जळगाव ः प्रतिनिधी येथील इंद्रप्रस्थनगर, जनाई नगर, शिवशंकर कॉलनी, राधाकृष्ण नगर, दत्तात्रय नगर, त्रिभुवन कॉलनी या भागातील रहिवासी महिलांनी एकत्रित येत आज आपल्या परिसरातील परमीट रुमच्या विरोधात जिल्हधिकार्यांना निवेदन देत त्यांना या परमिट रुमचा परवाना रद्द करण्याबाबत साकडे घातले. निवेदनात म्हटले आहे की,हा परिसर अतिशय शांतताप्रिय व उच्चभ्रु वस्ती असलेला आहे.आमच्या भागात वसंतराव शामराव चौधरी यांनी नुकतेच दोन वर्षांपूर्वी राजाराम हॉल लग्न कार्यालयासाठी मंगल कार्यालयाची मागणी केलेली आहे व त्यांनी वर नमूद जागेत नुकतेच हॉटेल व्यवसाय व त्यासोबत दारु विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार असून तसे प्रयत्न व हालचाली सुरु केलेल्या आहेत. या भागातील रहिवाशांना सदर बांधकामाच्या अनुषंगाने सदरचा भाग…
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. व्यावसायिकांनी पोल्ट्री फार्मचे सॅनिटायझेशन करून काळजी घ्यावी. मृत पक्ष्यांबाबत पशुसंवर्धन विभागाला कळवावे. त्याचप्रमाणे नगरपालिका क्षेत्रातील मोठ्या मार्केटमध्ये विक्री होणारे मांस तपासण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. देशातील काही राज्यांबरोबरच महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे पक्षी दगावले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील यंत्रणांचा आढावा घेतला. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार…
मुक्ताईनगर ः प्रतिनिधी तालुक्यातील मुक्ताईनगर – खामखेडा रस्त्यावर एका डाव्या हातालगत असलेल्या डेकडीच्या मागील शेतात मोठ्या पत्री शेडमध्ये अवैधरित्या चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर जळगाव येथील गुन्हा अन्वेषण विभागाने छापा टाकला. या कारवाईत ५ लाख ६१ हजार रुपयांच्या रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईत आठ जणांना पोलिसांनी अटक केली. एलसीबी पथकाद्वारे तीन महिन्यांपूर्वी सतत तीन ते चार दिवस अवैध धंद्यांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर पुन्हा एका जुगार अड्ड्यावर एलसीबीद्वारे छापा टाकण्यात आला. यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध व्यावसायिकांची पाचावर धारण बसली आहे. मुक्ताईनगर तालुक्यात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. तालुक्यातील शेती शिवार तसेच…
मलकापूर ः प्रतिनिधी येथील अहेमद शहापुरा भागात पोलिसांनी अचानक टाकलेल्या छाप्यात दोन तलवारींसह एका संशयित तरुणास अटक केल्याचे वृत्त आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना गोपनिय माहिती मिळाली की, पारपेठ भागातील अहेमदशहापुरा येथे एक इसम नामे सैय्यद अन्सार सैय्यद रुस्तम याने आपल्या राहत्या घरात दोन तलवारी लपवून ठेवल्या आहेत. त्यानुसार त्यांचे मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाचे सपोनि श्रीधर गुट्टे, स.फौ.रतनसिंह बोराडे, पो.कॉ.समाधान ठाकुर, पो.कॉ.आसिफ शेख, पो.कॉ संजय पढार, पो.कॉ. ईश्वर वाघ, पो.कॉ संतोष कुमावत, पो.कॉ अनिल डागोर, पो.कॉ.प्रकाश(गोटु)जाधव, पो.कॉ सलिम बरडे यांनी सदर व्यक्तीस ताब्यात घेतले व त्यास त्याचे नांव गांव विचारले असता, त्याने त्याचे नांव सैय्यद…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बेळी गावात एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफोडी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक वृत्त असे की, तालुक्यातील नशिराबाद येथून जवळ असलेल्या बेळी येथील विद्या निवृत्ती नारखेडे (वय ३६) आणि गावातीलच रविंद्र चुडामण खाचणे (वय ४७) यांच्या घरात अज्ञात चोरट्याने ९ जानेवारी रोजीच्या मध्यरात्री घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागीने आणि रोकडलांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. त्यात विद्या नारखेडे यांचा २५ हजार ५०० रुपयांचा तर रविंद्र खाचणे यांचा २ लाख २२ हजार रूपयांची रोकड असा एकूण २ लाख ४६ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे रविवारी सकाळी उघडकीला आली…
जळगाव : प्रतिनिधी येथील शिवाजीनगर उस्मानिया पार्क मधीसल एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना काल रात्री घडली. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली असून अनेक तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहे. अनेक दिवसांपासून हाताला काम नसल्याने आरीफ खान रशीद खान (३३) हा तरुण तणावात होता, असे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, काल दुपारी पती-पत्नींमध्ये वाद झाला होता.हे प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत गेले होते.यानंतर त्याने रात्री गळफास घेतला. आरोपी आरीफ खान यास रात्री दहा वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून त्यास मयत घोषित केले. मयत आरीफ खान यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व आई,वडील असा परिवार असून खासगी वाहनांवर तो चालक…
जळगाव ः प्रतिनिधी भव्य अशा मैदानावर पन्नास बाय शंभर फुटावर रांगोळीद्वारे साकारण्यात आलेले राममंदिर‘ त्यावर सायंकाळी ठेवण्यात आलेले ५ हजार १ दिवे’ पाचशे बालराम भक्तांची उपस्थिती अन् प्रभू श्रीरामचंद्र की जय असा जयघोष… असे भक्तीमय वातावरणात “श्रीराम मंदिर दीपोत्सव’ काल सायंकाळी साजरा करण्यात आला. जळगाव शहर श्रीराम मंदीर निधी संकलन अभियानांतर्गत सचिन मुसळे यांच्याद्वारे मार्गदर्शित ‘श्रीराममंदीर दीपोत्सव’ हा भव्यदिव्य कार्यक्रम रविवारी सायंकाळी ६.३० वाजता ला.ना. शाळेच्या मैदानावर पार पडला. या वेळी बालकांसह नागरिकांनी “सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष केला. या दीपोत्सवात शहरातील विविध शाळांमधील ५०१ बाल रामभक्त सहभागी झाले होते. त्यांनी ५००१ दिवे लावून १५ तासात दिव्यांनी साकारलेले भव्य…
जळगाव ः प्रतिनिधी जळगाव विमानतळावरून सुरू असलेल्या विमानसेवेचा लाभ घेणार्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.प्रवाशांची संख्या जुलै २०२०च्या तुलनेत डिसेंबर महिन्यात तब्बल सहापटीने वाढली आहे.उडान-२ या योजनेंतर्गत सप्टेंबर २०१९ ला सुरू झालेल्या विमानसेवेचा आतापर्यंत सुमारे २१ हजार प्रवाशांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे विमानसेवेच्या नकाशावर जळगाव शहराचा बिंदू अधिक ठसठशीत होण्याकडे जळगाव विमानतळाची वाटचाल सुरू असल्याची प्रतिक्रिया या क्षेत्रातील जाणकारांमध्ये व्यक्त केली जात आहे. शासनाच्या उडान-२ योजनेंतर्गत जळगावातून अहमदाबाद व मुंबई या दोन शहरांना अनुक्रमे आठवड्यातून सहा व पाच दिवस विमानसेवा सुरू करण्यात आली होती. ती कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडीच ते तीन महिने बंद ठेवल्यानंतर पुन्हा सप्टेंबर २०२०मध्ये सुरू झाली. अहमदाबादसाठी…
फैजपूर : प्रतिनिधी वार्ता फाउंडेशन या नोंदणीकृत पत्रकार संघटनेची कार्यकारिणीची सभा कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते फैजपूर शहराध्यक्षपदी ‘साईमत’चे पत्रकार प्रा.उमाकांत पाटील तर उपाध्यक्षपदी सलीम पिंजारी, मयूर मेढे यांची नियुक्ती करण्यात आली. माजी शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांनी शहराध्यक्ष पदाचा पदभार प्रा.उमाकांत पाटील यांच्याकडे सोपवला. तसेच या कार्यकारिणीत सचिवपदी संजय सराफ, सहसचिव प्रा.राजेंद्र तायडे, खजिनदार अरूण होले, कार्याध्यक्ष वासुदेव सरोदे, सदस्य पत्रकार राजू तडवी, इदू पिंजारी, योगेश सोनवणे, शाकीर मलिक, जावेद काझी, कामिल शेख, निलेश पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वांनी नूतन कार्यकारिणीचे स्वागत करून अभिनंदन केले.
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात विविध सामाजिक संघटनांची बैठक झाली. या बैठकीत दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संयुक्त किसान मोर्चातर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तीव्र निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच जिजाऊ जन्मोत्सवापासून ते प्रजासत्ताक दिनापर्यंत साखळी पद्धतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे या होत्या. त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.यावेळी लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, छावा मराठा युवा महासंघाचे अमोल कोल्हे, मुस्लिम मंच आणि मणियार बिरादरीचे फारुख शेख, नियाज अली फाउंडेशनचे अयाज…