रावेर प्रतिनिधी सध्या सर्वत्र कोरोनामुळे लाकडाऊन आहे सोशल डिस्टनसिंगचा पालन करून लग्नाची धामधूम सुरू आहे. आजच्या काळात लग्नसमारंभ मोठ्या थाटात करण्याची पद्धत रूढ झाली आहे. समाजात तर लग्नसमारंभावर लाखो रुपये खर्च केले जातात. पण रावेर शहरातील सरफराज खान रफीक खान आणि जळगाव येथील अतिक शेख परिवारातील सदस्य तथा शिक्षित दाम्पत्याने बडेजावपणा व अनावश्यक खर्चाला फाटा देत चट मंगनी पट ब्याह’ करून मुस्लिम समाजासमोर एक आदर्श निर्माण केले आहे. रावेर शहरातील मदिना कॉलनी येथील रहिवासी अँग्लो उर्दू शाळेचे शिक्षक व जमाआत ए इस्लामी हिंदचे सदस्य सरफराज खान रफीक खान यांचे सुपुत्र मुजम्मील खान हे बीएस्सी बीएड शिक्षित आहे. त्यांच्यासाठी मुलगी पाहायला…
Author: saimat team
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील लोंढेगाव येथे लग्नासाठी आलेल्या नातेवाईकाची ७१ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबविल्याची घटना घडली. मेहुणबारे पोलीस स्टेशनात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोंढेगाव येथे गयाबाई डिगंबर पगारे यांच्या घरी लग्न असल्यामुळे त्यांचे नातेवाईक अनिता बाविस्कर (वय ४५, रा. मळाने पोस्ट वणी बु॥, ता.जि.धुळे) हे लग्नासाठी आले आहे. सकाळी गयाबाई पगारे यांच्या घरातून अनिता बाविस्कर यांच्या बॅगमधून ७१ हजार रुपये किंमतीची सोन्याची २१ ग्रॅम वजनाची पोत अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. मेहुणबारे पोलीस स्टेशनला अनिता बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. अनवर तडवी करीत आहेत.
चाळीसगाव : प्रतिनिधी खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील शिरसगाव येथे काल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली असून नराधमास गजाआड करण्यात आले आहे.मेहुणबारे पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील शिरसगाव येथील आरोपी संदीप सुदाम तिरामली (वय ३७) याने दि. ३ रोजी गावातीलच ५ वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून रात्री ८ वाजच्या सुमारास बलात्कार केला. सदर माहिती मुलीने घरात सांगितल्यावर त्यांनी लागलीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नराधमावर गुन्हा दाखल केला तोवर आरोपी पळून गेला होता. सपोनि पवन देसले, उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोपाळ पाटील, हवालदार…
जळगाव ः प्रतिनिधी स्वर्गीय वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानच्या १९व्या बालगंधर्व संगीत मंहोत्सवाच्या तिसर्या दिवशी काल सायंकाळी ५ वाजता तीन सत्रात कार्यक्रम घेण्यात आले.पहिल्या सत्राला भुवनेश्वर येथील सुश्री मोहंती यांच्या ओडिसी नृत्याने सुरुवात करण्यात आली. त्यांनी ब्रह्मा, विष्णू व महेश, सूर्यास्टकम व मुद्राभिनयातून कृष्णलीला दाखवत रसिकांची वाहवा मिळवली. त्यानंतर गोटीपुवा नृत्यातून स्त्री वेषातील कलाकारांनी रसिकांना खिळवून ठेवण्यात यश मिळवले. तर तिसर्या सत्रात ‘आम्ही दुनियेचे राजे’ या सांगीतिक कार्यक्रमात १९१० ते १९६० दरम्यानचा काळ जागवण्यात कलाकारांना यश आले. या महोत्सवात काल छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता तिसर्या दिवसाच्या प्रथम सत्राला सुश्री मोहंती यांच्या ओडिसी नृत्याने सुरुवात करण्यात आली. तर द्वितीय सत्रात गोटीपुवा…
निंभोरा ता.रावेर ः प्रतिनिधी येथील तरुणांनी नववर्षाच्या स्वागताचे पारंपारिक किंवा जल्लोष करून साजरा न करता युवाशक्ती मित्र परिवारातर्फे दि.१ जानेवारी रोजी स्मशान भूमीतील साफ सफाई करून स्वच्छतेचा संदेश देण्याचे अनोखे काम करण्यात आले. या वेळी स्मशान भूमीतील अस्ताव्यस्त पडलेले प्रेतांचे पुष्पहार, शाली, कापड आदी वस्तूंची सफाई करण्यात आली तसेच स्मशान भूमी झाडून कचरा पेटवित सर्व स्मशान भूमी स्वच्छ करण्यात आली.यावेळी सदर सफाई अभियानास युवाशक्ती मित्र परिवाराचे हर्षल ठाकरे, सुनील कोंडे, दिलशाद शेख, रवींद्र बारी, युगल राणे, राज खाटीक,गौरव काटोले, किरण कोंडे, उज्वल भोगे, मुकेश सावकारे, शेख नदीम यांसह आदी तरुणांनी सहभाग घेतला. या आधी ही संत गाडगे महाराज जयंती, शिवजयंती…
जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य वनपाल वनरक्षक संघटनेची बैठक शनिवारी लांडोरखोरी येथे आयोजित करण्यात आली होती. यात नागपूर विभागांतर्गत जळगाव शाखेच्या अध्यक्षपदी देविदास जाधव यांची निवड करण्यात आली. वनपाल वनरक्षक संघटनेच्या जळगाव शाखेच्या उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष अनिल साळुंखे तर सचिव संदीप पाटील यांची वर्णी लागली. माजी अध्यक्ष डी. एम. कोळी, जळगावचे वनपाल पी. जे. सोनवणे, जामनेरचे वनपाल सुनील पवार, पी. पी. शेजुळे, प्रेमराज सोनवणे, भारत पवार यांच्यासह जामनेर, पारोळा, एरंडोल, पाचोरा, मुक्ताईनगर, वडोदा,जळगाव येथील वनरक्षक व वनपाल उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य वनपाल वनरक्षक संघटनेची बैठक लांडोरखोरी येथे शनिवारी झाली.
अमळनेर ः प्रतिनिधी परिट समाजाच्या ‘लढाऊ लेखणी २०२१’ दिनदर्शिकेचे प्रकाशन अमळनेरातील संत गाडगे बाबा चौकात समाजातील प्रमुख पदाधिकार्यांनी हस्ते दि.४ रोजी मोठ्या थाटात प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजाचे सामाजिक कार्यकर्ते किशोर महाले, भरत जावदेकर, विजय वाघ, उमेश वाल्हे, गोरख चित्ते, रवींद्र जाधव, गंगाराम वाल्हे, विनोद जाधव, जगतराव निकुंभ, परशुराम महाले, अनिल वाघ, गणेश नेरकर, अनिल मांडोळे, आबासाहेब भामरे, अमळनेर शहर प्रतिनिधी दिपक वाल्हे यांच्या प्रमुख उपस्थिती होते.
जळगाव ः प्रतिनिधी सत्यशोधक साहित्य परिषदेतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात महिला शिक्षण दिनानिमित्त अथर्व पब्लिकेशनच्या कार्यालयात आज सकाळी प्रतिमापूजन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.प्राचार्य डॉ. किसन पाटील अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी डॉ. पाटील यांनी, महिला सबलीकरण हेच राष्ट्राच्या विकासापुढील ध्येय असले पाहिजे असा निर्धार आपण सर्वांनी केला पाहिजे, असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे महापालिका शिक्षण समितीचे सभापती सचिन पाटील यांनी सावित्रीबाईंचे कार्य हे महिलांना प्रेरणा देणारे असून, त्यांच्या कणखर वृत्तीचे आचरण प्रत्येक महिलेने केले पाहिजे, असे आवाहन केले.विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश मोरे यांनी सावित्रीबाईंच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. सत्यशोधक साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. मिलींद बागुल यांनी सावित्रीबाई…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे ज्येष्ठ खेळाडूंच्या आठव्या मास्टर्स चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद अमळनेर संघाने मिळविले. तर जळगावचा वायसीसी संघ उपविजेता राहिला. जिल्ह्यातील दिवंगत क्रिकेटपटूंच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यंदा सन १९८०-९० च्या दशकात एकमेकांसोबत तसेच विरुद्ध खेळलेले माजी खेळाडू पुन्हा एकदा मैदानात खेळले. सहा संघांनी यात सहभाग घेतला. पहिल्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या जळगाव शहर व तालुका संघाला अमळनेरने तर वायसीसीने आरसीसीचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. अंतिम सामन्यात अमळनेर संघाने वायसीसी संघाने २३ धावांनी पराभव करून प्रथमच मास्टर्स चषक स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. कैलास पांडे, शक्ती महाजन, तेजस दोडे, प्रवीण पटेल, चेतन पाटील, नीलेश…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील नागरिकांना घरपट्टीत ५० टक्के सूटसह गाळेधारकांना बंद काळातील करात माफीचा ठराव पालिका प्रशासनाने विखंडनासाठी पाठवला आहे. शहरात कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती नसल्याने तसेच गाळे रिकामे नसल्याने ठरावाची अंमलबजावणी करता येणार नाही.त्यामुळे प्रशासनाने सत्ताधारी भाजपने केलेला ठराव रद्दसाठी पत्रव्यवहार केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल ते जून महिन्यापर्यंत व्यापार व्यवसाय बंद होता. त्यामुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला. अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे महापालिकेने मालमत्ता करात करदात्यांना ५० टक्के माफी द्यावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली होती. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने थेट प्रशासनाकडे निवेदन देऊन मागणी केल्यामुळे सत्ताधार्यांची गोची झाली होती. अखेर महासभेत या विषयावर चर्चा करून राज्य शासनाकडे…