Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात आज शुक्रवारी चार ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ घेण्यात आली. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), महापालिकेचे शिवाजीनगरातील डी.बी. जैन हॉस्पिटल, तालुक्यातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व जामनेर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सकाळी ८ वाजता या लसीकरणाच्या रंगीत तालमीला सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर २५ जणांना डमी लसीकरण करण्यात आल्याचे वृत्त आहे. आज सकाळी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना डमी लसीकरणाची सुरूवात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण आदींची उपस्थिती होती. ‘ड्राय रन’मध्ये नोंदणी ते दुसरी लस देण्यापर्यंत आठ टप्पे आहेत.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी अनेक दशकांपासून स्व. नारायण अप्पा सोनावणे यांच्या प्रेरणेने सुरू असलेली ग्राम पंचायत बिनविरोधची परंपरा याही वर्षी जि.प.चे गटनेते व यावल तालुका काँंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर सोनावणे यांंच्या प्रयत्नातून व ग्रामस्थांच्या सहयोगाने अबाधित राखली आहे. जिल्ह्यातील पहिली ग्रामपंंचायत काँग्रेसच्या खात्यात बिनविरोध करुन इतिहास रचला आहे. राज्यात काँग्रेसच्या सहभागाने आघाडी सरकार अस्तित्वात असले तरी जिल्ह्यात पक्षाची परिस्थीती अतिशय हलाखीची आहे. अशाही परिस्थितीत एक आमदार, चार जिल्हा परिषद सदस्य , मोजक्या सहकारी संस्था या माध्यमातून निष्ठावंत कार्यकर्ते, नेते मंडळींनी पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. त्यात यावल तालुक्यातील वढोदे गाव हे पारंपरिक काँगेस विचारांनी प्रेरित असलेलं जी प गटनेते व काँग्रस…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहयोगी अश्विन झाला व त्यांच्या पत्नी निर्मला झाला या दांपत्याने गुजरात विद्यापीठातून गुजराथी व हिंदी भाषेत गांधीजींच्या जीवनावर पीएच.डी केली आहे. त्यांचे दोन्ही संशोधन प्रबंध गुजराथी, हिंदी, इंग्रजी भाषेत मुद्रित (पुस्तक प्रकाशन) करण्याचे निश्चित असून मराठीतही भाषांतरीत केले जाणार आहे. या दोघं अभ्यासकांनी आपले संशोधनपर प्रबंध भवरलाल जैन यांना अर्पण केले आहेत. झाला दांपत्याचे संशोधन गुजरात विद्यापीठात ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. भंवरलाल जैन यांची प्रेरणा फंड रेझिंग विषयासंदर्भातील प्रथम संशोधन गांधीजींच्या फंड रेझिंग या विषयासंदर्भातील हे प्रथम संशोधन आहे. भवरलाल जैन यांनी झाला दांपत्याला गांधी रिसर्च फाऊंडेशन रेसिंडेट…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी विवेकानंद निवासी विभागात मुलांच्या निरामय आरोग्यासाठी दररोज सूर्यनमस्कार, योगासन व खेळावर मार्गदर्शन करण्यात येते. विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागातील नववी-दहावीची मुले पुन्हा व्यायाम, खेळासाठी मैदानावर आली आहेत. ऑनलाइन शिक्षणाच्या वापराने विद्यार्थी कंटाळल्याने तसेच विद्यार्थ्यांमधील प्रतिकार क्षमता वाढावी म्हणून त्यांना व्यायाम, मैदानी खेळाची गोडी लागावी यासाठी विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागातर्फे त्यांना मैदानी खेळांचे मार्गदर्शन विदर्भातील क्रीडा प्रशिक्षक संतोषकुमार वाळसे व संजय अंबोदकर सकाळी व सायंकाळी करीत आहेत. या उपक्रमासाठी संजय कानडे, संजय आंबोदकर, सुनील वाघ, मधुसूदन जोशी, कृष्णा सत्रे, दुलारी प्रजापती यांचे सहकार्य लाभत आहे.विवेकानंद प्रतिष्ठानच्या निवासी विभागातील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा श्रीराम मंदीर निधी समर्पण समितीतर्फे श्रीराम मंदिर अर्थात राष्ट्र मंदिर या संकल्पनावर प्रकाश टाकणार्‍या ‘राष्ट्र मंदिर टॉक शो’चे आयोजन १२ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी नाट्यगृहात केले आहे. अभियानानिमित्त होणार्‍या विविध कार्यक्रमांची माहिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्यवाह किशोर चौधरी यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. ‘राष्ट्र मंदिर टॉक शो’मध्ये श्री महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज (फैजपूर), भाजप नेते माधव भंडारी (मुंबई), डॉ. यशस्विनी तुपकरी (संभाजीनगर), जळगाव पीपल्स को-ऑप. सहकारी बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, तसेच डॉ. प्रसन्न पाटील (संभाजीनगर) हे प्रमुख वक्ते सहभागी होतील. अयोध्येत साकारणारे निधी अभियान जिल्ह्यातील वस्ती, गाव, शहर पातळीवर राबवले जाईल. अभियानाच्या प्रचार-प्रसारसाठी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी ऑनलाइन राज्यस्तरीय युवा महोत्सव २०२० नुकताच उत्साहात झाला.त्यात भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे लोकनृत्य सादर करण्यात आले. महाराष्ट्रातून मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, पुणे, लातुर, कोल्हापुर या ८ विभागांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला,त्यात जैन फाउंडेशनला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला. संघाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. युवा महोत्सव २०२० महोत्सवात एकपात्री, शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन, कथ्थक, बासरी वादन आणि वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. लोकनृत्य प्रकारात जैन फाउंडेशनने प्रतिनिधीत्व केले. सहभागी कलावंत अजय गोसावी, रितीक पाटील, निर्मल राजपुत, हेमंत माळी, योगेंद्र बीसेन, सुमीत भोये, रोहन चव्हाण, मंगेश चौधरी, मोईन शेख आदी कलावंत स्पर्धकांचे फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी कौतुक…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी सध्याच्या जगात आपण सोशल मीडिया वापरला नाही तर आपल्याला कुठलेही अद्ययावत माहिती मिळणार नाही व आपण जगाच्या मागे पडू,अशी भीती वाटू लागते. अर्थात, त्यातून नकळत आपले सोशल मीडियावरील अवलंबत्व वाढते आहे, असे प्रतिपादन मुक्ता चैतन्य यांनी केले. दीपस्तंभ व्याख्यानमालेच्या “माझा स्क्रीन माझी जबाबदारी’ या शेवटच्या सत्रात त्यांनी मार्गदर्शन केले. वाढत्या स्क्रीनच्या वापरामुळे आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. वेळ, ऊर्जा आणि बुध्दी यांचा योग्य वापर न करता तासनतास आपण स्क्रीन चाचपडत राहतो. भावनिक दृष्टीकोनात तुम्ही सोशल मिडीयाचा वापर करीत असाल तर तुम्हाला त्यातून नैराश्य येऊ शकते. याचाच परिणाम कुटुंबातील संवाद अगदी कमी होऊन तो फक्त सोशल…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहूर येथील २४ वर्षीय महिलेच्या पोटात अनेक दिवसांपासून दुखत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या गर्भाशयाच्या नलिकेत गर्भ राहून तो फुटल्याने तिची प्रकृती गंभीर झाली होती. तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तत्काळ उपचार झाल्याने तिचे प्राण वाचले. बर्‍याच दिवसांपासून पोटदुखी जामनेर तालुक्यातील पहूर परिसरात जांभूळगाव येथील २४ वर्षीय विवाहितेला २ मुले आहेत. कुटुंब मजुरी करते. त्यावरच उदरनिर्वाह करतात. पहूर व जामनेर येथे उपचार न झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बर्‍याच दिवसांपासून महिलेच्या पोटात दुखत होते. सोनोग्राफीतदेखील काही निदान होत नव्हते. डॉ.बनसोडेंकडून तपासणी अखेर ३० डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाल्यावर…

Read More

फैजपूर ः प्रतिनिधी मराठी पत्रकार दिनानिमित्त महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून फैजपूर येथील खान्देश नारीशक्ती गु्रप, दिपाली गु्रप, अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांच्या वतीने शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा एक वर्षाचा अपघात विमा काढण्यात आला. सायंकाळी सहा वाजता दिपाली गृप्स कार्यालयात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण होले यांच्याहस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पत्रकार संजय सराफ यांनी मनोगत व्यक्त केले. दिपाली गु्रपतर्फे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी प्रा.राजेंद्र तायडे, समीर तडवी, ‘साईमत’चे प्रा.उमाकांत पाटील, सलीम पिंजारी, पत्रकार संस्था अध्यक्ष फारुक शेख, संजय सराफ, इदु पिंजारी, राजू…

Read More

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी कोरोना जागतिक महामारी दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उद्या दि.९ शनिवार रोजी सफला एकादशीस मुक्ताबाई मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. दि.९ जानेवारी २०२१ रोजी मार्गशिर्ष सफला एकादशी आहे. बारा महिन्यात महाशिवरात्री यात्रेनंतर सर्वात गर्दीची महावारी असल्याने राज्यातील विविध भागातून भाविक दर्शनासाठी हजेरी देतात. नुकताच राज्यात कोरोना महामारीचा धोकादायक नविन विषाणू आढळून आल्याने खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार विश्वस्त मंडळाने संत मुक्ताबाई मंदिर कोथळी-मुक्ताईनगर शनिवारी दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सफला एकादशीला कुणीही वारीवर येऊ नये. घरूनच मानसिक पुजन चिंतन करावे. तसेच दुकानदांनी वारी बंद असल्याने प्रसाद, फराळ, ईतर दुकाने लावू…

Read More