जळगाव ः प्रतिनिधी शहरात कोविड केअर सेंटरमधील रूग्ण संख्या नगण्य आहे. त्यामुळे प्रशासकीय व आर्थिकदृष्ट्या पाच ते सात रूग्णांसाठी कोविड सेंटर सुरू ठेवणे अडचणीचे आहे.अशा परिस्थितीत मनपाचे कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहे मात्र रूग्ण संख्या वाढल्यास पुन्हा सेंटर सुरू करण्याची तयारी असल्याचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील कोरोना बाधितांचा आकडा हळूहळू पंधरा हजाराकडे सरकत आहे.एकूण बाधितांच्या तुलनेत बरे होणार्या रूग्णांचे प्रमाण देखिल भरपुर आहे.सध्या शहरात १३ हजार पॉझिटिव्ह तर साडे बारा हजार रूग्ण बरे झाले आहेत.अजुनही शहरातील २३२ रूग्णांवर उपचार केले जात आहेत. यात सात ते आठ रूग्ण हे किरकोळ लक्षणे असलेली आहेत. त्यामुळे या…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला आघाडीच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधत काल पक्ष कार्यालयात शहरातील ज्येष्ठ व क्रियाशिल पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक, चंद्रकांत नेवे, प्रवीण सपकाळे, शांताताई वाणी, सुरेश उज्जैनवाल, साईमत लाईव्हचे संतोष ढिवरे, मुफ़्ती हारून नदवी, हाफिज रहीम, सना जहांगीर खान, सईद पटेल, अली अंजुम रजवी, कृष्णा पाटील, जुगल पाटिल, प्रसाद जोशी, नितीन नांदुरकर, विलास ताठे आदी पत्रकारांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र भैय्या पाटील हे होते. आयोजक महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई पाटील यांनी प्रास्ताविक केले. व्यासपिठावर कार्याध्यक्ष विलास पाटील ,जिल्हा समन्वयक…
जळगाव ः प्रतिनिधी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचा आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक सीडिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांनी आधार व मोबाइल क्रमांक जोडण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत विशेष मोहीम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रास्त दर धान्य दुकानातील ज्या लाभार्थ्यांचे आधार व मोबाइल क्रमांक सीड झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांचे मोबाइल व आधार क्रमांक सीडिंगची कार्यवाही रास्त भाव दुकानदारांनी करावयाची आहे. जिल्ह्यातील सर्व रास्त भाव…
जळगाव ः प्रतिनिधी शिवसेना जळगाव महानगरतर्फे प्रभाग क्रमांक पाचमध्ये शासकीय योजना शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.महानगरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिवसेना विभागप्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले. शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगर प्रमुख शोभा चौधरी, मंगला बारी, सरिता कोल्हे-माळी , निलू इंगळे, कडू चौधरी, दीपक मराठे, कुंदन चौधरी, नारायण चौधरी, भय्या ठाकूर, मुन्ना परदेशी, प्रल्हाद पाटील उपस्थित होते. या शिबिरात आयुष्यमान भारत योजना, महात्मा ज्योतिबा फुले योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रमयोगी मानधन योजना, मतदान कार्ड, पॅनकार्ड नूतनीकरण योजना, किसान…
जळगाव ः प्रतिनिधी रोटरी क्लब जळगाव आणि नॅब असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रेल लुई यांच्या जयंती निमित्ताने ३० अंध बांधवांना वस्तू स्वरूपात भेट देण्यात आली.या प्रोजेक्टचे संपूर्ण प्रायोजकत्व डॉ. तुषार फिरके आणि श्रीमती मीनल पाटील यांनी स्वीकारले. यावेळी नॅबचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष जितेंद्र ढाके, सेक्रेटरी डॉ. काजल फिरके, डिस्ट्रीक्ट सहसचिव डॉक्टर तुषार फिरके,नॉन मेडिकल कमिटी चेअरमन योगेश गांधी ,कॅप्टन मोहन कुलकर्णी ,संदीप शर्मा, योगेश चौधरी ,श्रीमती मीनल पाटील,अरविंद नारखेडे, सुनील दापोरेकर, उल्हास भोळे,जयंत पाटील उपस्थित होते सूत्र संचालन सी.डी. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अजित वाघ यांनी केले.
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील न्यू एरिया वार्ड परिसरात ग्रीन कोरिडोरला मंजुरी देण्याची मागणी या परिसरातील काही सामाजिक संस्थांनी व नागरिकांनी केली आहे.सामाजिक बांधिलकी जोपासणार्या श्री रिदम रुग्णालयाने आपत्तीच्या काळात नेहमीच रुग्णसेवा तत्परतेने देण्यासाठी सातत्याने सतर्कता दाखविली असून रुग्णसेवेत अडथळा येऊ नये तसेच विलंब होऊ नये म्हणून संतोषी माता सोसायटीपासून आयडीबीआय बँकेपर्यंत किंवा हॉटेल अनिलपासून रिदम रुग्णालयापर्यंतच्या रस्त्यावर ग्रीन कोरिडोरला मान्यता द्यावी अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात गेल्या जून महिन्यात श्री रिदम रुग्णालयाने एक निवेदन जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकार्यांना देऊन अशी मागणी केली होती मात्र कोरोना संकटामुळे हा विषय तूर्त मागे पडला होता.आता कोरोना संकटाचे ढग ओसरले असून…
जळगाव : प्रतिनिधी ‘चीड येतेय ना या खड्ड्यांची’ म्हणत दोन वेळा विधानसभा जिंकणार्या आणि महापालिकेवर सत्ता मिळवणार्या भाजपने शहर पूर्णपणे खड्ड्यात घातल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. राष्ट्रवादीने काल खड्ड्याला हार अर्पण करून,केक कापत खड्ड्यांचा दुसरा वाढदिवस साजरा केला. आमदार राजूमामा भोळे यांनी खड्ड्यांच्या नावे शहरात दोन वेळा आमदारकी मिळवली. तोच कित्ता गिरवून माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एक वर्षाचे आश्वासन देऊन दोन वर्षांपूर्वी महापालिकेत सत्ता मिळवली.तब्बल दोन वर्षे होऊनदेखील शहरातील स्थिती सुधारण्याऐवजी अधिक खराब झाली आहे.या स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काल शहरात खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करीत मनपातील सत्ताधारी भाजपाविषयी अशीही गांधीगिरी केली. केक कापून आंदोलन अजिंठा चौफुली परिसरातील खड्ड्यात केक…
जळगाव ः प्रतिनिधी मराठी पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली अर्पण करून ज्येष्ठ पत्रकारांसाठी मानधन योजनेची कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी शासना दरबारी लढा तीव्र करण्याचा निर्धार काल पत्रकारांनी केला. जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात दुपारी हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष दिलीप शिरुडे यांनी पत्रकार दिन छोट्याखानी स्वरुपात साजरा करण्याबाबत भूमिका विशद केली. आगामी काळात संघातर्फे एक दिवसीय कार्यशाळा लवकरच घेण्याबाबत त्यांनी जाहीर केले.विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय बापू पाटील यांनी ज्येष्ठ पत्रकारांच्या मानधना संदर्भात शासनाने ठरवलेल्या जाचक अटी शिथिल करण्यातसंदर्भात माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांच्याशी भ्रमणध्वनीवर मागण्यांबाबत…
जळगाव ः प्रतिनिधी दैनंदिन जीवनात स्वयंपाकासाठी गरीबापासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांसाठी महत्त्वाच्या अशा खाद्यतेलाचे भडकलेले दर हा सध्या घराघरातील चिंतेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे, हे दर वाढले म्हणून शेतकर्यांना दोन पैसे अधिक मिळत आहेत किंवा व्यापारी नफेखोरी करीत आहे,असे नाही तर या महागाईचा भडका केंद्र सरकारने भरमसाठ वाढविलेल्या आयात शुल्कामुळे उडाला असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे.व्यापारी वर्गाकडूनही आता यासंदर्भात आवाज उठू लागला लागला आहे. तेल भाव वाढीमुळे जनता बेजार झाले असून आता व्यापारीही याबाबत आश्चर्य व्यक्त करीत आहे. भारत मुळातच खाद्यतेलाचा आयात करणारा देश असतानाही दिवाळीत खाद्यतेलाच्या आयातीवर केंद्र सरकारकडून ४ टक्के आकारले जाणारे आयातशुल्क आता थेट २३ टक्के…
अमळनेर ः प्रतिनिधी तालुक्यातील कळमसरे येथील रहिवासी व वसंतनगर येथील उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील उपक्रमशील व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका कार्याध्यक्ष पत्रकार प्रा. हिरालाल पाटील यांना ‘युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य’ या युवा चळवळीमार्फ़त विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र त्यांना कालच प्राप्त झाले असून त्यांना दि.१० जानेवारी रोजी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यात युवा चळवळीत कार्य करणार्या युवकमित्र परिवारातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय युवा संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी संमेलनात राज्यातील उत्कृष्ट कार्य करणार्यांना ‘युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य’ या युवा चळवळीमार्फ़त विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात कळमसरे (ता.अमळनेर) येथील…