Author: saimat team

जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, आज मंगळवारी सकाळी ८ वाजता नूतन मराठा महाविद्यालयात ईव्हीएम मशीन सील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी तहसिलदार नामदेव पाटील यांच्यासह अधिकारी व तालुक्यातील निवडणूक लढवणारे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जळगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, निवडणूक चिन्ह प्राप्त होताच निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवारांनी प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला असल्याने गावागावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याचवेळी प्रशासनाने निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू केली असून, आज सकाळी ईव्हीएम मशीन सील करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. नूतन मराठा महाविद्यालय येथे सुमारे ३० टेबलवर मास्टर ट्रेनरच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील अजिंठा रोडवरील सुरभी लॉन जवळून सुप्रिम कॉलनीत राहणार्‍या चालकाची दीड लाख रूपये किंमतीची मालवाहू गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चालकाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूध्द रितसर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे की, मनोहर ज्ञानदेव पवार (वय ३८) रा. त्रिमूर्ती नगर, सुप्रिम कॉलनी हे खासगी मालवाहू गाडीचे चालक आहे. त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे मालवाहू (एमएच १९- बीएम ०२४४) क्रमांकाची चारचाकी गाडी आहे. मिळेल ते भाड्याने माल वाहण्याचे काम ते करतात. ९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील अजिंठा चौफुलीजवळील सुरभी लॉनजवळ त्यांनी मालवाहू गाडी पार्किंगला लावली व कामाच्या निमित्ताने बाहेर गेले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील तांबापूरा भागातील बिस्मील्ला चौकात असलेल्या घरातून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रुपये रोख व इतर वस्तू चोरून नेल्याचे काल पहाटे उघडकीस आले. याप्रकरणी काल रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील तांबापूरा भागात मोहसीन शेख सलीम (वय २४) रा.बिस्मील्ला चौक, हे आपल्या कुटुंबियासह राहतात. त्यांचे दुमजली घर आहे. १० जानेवारी रोजी रात्री १० वाजता घरातील कुटुंबिय जेवण करून खालच्या घरात झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी वरच्या घरात शिरून घरात ठेवलेले २५ हजार रूपयांची रोकड आणि हॅन्ड बॅग, केबलचे बुक चोरून नेल्याचे ११ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी मोहसीन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी व दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे सात दिवसीय धरणे आंदोलनाला कालपासून प्रारंभ झाला आहे.आज या आंदोलनात मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले आहेत. काल सोमवारी या आंदोलनात पदाधिकार्‍यांसह जळगाव व जामनेर तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले. केंद्र सरकारने ३ कृषी विधेयके मंजूर केली आहेत. त्यामुळे भारतातील शेतकरी व शेती व्यवसाय संकटात येणार आहे. शेतकर्‍यांना अडचणींना सामोरे जावे लागेल. कृषी उत्पन्न बाजार समिती व हमीभाव धोक्यात आले आहेत. हे तिनही अध्यादेश रद्द होण्याच्या मागणीसाठी शेतकरी सिंघू, गाजीपूर सीमेवर आंदोलन करीत आहेत. शेतकरी विरोधी कायदे रद्द न…

Read More

अमळनेर ः प्रतिनिधी शहरातील प्रबुद्ध विहार ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून नागरिकांना व वाहनधारकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी छोटे-मोठे अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हा रस्ता त्वरीत दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील पंकज चौधरी यांनी दिला आहे. अमळनेर रा.मा.१५ चे काम सुरू होते. त्यामुळे शहरातून जाणारा रा.मा. क्रं.०६ (प्रबुद्ध विहार ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंत) रस्त्यावरून सर्व अवजड वाहतूक वळविल्याने रा.मा.०६ ची संपूर्ण चाळण झाली आहे. विशेष करून सुभाष चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंत धुळीचे…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी राज्य शासनाने २०१९ मध्ये ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू केलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी रद्द करून सदर योजनेत सुधारणा करून जळगावातील १२ ज्येष्ठ पत्रकारांना न्याय द्यावा अशी मागणी करणारे पत्र जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा करावयाच्या पत्रकार दिनी जळगावातील बारा ज्येष्ठ पत्रकारांनी या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले त्यात शिवलाल बारी, मोहन साळवी, अरूण मोरे, केदारनाथ दायमा, सुभाष पाटील, अशोक जैन, अनिल मुजूमदार, जमनादास भाटीया,विजय पाटील, प्रकाश पत्की, दिनेश दगडकर यांचा समावेश होता.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियानासाठी भाजप जिल्हा महानगर शाखेची बैठक नुकतीच भाजप कार्यालयात झाली. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे व महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार भोळे यांनी श्रीराम जन्मभूमी निधी समर्पणासाठी प्रत्येक समाजबांधवाने खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. बैठकीत संघाचे राजेश ज्ञाने, दीपक वाणी, सुमन नेवे, पीयुष श्रावणे यांनी मंगळवारी होणार्‍या भव्य मोटारसायकल रॅलीविषयी माहिती सांगितली. महापौर भारतीताई सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, गटनेता भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हा पदाधिकारी रेखा कुलकर्णी, बापू ठाकरे, राजू मराठे, सुशील…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरात काल कोरोनाचे नवीन २० रुग्ण वाढले तर २२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले.सध्या उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या २४८ आहे. दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी जळगाव शहर व जळगाव ग्रामीणमध्ये एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. जळगाव शहरातील एकूण कोराना बाधित रुग्णांची संख्या आता १३ हजार २२१ तर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १२ हजार ६८३ झाली आहे तसेच एकूण मृतांचा आकडा हा २९० झाला आहे. महापालिका हद्दीत १ हजार ७०६ कंटेन्मेंट झोन असून त्यात ऍक्टिव्ह झोन सध्या ३६ आहेत. २ हजार १२४ टिमने ७३ हजार ६६५ घरांचे सर्वेक्षण केले. त्यात आयएलआयचे ३९ तर सारीचे १३ व…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील इंद्रप्रस्थनगर, जनाई नगर, शिवशंकर कॉलनी, राधाकृष्ण नगर, दत्तात्रय नगर, त्रिभुवन कॉलनी या भागातील रहिवासी महिलांनी एकत्रित येत आज आपल्या परिसरातील परमीट रुमच्या विरोधात जिल्हधिकार्‍यांना निवेदन देत त्यांना या परमिट रुमचा परवाना रद्द करण्याबाबत साकडे घातले. निवेदनात म्हटले आहे की,हा परिसर अतिशय शांतताप्रिय व उच्चभ्रु वस्ती असलेला आहे.आमच्या भागात वसंतराव शामराव चौधरी यांनी नुकतेच दोन वर्षांपूर्वी राजाराम हॉल लग्न कार्यालयासाठी मंगल कार्यालयाची मागणी केलेली आहे व त्यांनी वर नमूद जागेत नुकतेच हॉटेल व्यवसाय व त्यासोबत दारु विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार असून तसे प्रयत्न व हालचाली सुरु केलेल्या आहेत. या भागातील रहिवाशांना सदर बांधकामाच्या अनुषंगाने सदरचा भाग…

Read More

जळगाव : प्रतिनिधी परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. व्यावसायिकांनी पोल्ट्री फार्मचे सॅनिटायझेशन करून काळजी घ्यावी. मृत पक्ष्यांबाबत पशुसंवर्धन विभागाला कळवावे. त्याचप्रमाणे नगरपालिका क्षेत्रातील मोठ्या मार्केटमध्ये विक्री होणारे मांस तपासण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. देशातील काही राज्यांबरोबरच महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे पक्षी दगावले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील यंत्रणांचा आढावा घेतला. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार…

Read More