Author: saimat team

जळगाव : प्रतिनिधी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटची “कोविशील्ड’ ही कोरोना प्रतिबंधक लस काल जळगाव शहरात पोहोचली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सकांना सोबत घेऊन ही लस ज्या ठिकाणी दिली जाणार आहे त्या जागेची बारकाईने पाहणी केली. पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि.१६) जिल्ह्यात नऊ केंद्रांवर प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचार्‍यांना ही लस दिली जाणार आहे. जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यावर “कोविशील्ड’ लसीची निमिर्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काल संध्याकाळी ६ वाजता पाहणी केली.…

Read More

पाचोरा/चाळीसगाव : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील १९ वर्षीय तरुणीचा घरात एकटी असतांना तरुणाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे तर चाळीसगाव शहरात एका विवाहाच्या कार्यक्रमास आली असता ४२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील १९ वर्षीय तरुणी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरात एकटी असतांना घरात कुणीही नसल्याचा फायदा उचलत संशयीत आरोपी गजानन माणिक पाटील (रा.शिंदाड, ता.पाचोरा) याने मद्यधुंद अवस्थेत घरात घुसत पिडीत तरुणीचा उजवा हात पकडत अलिंगन देत पिडीतीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन पिंपळगाव-हरेश्‍वर पोलीस स्थानकात गजानन माणिक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील जिल्हा परिषद कॉलनीतील जिल्हा क्रिडा निवासस्थानात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या रोकडसह सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली असून एका अधिकार्‍याच्या घरीच चोरट्यांनी डल्ला मारत पोलीस प्रशासनासमोर आव्हान उभे केले आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषद कॉलनीत जिल्हा क्रिडा अधिकारी सुजाता चव्हाण (वय ५२) यांचे निवासस्थान आहे. काल मंगळवार दुपारी मु.जे. महाविद्यालयात युवा सप्ताह अंतर्गत युवा दिनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित होत्या. याच सुमारास त्यांच्या निवासस्थानात बंद घर असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रोकडसह दोन लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. सुजाता…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलात मंगळवारी टॉक शो झाला. यात अयोध्यानगरीतील भव्य श्रीराम मंदिर निर्माणातील विविध पैलूवर प्रकाश टाकण्यात आला. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी (मुंबई) म्हणाले की, रामजन्म भूमीमुक्तीचा लढा हा १५२८ पासूनचा आहे. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. या वेळी महासभेकडून अयोध्येतही राममंदिर उभारण्याचा प्रश्न पुढे करण्यात आला व समिती स्थापन झाली. हे आंदोलन कुण्या पक्षाची मक्तेदारी नव्हती. राजकीय दृष्ट्या या चळवळीला कोण्या पक्षाच लेबल लावता येणार नाही. सन १९९० पासून या आंदोलनाला राजकीय रंग चढवला, असे भंडारी म्हणले. ऍड. सुशील अत्रे सूत्रसंचालन केले. सामाजिक वैचारिक भिन्नता दूर करण्याचे…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील आकाशवाणी चौफुलीनजिकच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयात राजमाता जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद यांचे जयंतीनिमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस. महाजन सर यांनी प्रास्ताविकात मॉं जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र भैय्या पाटील व लहान बालकांनी मॉंसाहेब जिजाऊंच्या वेशभूषेत दोघांचे प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ऍड. भैय्यासाहेब यांनी या दोघंही महान विभूतींच्या कार्याबद्दल आपले मनोगतातून सविस्तर माहिती सांगितली. याप्रसंगी वाय.एस. महाजन सर, स्वप्निल नेमाडे, महिला जिल्हाध्य्क्षा कल्पनाताई पाटील, मंगलाताई पाटील, अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्‍वरी, सुनिल माळी, किरण राजपूत, ऍड. राजेय गोयर, राजु भंगाळे, चंद्रकांत…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रच्या उभारणीसाठी श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियाना अंतर्गत जळगाव शहरात झालेल्या श्रीराम प्रदक्षिणा वाहन फेरीत सहभागी सर्व श्रीराम भक्तांचे आतिषबाजी व फुलांचा वर्षाव करत आगळे वेगळे व भव्य स्वागत पांडे चौक येथे युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे करण्यात आले.या ठिकाणी कुमुद नारखेडे व सहकारी यांनी भव्य अशी स्वागतपर रांगोळी काढली होती तसेच आकर्षक स्वागत कमान लावण्यात आली होती. वाहन फेरीच्या समारोपठिकाणी युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे प्रभूश्रीरामाची सुंदर आरास उभारण्यात आली होती. या ठिकाणी श्रीराम भक्तांची छायाचित्र घेण्यासाठी गर्दी दिसून आली. सदर आरास राजेश नाईक यांच्या नेतृत्वात युवाशक्तीच्या स्वयंसेवकांनी साकारली. या साठी युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया,प्रितम शिंदे, अमोल गोपाळ, चेतन बारी,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी मोकाट कुत्र्यांची समस्या आता डोईजड झाली आहे. लहान मुले सातत्याने लक्ष्य होत असून, आणखी किती दिवस लचके तुटणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांनाच कुत्र्यांची पिले भेट देऊन निषेध नोंदवला. शहरात गेल्या दहा वर्षांत कुत्र्यांची संख्या दुप्पट झाली . ७ वर्षे सतत प्रयत्न केल्यानंतर वर्षभरापुर्वी कुठे कुत्रे निर्बीजीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यात कोरोनाचा कहर वाढला आणि ते काम बंद पडले. दरम्यानच्या काळात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. घरातून एकटे बाहेर पडणे म्हणजे धोका पत्करणे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन दिवसांत १९ जणांना चावा घेतल्याच्या घटना…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी ब्राह्मण समाजातील युवकांना शैक्षणिक, व्यावसायिक तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. त्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी ब्राह्मण समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. बहुभाषिक ब्राह्मण संघ, बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, ब्रह्मश्री बहुउद्देशिय संस्थेतर्फे हे धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी ३१ डिसेंबर रोजी पाच कर्मचारी निवृत्त होत असताना त्यापैकी एक कर्मचारी हा हवलदार म्हणूनच निवृत्त का होत आहे याबाबत चौकशी केली असता कार्यालयीन दिरंगाईमुळे त्याला पदोन्नती नाही म्हणून डॉक्टर मुंडे यांनी त्वरित प्रशासकीय सूत्रे हलवून निवृत्त होणार्‍या हवालदारास त्याच दिवशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्थातच जमादार पदाची पदोन्नती दिली व संध्याकाळी त्याला निवृत्ती देऊन निरोप देण्यात आला. ज्या हवालदाराला पदोन्नती देऊन सन्मानित करण्यात आले होते ते हवलदार अब्दुल हकीम वाहिद शेख हे मनियार बिरादरी शी संबंधित असल्याने पोलीस अधीक्षकांनी त्यांचा जो सन्मान केला होता तो जरी कर्तव्याचा भाग असला तरी एका पोलीस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातून जाणार्‍या महामार्गाच्या कामातील अडथळे सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने दूर करावे,जेणेकरुन महामार्गाचे काम गतीने पूर्ण करता येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जळगाव शहरातील रस्ता सुरक्षा व ३२ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रकांत सिन्हा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) किरण सावंत पाटील, महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे, उपअभियंता स्वाती भिरुड यांचेसह एसटी, वीज वितरण कंपनी, भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जळगाव शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय…

Read More