Author: saimat team
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. दरम्यान यावेळीदेखील अर्थमंत्री पेपरविना अर्थसंकल्प मांडत आहेत. गेल्यावर्षीदेखील निर्मला सीतारामन यांनी टॅबच्या सहाय्याने अर्थसंकल्प मांडला होता. अर्थसंकल्प २०२२ मधील महत्वाचे मुद्दे – करचुकवेगिरी प्रकरणात छापा मारल्यास सर्व सपंत्ती जप्त करचुकवेगिरी प्रकरणात छापा मारल्यास सर्व सपंत्ती जप्त करणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय -आयकरात कोणताही बदल नाही आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याने सर्वसामान्यांची निराशा झाली आहे. सलग सहाव्या वर्षी कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. – जानेवारी २०२२ मध्ये १ लाख ४० हजार ९८६ कोटीचं जीएसटी…
कजगाव, प्रतिनिधी । एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे आणि दुसरीकडे मोठ्या मोठ्या झाडांची खुलेआम तोड चालू आहे या वाढत्या वृक्षतोडीमुळे कसे होणार वृक्ष संवर्धन असा प्रश्न उपस्थित होत कजगाव व कजगाव परिसरातून दररोज दोन ते तीन ट्रॅक्टर ट्रॉली मधून अवैधरित्या लाकडाची तस्करी होताना दिसत आहे याकडे महसूल विभाग तसेच वन विभाग लक्ष देण्याची मागणी होत आहे दरवर्षी हजारो झाडे लावायची व तेवढीच तोडायची त्यामुळे झाडांची संख्या वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहे तरी संबंधित विभागाने त्यावर लक्ष देऊन कारवाई करावी जेणेकरून वृक्षतोड थांबेल अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कजगाव येथे तीन स्वामिल…
जळगाव, प्रतिनिधी । साहित्य, संगीत कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांत विशेष रस असणारे तसेच पाश्चात्त्य आणि भारतीय धर्मांशी जोडले गेलेले व्यक्तिमत्त्व व युवकांचे प्रेरणास्थान म्हणजे स्व.स्वामी विवेकानंद. जळगावातील श्री रामकृष्ण मिशनचे सर्व भक्त व श्री रामकृष्ण मिशन मठ, पुणे यांच्या वतीने तसेच प्रा.डॉ.रमेश झोपे, श्रीकांत देशपांडे, श्रीधर इनामदार, प्रकाश गलवडे यांच्या अनमोल सहकार्यातून स्व.स्वामी विवेकानंदांवरील साहित्य विक्री रथ उद्या बुधवार,दि. २ फेब्रुवारी २०२२ रोजी जळगावात दाखल होत आहे. जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन या रथाचे शहरातील काव्यरत्नावली चौकात सकाळी साडेदहाच्या सुमारास यथोचितपणे स्वागत करून हा सोहळा साजरा करणार आहेत.…
यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायती अंतर्गत गावासाठी मंजुर करण्यात आलेली पंतप्रधान आवास योजना ( ड यादी ) ही चुकीच्या निकषावर करण्यात आलेली असुन , खरे लाभार्थ्यांना या यादीतुन वगळण्यात आले असुन त्यांचा तात्काळ पंतप्रधान आवास योजनेच्या यादी समावेश करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन असंख्य ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना देण्यात आले आहे. या संदर्भात यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना देण्यात आलेल्या लिखित तक्रार निवेदनात नायगाव ग्रामस्थांनी म्हटले आहे की , नायगाव ग्राम पंचामतच्या वतीने दिनांक १ मे२०१६ रोजी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा या साठी गावातील लाभार्थ्यांचा सर्वे करून एकुण ४३६घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांची यादी…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आजच्या अर्थसंकल्पापूर्वीच सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. व्यावसायिक LPG सिलिंडरची किंमत ९१.५० रुपयांनी कमी झाली आहे. आज(मंगळवार) तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ९१.५० रुपयांची कपात केली आहे. या कपातीमुळे आता दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलिंडर १९०७ रुपयांचा झाला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत १०२.५० रुपयांनी कपात केली होती, मात्र सिलिंडरची किंमत २००० रुपयांपेक्षा जास्त होती. आज (१ फेब्रुवारी) सकाळी दिल्लीत विना सबसिडीवाल्या १४.२ किलोच्या इंडेन गॅस सिलिंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे. कोलकातामध्ये गॅस…
मुंबई, वृत्तसंस्था । हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक यांनी विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे रस्त्यावर उतरले होते. मुंबईतील धारावी भागात हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले आणि पाहतापाहता हिंसक झाले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जदेखील केला. दरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांची माथी भडकावणाऱ्या या हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हिंदुस्थानी भाऊने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही व्हिडीओ अपलोड केले होते. यामध्ये त्याने विद्यार्थ्यांना आंदोलनास प्रवृत्त केलं. दहावीची परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांना करण्यासाठी…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर वेश्या व्यवसायावर धाड टाकण्यात आली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव – औरंगाबाद महामार्गावर एमआयडीसी हद्दीतील हॉटेल वजा लॉजवर टाकण्यात आलेल्या छाप्यात वेश्या व्यवसाय उघडकीस आला आहे. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी एमआयडीसी पोलिस पथकाच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात दोन महिला व दोन पुरुष नको त्या अवस्थेत आढळून आले. काशिनाथ चौकानजीक असलेल्या हॉटेल अमरनाथ येथे सदर छापा टाकण्यात आला. जळगाव शहरातील जळगाव – औरंगाबाद रोडवरील अमरनाथ लॉजीगचे मालक लॉजमध्ये पुरुषांना काही महिला उपलब्ध करुन वेशा व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर…
भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील औद्योगिक वसाहत शेड क्रमांक २० मधील जय केबल इंडस्ट्रीमध्ये धाडसी चोरी करून अज्ञात चोरट्यांनी तांब्याच्या तारांचे बंडल आणि २५ हजार रोख असा ऐकून २ लाख ९२ हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. औद्योगिक वसाहत शेड क्रमांक २० मधील जय केबल इंडस्ट्री आहे. अज्ञात चोरट्यांनी २८ जानेवारीच्या रात्री ८ ते ३० जानेवारीच्या सकाळी ९ वाजेच्या दरम्यान, २ लाख १२ हजार ५०० रुपये किंमतीचे २० तांब्याच्या तारांचे बंडल याच बरोबर ५५ तांब्याच्या तारांचे बंडल आणि २५ हजार रोख असा ऐकून २ लाख ९२ हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी नरेश काकुमल अठवाणी यांच्या फिर्यादीवरून…
जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा रोहित पवार मित्र मंडळाचे कार्यकर्ते रवींद्र गुजर यांच्यासह अनेकांनी जिल्हा सदस्य प्रताप पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे शिवसेना उपजिल्हा डॉक्टर मनोहर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अजिंठा हुन नाशिक कडे शेंदुर्णी मार्गाने युवा सेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ही जात असताना शेंदुर्णी शहर तालुका शिवसेना शाखेतर्फे आदित्य साहेब ठाकरे यांचा स्वागताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात शेंदुर्णी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रवींद्र गुजर कैलास काबरा अशोक गुजर कुणाल गुजर सय्यद भाई अल्लारखा भाई ज्ञानेश्वर पवार यांच्यासह अनेक तरुणांनी जिल्हा परिषद…