Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । विचारांच्या गर्तेत अडकलेल्या… सिगारेट पित दूरवर एकटक बघत बसणार्‍या…स्वत:भोवती कपड्यांच्या ढिगारा करुन ठेवणार्‍या… मात्र कुणाला कधीही त्रास न देणार्‍या, कुणाशीही न बोलणार्‍या त्या व्यक्तीचे वाटसरुंना कुतूहुल वाटे… एका उच्च पदावरील व्यक्तीनेही त्याला अनेक दिवस न्याहळले आणि त्याला माणसात आणण्याचे आवाहन स्विकारत, त्याला रुग्णालयात दाखल करुन घेण्याचे आदेश दिले आणि आज त्या घरच्या गर्भश्रीमंत पण आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या मानसोपचार विभागाने उपचार सुरु केले आहे. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मळकट कपडे, डोक्यावर नेहमीच टोपी चढविलेल्या, स्व:मग्नतेत असणारा एक तरूण बर्‍याच महिन्यापासून वावरतांना माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या दृष्टीपथास पडला.…

Read More

सातपूर, वृत्तसंस्था । येथील औद्योगिक वसाहतीतल्या निलराज कारखान्यात (Nilraj factory) आज (दि. ०२) बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत पहिला मजला जळून खाक झाला आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, कुठलीही जीवित हानी झाली नाही. आज पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्याचे समजताच महापालिकेच्या अग्निशमन दलास (Municipal fire brigade) संपर्क साधण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाचे ०३ बंब, एमआयडीसीचा (MIDC) ०१ बंब, महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचा (Mahindra and Mahindra Company) ०१ बंबासह इतरही बंब घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेच्या कर्मचार्‍यांसह एकूण २५ जणांनी मिळून ही आग विझवली. या घटनेत कंपनीचा पहिला मजला जळून खाक झाला आहे. आगीत कॅपॅसिटर (capacitor) बसवण्यासाठी…

Read More

भुसावळ, प्रतिनिधी । गुन्हेगारी करण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन जणांकडून बाजारपेठ पोलिसांनी गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळातील वांजोळा रोड भागात बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने कारवाई करून तिघांना अटक केली. काही संशयित पिस्तूल बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने सापळा रचून केलेल्या कारवाईत तुषार किशोर खरारे व कमलेश किशोर खरारे (दोन्ही रा.विघ्नहर्ता नगर, जामनेर रोड, भुसावळ) हे दोन्ही भाऊ व विजय संजय निकम (रा.चोरवड, ता.भुसावळ) यांना अटक करण्यात आली. या तिघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून १५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल, ३० हजारांची दुचाकी…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेची कार्यकारी मंडळाची सभा संघटनेच्या कार्याध्यक्ष अँड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार रोजी भगीरथ के सोमानी माध्यमिक विद्यालय पिंप्राळा येथे संपन्न झाली. या सभेत शैक्षणिक संस्थांमधील नोकरभरतीचा अधिकार हा खासगी शिक्षण संस्थांचा घटनात्मक अधिकार आहे यावर अतिक्रमण करून शासनाने सुरु केलेले पवित्र पोर्टल प्रणाली ही तातडीने रद्द करण्याचा निर्णय पारित करावा अशी जोरदार मागणी बैठकीत संस्थाचालकांनी केली यासोबतच वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार तातडीने द्यावे covid-19 मुळे शाळा बंद असल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत व म्हणून शैक्षणिक वर्ष 2020 21 नुसार संच मान्यता देत ज्याप्रमाणे सवलत देण्यात आली होती…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राज्य शासनाने १ फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाट्यगृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सशर्त परवानगी दिली आहे. यात लग्नसमारंभासाठी दोनशे व्यक्तीपर्यंत मुभा असेल तर अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणार्‍यांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत याबाबत शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुधारीत नवीन नियमावली जाहीर केली आहे. 1) परिशिष्ट अ मध्ये ज्या जिल्ह्यात 18 वर्ष वयापेक्षा मोठ्या असलेल्या 90 टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस, त्याचप्रमाणे 70 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले असतील अशा जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. ही यादी सार्वजनिक आरोग्य विभागास मिळालेल्या अधिकृत माहितीच्या आधारे प्रत्येक आठवड्यात अद्ययावत…

Read More

यावल, प्रतिनिधी । दि. ३१ रोजी डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण क्षेत्रातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा,याकरीता अत्य आवश्यक असलेले ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियान चौथ्या सत्रात पोचले असता, हे अभियान दिनांक ३०व ३१ ०१-२०२२ असे दोन दिवस पंचवटी मंदिरा जवळ डोंगर कठोरा तालुका यावल येथे निशुल्क ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास चौथ्या टप्यात पोचले . सदर अभियानास डोंगर कठोरा गावातील एकूण ९५६ लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला. या प्रसंगी लुकमान तडवी, विलास चौधरी, डॉ.कुंदन फेगडे, हर्षल पाटील प्रकाश झोपे, नवाज तडवी सरपंच, धनराज पाटील उपसरपंच, कमलाकर राणे माजी सरपंच मनोहर महाजन माजी सरपंच, दिलीप तायडे उदय…

Read More

मुंबई, प्रतिनिधी ।   वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, लोकांची क्रय शक्ती कमी होत असतांना खासगी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होत आहे  अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून काही ठोस उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती परंतू लोकमनातील ही अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेलीच दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. या व याआधीच्या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने सर्वसामान्‍य जनतेपुढे अनेक स्वप्नं उभी करून त्यांच्यात आशावाद निर्माण केला, प्रत्यक्षात यातील किती स्वप्नं पूर्ण झाली याची स्पष्टता न करता आणखी नवीन स्वप्ने…

Read More

भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ येथील कला ,विज्ञान आणि पु .ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आणि नियोजन अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२०२३ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . मीनाक्षी वायकोळे उपस्थित होते. उद्घाटक म्हणून भुसावळ शहरातील नामांकित चार्टर्ड अकाउंटंट मुकेश अग्रवाल त्यांच्या समवेत प्रसिद्ध उद्योजक राजीव शर्मा तसेच अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक माजी विभाग प्रमुख प्रा. व्ही. डी. पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. निलकंठ भंगाळे, डॉ. ए. डी. गोस्वामी नियोजन अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. संदेश धूम व्यासपीठावर उपस्थित होते. उद्घाटन समारंभ संपन्न झाल्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे यांनी आपल्या अध्यक्षीय…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था काही प्रमाणात ढासाळलेली दिसून आली. या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजच्या अर्थसंकल्पात केल्याचे दिसत आहे.कोरोना काळात अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून आला आहे. यामुळे आगामी आर्थिक वर्षांतील (2022-2023) संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्याचे नियोजन या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे तसेच अर्थव्यवस्था मजबूत कशी होईल यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षांत राष्ट्रीय सकल उत्पादनाचा वेग म्हणजे विकासदर 8 ते 8.5 टक्के राहू शकेल, असा आशावादी सूर यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालामध्येही उमटला आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी याचवर्षी डिजीटल करन्सी लॉन्च करण्याची घोषणा केली आहे तसेच 60 हजार नवीन…

Read More