला. सन १९५६ साली प्रदर्शित झालेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तर बॉलीवूडमधील ‘आरती’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. रमेश देव विशेष ओळख मिळाली ती ‘आनंद’ या चित्रपटातील भूमिकेद्वारे. त्यांनी दिग्दर्शनासह…

Read More

कजगाव ता.भडगाव, प्रतिनिधी । कजगाव विज वितरण च्या दुर्लक्ष मुळे कजगाव येथील शांती नगर या गजबजलेल्या परिसरातील उघड्या ट्रान्सफॉर्मर ला आग लागल्याने परीसरात मोठी घबराट पसरली होती प्रसंगी परीसरातील काहि तरुणांनी पाणी व मातीच्या सहाय्याने आग विझवली या नंतर काहि वेळाने विजवितरण चे कर्मचारी घटनास्थळी पोहचले तरुणांनी समयसूचकता दाखवली नसती तर गजबजलेल्या या भागात मोठा अनर्थ घडला असता. उघड्या ट्रान्सफॉर्मर मुळे  नागरिकां सह लहान बालक यांचे जिव धोक्यात आले असूनही या बाबीकडे लक्ष दिले जात नसल्याने या खात्या विषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे सविस्तर वृत्त साऱ्याच दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर देखील या खात्याने कोणतीहि सुधारणा न केल्याने नागरिका मधुन…

Read More